घोडे लागणे म्हणजे काय ते पहायचंयं तर हा व्हीडिओ बघाच! घोडा आणि घोडेस्वारी करणं फक्त घोडे झालेल्यांचं काम नाही म्हणजे काय ते हा व्हीडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. आपल्या पेक्षा शंभर पटीने अधिक ताकदीचा प्राणी, वाहने आवाक्यात आणायचं यासाठी नियंत्रणाची कला आपल्याला अवगतं लागतेयं, नाहीतर अशी रडकुंडीची वेळ आलीयं ना तशी कुणाचीबी परिस्थिती येऊ शकते. या साठी असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी पेशन्स हवेत. परिस्थितीवर नियंत्रणाची कला हाताळता येईल तरच घोड्यावर बसून त्याची स्वारी करायची स्वप्न बघाल तर असलीच गत होईल. घोडा प्राण्याबद्दल थोडं माहिती असेल ना तर थोडंसं गुगल करुन जावं. घोड्याचा स्वभाव, आपल्याशी त्याचं कसं परफेक्ट जमेल याची काळजी घ्यायला हवी. कितीही मोठा घोडेस्वार असला ना तरीही त्याची खाली दणकन पडल्याची वेळ कधी येईल हे खुद्द घोडाही सांगू शकत नाही.
घोडेस्वारी करायला राजे महाराजे इतकी तयारी का करत तर त्याचं कारणही तितकंचं सरळ आहे. आपल्याला यु’द्धा’वर न्यायच्या घोड्याला आधी तालमीत आणावं लागायचं, घोड्याच्या या सगळ्या सवयी टीपून घ्याव्या लागायच्या. त्याच्या भूकेपासून ते त्याच्या शान शौकेपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची बाब आहे. उगा आपलं अंगात आलं आणि घोड्यावर बसलं तर अशीच रडकुंडीची वेळ येते. आपल्या बाळ्या पण घोड्यावर बसायचंयं बसायचंयं म्हणून हट्ट करत होता. बापानं त्याला हाण हाण हाणला असंल पण काही त्याला हट्ट सोडवेना. बाळ्याचा हट्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेघ हे ठरलेलं होतं. बाळ्यानं करावं काय तर त्यानं केलं असं की तबेल्यापर्यंत आला खरा पण घोडा धिप्पाड पाहून त्याला काही पुढे सरकायची जराशी बी हीम्मत काही होईना. एवढा लांब घरातून तयार होऊन बापानं स्पेशल गाडी करुन याला घोड्यावर बसायला आणला आणि घोड्याला बघून याची हवा टाईट.
म्हणजे असं झालं लगीन केलं आवडली म्हणून ध्यान पाहिल्यावर म्हणाला देईन सोडून, अशी गत या व्हीडिओतल्या बाळ्याची झालीयं. घोडा घ्यायचा म्हणजे एक गोष्ट नक्की करायची शहाण्यानं… घोड्याच्या मागे कधीही उभं राहू नये. घोाडा आपला कितीही लाडका असला तरीही मागे उभा राहणाऱ्याला तो कसाही लाथाडणार हे नक्की असतं. आणखी एक आतली गोष्ट सांगतो. पोरांनी तर घोड्याच्या मागे कधीच उभं राहू नये. घोड्याची लाथ थेट कपाळात जाण्याची शक्यता जास्त असतेयं. बाळ्या नेमका घोड्याच्या मागे नेमका पडला. घोड्यानं काय करायच्या आधी मुसूमुसू रडला. घोड्यानं काय केलं काय नाही केलं तर पुढे काय आपल्या सुत्रांना काही कळलं नाही. पण जे घडलं त्यानं बाळ्याचा गेम झालायं एवढं नक्की. बाळ्याच्या या सगळ्या कामात काम भारी झालं म्हणजे आता बाळ्या पुन्हा हट्ट करायला जाणार नाही.
बघा व्हिडीओ :