Breaking News
Home / मनोरंजन / चक्क भलामोठा अजगर ट्रॅफिकमधून रस्ता पार करतानाचा व्हिडीओ झाला कॅमेरात कैद, बघा व्हिडीओ

चक्क भलामोठा अजगर ट्रॅफिकमधून रस्ता पार करतानाचा व्हिडीओ झाला कॅमेरात कैद, बघा व्हिडीओ

प्रवास करताना ट्रॅफिक जामचा अनुभव घेणं हे काही आपल्याला नवीन नाहीये. अनेकवेळा तर आपण राहतो तिथपासून अगदी हाकेच्या अंतरावर रस्ता असेल तर याचा प्रत्यय अगदी जवळून येत असतो. अर्थात हे ट्रॅफिक जाम बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतं. जसे की गर्दीच्या वेळा (रश अवर्स) असतील किंवा रस्त्यात एखादं काम चालू असेल वा रस्त्यात कोणाची बाचाबाची झाली किंवा दुर्दैवाने कोणाचा अपघात झाला असला तरीही ट्रॅफिक जाम होतंच. अर्थात ही आपली नित्याचीच कारण झाली.

पण अनेकवेळा इतर कारणही आपल्याला बघायला मिळतात. काही कारणं तर अशी असतात की आपण त्यांचा कधी विचार केला नसेल. आता हेच बघा ना. काही दिवसांपूर्वी कोची या शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कारण काय, तर एक अजगर महाशय कुठूनसे एका रस्त्यावर आले होते. या शहरातील सिपोर्ट एअरपोर्ट या रस्त्याच्या एका बाजूने हा अजगर बाहेर आला. वेळ रात्रीची होती. अशावेळी कोणत्याही शहरात असते तशी प्रवाशांची लगबग ही होतीच. पण नेमके हे अजगर महाशय अवतीर्ण झाल्याने त्यांच्या दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. बरं आता अजगरच तो ! त्यामुळे त्याचा अवजड देह सांभाळत सरपटण तसं कमी वेगाचं होतं.

अर्थात जीवाला धोका निर्माण झाल्यास हाच अवजड देह सुद्धा लवचिकतेने वापरण्याची वृत्ती अजगर किंवा तत्सम सर्पांमध्ये असते. पण या अजगर भाऊंना कशाचीही घाई नसावी. तसेच एक तर कशाची आणि कोणाचीही भीतीही वाटत नसावी किंवा त्यांचं मजबूत जेवण झालेलं असावं. कारण स्वारी ज्या धीम्या गतीने पूढे जात असते की काही विचारू नका. पण सुदैवाने कोणाकडूनही त्याला भीती न वाटल्याने आजूबाजूच्या कोणावरही हल्ला होत नसतो हे खूप छान होतं. तरीही एक ठराविक अंतर राखूनच सगळे जण उभे असतात. अर्थात हल्ली मोकळा वेळ असला की हाताला चाळा हवाच असतो आणि ही मागणी फोनमुळे पूर्ण होते. त्यात मग असं काही घडत असेल तर फोटो आणि व्हिडियोज चित्रित होणं हे तर ओघाने आलंच. अर्थात काही वेळा हे व्हिडियो चित्रित करणं आपल्या डोक्यात जात असलं तरी काही वेळा त्याचा फायदा ही होतो. जसा तो आताही होतो. कारण कोणा एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडियो चित्रीत केल्याने आपल्याला सदर घटना बघता येते.

आमच्या ही टीमने ही घटना बघितली आणि त्याचं अप्रूप वाटलं. जसं या अजगराच्या धीम्या गतीविषयी कुतूहल वाटलं तसंच आजबाजूला असलेल्या लोकांचं कौतुक ही वाटलं. अजगर आहे म्हणून त्यांनी त्यावर हल्ला ही केला नाही किंवा वाहनांनी त्याला घाबरवलं ही नाही. सगळे जण आपापल्या जागी उभे होते आणि या अजगर महाशयांनी रस्ता पार करून जाण्याची वाट बघत होते. अर्थात सगळ्या गोष्टींना अपवाद हे असतातच. तसाच याही बाबतीत अपवाद दिसून आलाच. एक फूड डिलिव्हरी वाला भाऊ जरा घाईतच होता. तसेही ते घाईतच असतात. त्याने फक्त आपली दुचाकी धीर करून या अजगराच्या समोरून चट्कन काढली. पण बाकी सगळे जण मात्र या अजगराने रस्ता रिकामी करण्याची वाट बघत होते. सुदैवाने अगदी जास्त वेळ न घेता हे अजगर महाशय रस्ता पार करते झाले आणि सगळ्यांनी निश्वास टाकला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही यात काहीसा संथपणा जाणवला असेल. पण अस असलं तरी आपलं कुतूहल ही जागृत झालेलं असेल हे नक्की. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपल्या वाचकांसाठी आपली टीम सदर व्हिडियो लेख पूर्ण झाल्यावर खाली शेअर करेलच. आपण त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *