Breaking News
Home / मराठी तडका / चला हवा येऊ द्या मधील कलाकार आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार, नंबर ७ जोडी नक्की बघा

चला हवा येऊ द्या मधील कलाकार आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार, नंबर ७ जोडी नक्की बघा

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने आपल्या सगळ्यांनाच एवढी वर्षे हसवलं आहे. तसेच प्रत्येक वेळी पोस्टमन काकांच्या पत्रांनी डोळ्यात आसवं सुदधा उभी राहिली आहेत. एकूणच काय तर ‘चला हवा येऊ द्या’ हा केवळ एक कार्यक्रम राहिला नसून आपल्या घराघरातील एक महत्वाचा भाग झाला आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्याला खूप हसवलं आहे. पण त्यांच्या या प्रवासात त्या त्या कलाकारांना त्यांच्या त्यांच्या जोडीदारांनी अगदी खंबीरपणे साथ दिलेली आहे. पण काही अपवाद वगळता ही मंडळी कधी माध्यमांसमोर येताना दिसत नाहीत. पण आज या लेखाच्या माध्यमातून आज या प्रसिद्ध कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकारांच्या प्रसिद्धी पासून दूर राहणाऱ्या जोडीदारांविषयी जाणून घेणार आहोत.

निलेश साबळे :
या कार्यक्रमाचे कर्ताधर्ता म्हणजे निलेश साबळे आहेत, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. मराठी गप्पाच्या टीमने केलेल्या एका लेखात आपण त्यांची संघर्षमय यशोगाथा वाचली असेलंच. या त्यांच्या प्रवासात त्यांना साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची म्हणजेच गौरी साबळे यांची. अहोरात्र चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी वाहून घेणाऱ्या निलेश यांची काळजी त्यांच्या पत्नी घेत असतात हे त्यांच्या काही मुलाखतींमधून दिसून येतंच. सोबतच त्या स्वतःची चित्रकला सुद्धा जोपासत असतात. त्यांनी रेखाटलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर पाहायला मिळतात. तसेच त्या उत्तम गातात सुद्धा असंही कळतं. अशा या कलंदर जोडीला मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

भाऊ कदम :
महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम लाभलेला हा अभिनेता. त्यांचं निरागस हास्य, अगदी टायमिंग सहजगत्या साधून केलेली विनोदाची फटकेबाजी आणि साधेपणा ही यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये ज्यांमुळे महाराष्ट्र यांच्या प्रेमात पडला आणि आजही प्रेमात आहे. भाऊ कदम आहेत म्हणजे कोणतंही प्रहसन उत्तम होणार याची खात्री प्रेक्षकांना असते. पण सुपरस्टार पदापर्यंतचा त्यांचा प्रवास किती खडतर होता हे आपण मराठी गप्पाच्या लेखात वाचलं असेलंच. एकेकाळी पानाची टपरी चालवण्याची वेळ भाऊंवर आली होती. पण घरच्यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर भाऊंनी अभिनय क्षेत्रातील आपली कारकीर्द गाजवली. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी त्यांच्या अर्धांगिनी अगदी ठामपणे उभ्या होत्या. भाऊंच्या सौ म्हणजे ममता कदम. त्यांनी संसार, मुलं यांना सांभाळत भाऊंच्या करकीर्दीतही नेहमीच मोलाचा वाटा उचलला. आजच्या भाऊंच्या यशात त्यांचं मोठं योगदान आहे हे नक्की. या दोघांनाही त्यांच्या पुढील सुखी आयुष्यासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

कुशल बद्रिके :
काळाचे आघात सोसत सोसत, आयुष्यातील चढ उतार बघत ते आजचा आघाडीचा आणि सगळ्यात जास्त मनोरंजन करणारा अभिनेता हा प्रवास कुशल यांच्या साठी सोप्पा नक्कीच नव्हता. त्यांनी आपल्या आयुष्यात कसे कसे चढउतार अनुभवले हे आपण याआधी मराठी गप्पाच्या लेखात वाचलं आहेच. या त्यांच्या प्रवासात त्यांना अतिशय ताकदीची अशी साथ लाभली ती सुनयना बद्रिके यांची. नाट्यक्षेत्राच्या आवडीतून दोघे एकमेकांना भेटले, मैत्री वाढली आणि पूढे आयुष्यभराची साथ लाभली. त्यांनी आयुष्याची अनेक वळणं ओलांडत ओलांडत आजपर्यंतचा प्रवास यशस्वी करून दाखवला आहे. सुनयना या स्वतः उत्तम कलाकार असून त्या ‘कुशल’ नृत्यांगना आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपलं नृत्य सादरीकरण ही केलेलं आहे आणि त्या कथक ह्या नृत्य प्रकारचे धडे सुदधा देतात. तसेच कुशल यांच्या सोबत एका वेब सिरीज चा एका एपिसोड दरम्यान त्या भाग होत्या. या कलंदर जोडीला आमच्या मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील आनंदी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

भारत गणेशपुरे :
चला हवा येऊ द्या मधला विदर्भाचा खणखणीत आवाज म्हणजे भारत गणेशपुरे. कोणत्याही प्रहसनाच्या सुरुवातीला भारत गणेशपुरे यांनी येऊन सुरूवात केली नाही हे खचितच झालं असेल. तसेच त्यांनी साकार केलेला विविध संघटनांचा अध्यक्ष असणारा सरपंच तुफान गाजला. त्यांचं तुफान विनोदी टायमिंग आणि कोट्या करणं प्रेक्षकांना खूप आवडतं. पण हा सगळा त्यांच्या कित्येक वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील कामाचा परिणाम आहे. एवढी वर्षे या मनोरंजन क्षेत्रात टिकून राहताना त्यांनी अनेक माध्यमांतून काम केलं. विविध भूमिकांतून काम केलं. त्यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना ठामपणे साथ दिली ती त्यांच्या अर्धांगिनी यांनी. त्यांचं नाव सोनाली असं आहे. नुकताच या जोडीने त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस साजरा केला. तसेच दोन वर्षांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या लग्नाची १८ वर्षे सेलिब्रेट करण्यासाठी एकमेकांसोबत पुन्हा एकदा विवाह केला होता. या सोहळ्याला या क्षेत्रातील अनेक दिग्गज त्यावेळी हजर राहिलेले होते. अशा या जिंदादिल जोडीला आमच्या मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील उत्साही वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

सागर कारंडे:
वर पोस्टमन काकांचा उल्लेख झाला आणि चट्कन दोन नावं डोळ्यासमोर आली नाही का? एक तर लेखक अरविंद जगताप आणि सागर कारंडे. सागर यांच्या विषयी आपण आधीच्या एका लेखातून वाचलं आहेच. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, मग एका प्रथितयश कंपनीत काम केलं आणि मग पूर्णवेळ याच क्षेत्रात कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. तिथपासून ते आजतागायत जवळपास दोन दशकांत त्यांनी आपला निर्णय अगदी योग्य होता हे सार्थ ठरवून दाखवलं आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना तोलामोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची. सागर यांच्या पत्नीचं नाव सोनाली असं आहे. सागर हे स्वतः सोशल मीडिया वर वेळोवेळी नवनवीन प्रोजेक्ट्स च्या निमित्ताने दिसत असले तरी सोनाली या मात्र सोशल मीडिया आणि एकूणच माध्यमांपासून दूर असलेल्या दिसतात. प्रसिद्धी पासून अलिप्त पण कलासक्त अशा या जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

श्रेया बुगडे :
चला हवा येऊ द्या च्या अगदी पहिल्यापासून कायम असलेल्या कलाकार संचाचा भाग असलेली एकमेव स्त्री अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. कोणतीही व्यक्तिरेखा असो, अगदी समर्थपणे साकार करणारी ही अभिनेत्री. पण ही व्यक्तिरेखा साकार करताना विनोदाचं टायमिंग सांभाळणं ही तितकंच महत्वाचं असतं. श्रेया ते अगदी सहजगत्या सांभाळताना दिसते. अशी ही अष्टपैलू अभिनेत्री काही वर्षांपूर्वी कलाक्षेत्रातच कार्यरत असणाऱ्या निखिल शेठ यांच्या प्रेमात पडली आणि यथावकाश या दोघांनी लग्न केलं. त्यांची ही प्रेमकथा आपल्याला मराठी गप्पाच्या एका लेखात वाचायला मिळेलंच. निखिल हे कलाक्षेत्रात कार्यरत असून ते एक लोकप्रिय निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक सुप्रसिद्ध मालिकांची निर्मिती केलेली आहे. कालाक्षेत्राशी विविधांगांनी जोडल्या गेलेल्या या जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

तुषार देवल :
चला हवा येऊ द्या च्या कलाकार संचाचा एक महत्वाचा भाग म्हणजे तुषार देवल. या लोकप्रिय कार्यक्रमाचे संगीत संयोजन तुषार यांनी सांभाळले आहे. तुषार यांनी संगीत संयोजनासोबतच काही वेळेस प्रहसनांतून अभिनयही केलेला आहे. तुषार यांचं लग्न हे अभिनेत्रीशी झालं असून त्या त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव स्वाती देवल असं असून आपण त्यांना विविध भूमिकांतून आणि विविध भूमिकांतून पाहिलेलं आहे. त्यांनी साकार केलेल्या विनोदी भूमिकाही गाजल्या आहेत. या कलाकार जोडीला त्यांच्या सुखी आयुष्यासाठी आमच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

अंकुर वाढवे :
चला हवा येऊ द्या मध्ये तसा काही काळापूर्वी दाखल झालेला पण अतिशय कमी काळात स्वतःची छाप पाडणारा कलाकार म्हणजे अंकुर वाढवे. अंकुर याने अनेक नाटकांतून आणि इतर कलाकृतींमधून काम केलेलं आहे. त्याचं स्वतःचं एक युट्युब चॅनेल ही आहे. आपल्या विविध भूमिकांमुळे लक्षात राहणारा हा कलाकार एक उत्तम कवी सुदधा आहे. तसेच त्याला भटकंती करायला ही आवडते. असा हा कलंदर कलाकार दोन ते तीन वर्षांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. निकिता असं त्याच्या पत्नीचे नाव. गेल्या वर्षी या जोडीला कन्यारत्न प्राप्त झाले असून संपूर्ण कुटुंब अगदी आनंदात आहे. या नवीन जोडप्याला त्यांच्या येत्या काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *