Breaking News
Home / जरा हटके / चालत्या कारमधून खाली पडले बाळ, आई गाडी चालवत पुढे निघून गेली, बघा व्हिडीओ नतंर काय घडलं ते

चालत्या कारमधून खाली पडले बाळ, आई गाडी चालवत पुढे निघून गेली, बघा व्हिडीओ नतंर काय घडलं ते

मुलांबद्दल थोडंसं सुद्धा बेपर्वा राहणं म्हणजे नंतर खूप भारी पडून जाते. आता सोशिअल मीडियावर वायरल होणाऱ्या ह्या व्हिडीओचेच पहा ना. ह्या व्हिडीओमध्ये एक बाळ चालत्या कार मधून खाली पडतं. काही वेळापर्यंत तर गाडी चालवणाऱ्या आईला माहिती सुद्धा होत नाही कितिचे बाळ रस्त्यावर पडले आहे. ती तिच्या धुंदीमध्ये कार चालवत राहते. परंतु हि आश्चर्याची गोष्ट होती कि खाली पडूनसुद्धा बाळाला काही होत नाही. ते बाळ स्वतः आपल्या पायांवर उभं राहतं आणि रस्त्यावर आईच्या कारच्या मागे धावू लागते. हे संपूर्ण दृश्य बघायला खूप दु’खदायक वाटते. ह्यामध्ये सुद्धा चांगली गोष्ट हि होती कि बाळाच्या आईला नंतर जाणीव होते कि तिचे बाळ कारमध्ये नाही आहे. ती आपली कार थांबवते आणि बाळाला पाहायला रस्त्यावर उतरते.

तिला लगेच दिसते कि बाळ सिग्नलच्या मागे असून तिच्याजवळ येण्यासाठीच धडपड करत आहे. आजूबाजूला खूप गाड्या जात असतात. परंतु त्या बाळाला रस्त्याच्या मधोमध चालताना पाहून इतर गाड्यांनी वेग कमी करत लगेच थांबवल्या. त्यानंतर बाळाची आई धावत धावत त्या बाळाजवळ जाऊन त्याला उचलून कुशीत घेते. आणि त्यानंतर गाडीमध्ये घेऊन जाते. हि संपूर्ण घटना ट्राफिक सिग्नलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कै’द झाली आहे. आता हा व्हिडीओ सोशिअल मीडियावर खूप पाहिला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे कि कश्याप्रकारे एका सफेद रंगाच्या एसयूव्ही कारच्या मागच्या दरवाज्यातून बाळ खाली पडते ते. ते बाळ रस्त्यावर पडताच त्याच्या मागून येणाऱ्या इतर गाडीचालक लगोलग आपल्या गाड्या थांबवतात.

ह्यानंतर हे बाळ आईच्या शोधात रस्त्यावर धावत असतो. ह्याच दरम्यान एक स्कुटीवर बसलेली तरुणी ह्या बाळाचा हात पकडून त्याला सांभाळते. ह्याच दरम्यान बाळाची आईसुद्धा कारमधून उतरून बाळापर्यंत येते. हा व्हिडीओ ट्वि’टरवर शिरीन खान नावाच्या यु’जरने शेअर केला आहे. व्हिडीओ सोबत तिने कॅ’प्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘असं कसं होऊ शकतं ?’ लोकं ह्या व्हिडिओवर आपल्या वेगवेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यू’जरने आपले म’त मांडताना सांगितले कि गाडीच्या लॉक मॅकॅनिज्म मध्ये एक छोटासा लिवर असतो. त्याला दाबले कि दरवाजा स्वतःहून उघडला जातो. प्रत्येक कारची हीच सिस्टम असते. परंतु चाईल्ड लॉक ऑन आहे ह्याची खात्री करण्यासाठी सर्व दरवाज्यांना बंद करून थांबवले जाऊ शकते.

तसं हा व्हिडीओ कुठला आहे ह्याबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. तुम्ही एकदा व्हिडीओ पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *