Breaking News
Home / मनोरंजन / चालत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्याला प्रवाश्यांनी घडवली चांगलीच अद्दल, १५ किलोमीटर खिडकीबाहेरून ठेवले लटकवत

चालत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्याला प्रवाश्यांनी घडवली चांगलीच अद्दल, १५ किलोमीटर खिडकीबाहेरून ठेवले लटकवत

इंटरनेटवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे नेहमीचं आपलं मनोरंजन करतात. तसेच तुम्ही चोरीचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत. जो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. हा एक रेल्वेतील फुटेज आहे. आणि हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

खरं पाहिलं तर सोशल मीडियाचे जग अनेक मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात. म्हणजेच काही व्हिडीओ हे आपल्याला शिकवण देणारे, धडा देणारे असतात. हे व्हिडीओ गंभीरपणे पाहिले जातात.

असाच एक व्हिडीओ आमच्या टीमकडे आला. कायम मनोरंजन करणारे व्हिडीओ बघणारे आम्ही हा व्हिडिओ पाहून शॉक झालो. कारण हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका चोरीचा होता. आणि ही चोरी हजारो माणसांच्या समोर केलेली होती. आणि जेव्हा ही चोरी लक्षात आली तेव्हा मात्र या चोरांची चांगलीच वाट लागली. इथून पुढे तुमचीही अशी फसवणूक नये, म्हणून आम्ही हा व्हिडीओ समोर आणण्याचे ठरवले. या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एक तरुण रेल्वेच्या बाहेरून खिडकीला लटकलेला आहे. आणि आतील लोकांना तो मला सोडू नका, मला धरून ठेवा, मी पडेल, अशी विनंती करत आहे. हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून एक चोर आहे.

रेल्वेमध्ये चोरीच्या अनेक घटना घडतात. मोबाईल, मौल्यवान वस्तूंची चोरी केली जाते. चोर अतिशय शिताफीने चोरी करतात. पण कधीकधी त्यांचा चोरीचा प्रयत्न फसतो आणि ते प्रवाशांच्या हाती सापडतात. असाच एक मोबाईल चोराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोबाईल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला रेल्वे प्रवाशांनी अशी अद्दल घडवली आहे जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

प्रवाशांनी अशा पध्दतीने त्याला वागवले. जेणेकरून तो पुन्हा चोरी करताना विचार करेल. एवढंच नाही तर त्या चोराला ज्या पद्धतीने वागवले, ते पाहूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. एखाद्या चोराचा जीव वाचवण्यासाठी या प्रवाशी मंडळींनी ही मोठी भूमिका बजावली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, धावत्या ट्रेनमध्ये एक व्यक्ती खिडकीच्या बाहेर लटकलेली दिसत आहे. तर या व्यक्तीचे दोन्ही हात रेल्वेच्या आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनी पकडले आहेत. बाहेर लटकलेली ही व्यक्ती मला पकडा, सोडू नका, धरून ठेवा, असे ओरडत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला वाटेल एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. पण ही बाहेर लटकणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून चोर आहे. ज्याला रेल्वे प्रवाशांनी चांगलाच धडा शिकवला आहे. हा चोर जीव वाचवण्यासाठी रेल्वे प्रवाशांकडे विनंती करत आहे. शेवटपर्यंत या चोराचा जीव वाचवला आणि त्याला शेवटी चोरांच्या ताब्यात दिले.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.