Breaking News
Home / ठळक बातम्या / चालू ट्रेनमध्ये चढत असताना प्रवाश्याचा तोल गेला, परंतु पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

चालू ट्रेनमध्ये चढत असताना प्रवाश्याचा तोल गेला, परंतु पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

प्रवास म्हंटला की अनपेक्षित गोष्टी या आल्याच म्हणून समजा. मग तो प्रवास अगदी जवळच्या जवळ केलेला असेल वा कितीही लांबचा प्रवास असेल. अनेकवेळा हे अनपेक्षित आणि अकल्पित आपल्या बाबतीत घडतं तर अनेकवेळा ते इतरांच्या बाबतीत घडत असतं. अर्थात या सगळ्याची तीव्रता किती आहे यावर या घटना आपल्या मनात आठवण म्हणून राहतात की विस्मृतीत जातात हे ठरत असतं. पण जेव्हा गोष्ट आपल्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणारी असते तेव्हा मात्र सगळच्या सगळं बरोबर लक्षात राहतं आणि त्यातून योग्य धडा ही घेतला जातो.

याचीच प्रचिती देणारी घटना काही दिवसांपूर्वी पटियाला येथे घडली. पटियाला येथील रेल्वे स्थानकातून एक मेल रवाना होणार होती त्यावेळी ही घटना घडून आली. झालं असं की एका तरुणाने वर उल्लेख केलेल्या गाडीत आपली जागा बुक करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते बुकिंग पूर्ण होऊ शकलं नाही. पण आता इच्छित स्थळी जायचंच हे या तरुणाचं ठरलेलं होतं. मग काय हे महाशय पोहोचले रेलवे स्थानकावर ! आता तिकीटाचा पत्ता नाही पण जायचं आहे म्हणून या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. पण या तरुणाची गाडीत चढायची आणि गाडी फलाटावरून सुटायची एकच गाठ पडली असावी. त्यात भरीस भर म्हणजे या तरुणाकडे बऱ्यापैकी सामान होतं.

या सगळ्या धांदलीत हा तरुण घसरला असावा आणि त्याचा तोल गेला असावा किंवा अन्य काही कारणाने तो रेल्वेच्या दरवाज्याला लोंबकळत राहिला. आता अशी अवस्था असली की सहसा मनात बरेच बरेवाईट विचार येतात. पण माणूस जोपर्यंत फलाटावर आहे तोपर्यंत त्याची वाचण्याची शक्यता जास्त असते. इथेही तेच होतं. हा तरुण रेल्वेला लोंबकळत असला तरी फलाटावर असतो. अर्थात गाडीने वेग पकडला असल्याने त्याची आता पाचावर धारण बसायला सुरुवात झालेली असते. कोणाचीही हीच अवस्था होईल म्हणा. बरं हे सगळं चालू असताना फलाटावर ही धावपळ सुरू झालेली असते. त्यात आर. पी.एफ.चे रघुबिर सिंघ हे आघाडीवर असतात. ते गाडीला समांतर असे धावत असतात. खरं तर गाडीचा वेग वाढता असतो आणि त्यामुळे या मुलामध्ये आणि त्यांच्यातील अंतर प्रत्येक क्षणागाणिक वाढत असतं. पण तरीही ते धावत राहतात. मध्ये एक दुसरे दादा सुद्धा मध्ये येत मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण गाडीचा वेगच इतका असतो की काय करु शकणार अशी अवस्था असते.

पण या सगळ्या धावपळीच्या क्षणांमध्ये ही रघुबिर सिंघ हे जिवाच्या आकांताने धावत असतात. एखादा क्षण जरी अनुकूल झाला तरी या पोराला वाचवू हेच कदाचित त्यांच्या मनात चाललं असावं आणि तो क्षण येतो. गाडीचा वेग काहीसा मंदावत जात असतो. तसेच गाडीच्या आतून ही त्या मुलाला पकडलेलं असतं. त्यामुळे तो टिकून असतो. पण एके क्षणी त्याची पकड सुटते अस वाटतं आणि काही वाईट घडतं की काय असं वाटायच्या आत, रघुबिर सिंघ नेमके त्याला धरून पूर्णपणे फलाटावर ओढून घेतात. अक्षरशः एका क्षणात त्यांनी त्याला ओढल्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळतो. त्यावेळी ते टायमिंग साधलं जाणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि नेमकं तेच होतं. वर उल्लेख केलेल्या घटनेतील काही भाग या फलाटावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आमच्या टीमने हेच फुटेज एका वायरल व्हिडियोमार्फत सोशल मीडियावर बघितलं. त्याविषयी अजून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरील अन्य माहिती उपलब्ध झाली. म्हंटलं यानिमित्ताने आपल्या टीमला ही सदर घटनेविषयी माहिती देऊ.

मंडळी, आपण प्रवास करताना घाई होणं, किंवा काही गोष्ट मनासारख्या न होणं हे होऊ शकतं. किंबहुना ते होतंच. पण म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करणं हे केव्हाही योग्य नाही. आपण सगळेच जण सुज्ञ आहात. तेव्हा या घटनेतून आपण सगळेच शिकूया आणि प्रवास करताना घाई टाळूया. कारण गेलेली वेळ कुठे तरी भरून काढता येईल, पण गेलेला जीव वा आलेलं दिव्यंगत्व मात्र कायमचं असेल हे लक्षात ठेवायला हवं. असो. तर मंडळी, हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *