जर एखाद्याला झोप येत नसेल तर त्याला पुस्तक वाचायला सांगा. आपोआप झोप लागेल तीही एकदम गाढ. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक आहे. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवशीसाठी तयार होतो. झोप शरीरासोबत मन, बुद्धि आणि इंद्रियांनाही नवता देते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होतं. झोप शरीराला गरजेची असते पण अति झोप हानिकारक सुद्धा असते. काही जण रात्री काम करतात आणि दिवसा झोपतात. असं करणं प्रकृतीच्या नियमांविरोधात आहे. यामुळेच माणूस कमी वयातच म्हातारा आणि रोगी होतो. लहान मुलांबाबत हे सगळे निकष वेगळे पडतात. लहान मुलं दणकून खेळतात, पुरेपूर झोपतात. कमी झोप पडली तर जमेल तिथे झोपतात. अगदी गाडीवरसुद्धा लहान मुले झोपताना आपण बघतो. टीव्ही बघता बघता झोपतात. यापेक्षा अति म्हणजे झोप कंट्रोल होत नसेल तर शाळेमध्ये सुद्धा लहान मुलं झोपतात.
लहान मुलांच्या झोपण्याच्या, खेळण्याच्या वेळा असतात म्हणून ते फिट असतात. को’रोनाच्या काळातही लहान मुलांना खूप कमी धोका होता. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लहान मुलं हेल्दी असतात. आणि हेल्दी राहण्यासाठी झोप खूप महत्वाची असते. आता आमच्या हाती एक असा व्हिडीओ लागला आहे, जो पाहून तुम्हाला झोपेचं महत्त्व लक्षात येईल.
या व्हिडीओत एका लहान मुलाला प्रचंड झोप आलेली आहे, म्हणून त्याने आहे त्या ठिकाणी झोपण्याचे ठरवले. अर्थात त्याने ठरवले नाही, त्याला झोप कंट्रोल झालेली नाही, म्हणून तो झोपलाय हे दिसून येते. आता तो झोपलाय कुठे? हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर हा भाऊ थेट शाळेत झोपलाय… तेही पाठांतर चालू असताना. समजा, वर्गात शिक्षक शिकवत असते, तर झोप येणे समजू शकतो.
पण अख्खा वर्ग पाठांतर करत आहे. शिक्षक पुढे म्हणत आहेत आणि विद्यार्थी त्यांच्यामागे म्हणत आहेत. एवढा मोठा आवाज होत आहे, तरीही या छोट्या भावाची झोप काही आवरत नाहीये. संपूर्ण व्हिडीओत त्याचे डोळे एकदाही उघडलेले दिसत नाही. यावरून त्याला किती गाढ झोप आहे, हे लक्षात येईल. अर्थात हे झोपप्रेमी मंडळी कुठेही, कधीही आणि कितीही गोंगाट असला तरी झोपू शकतात.
तर या झोपप्रेमी मुलाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. बाकीच्यांचे पाठांतर चालू असताना हा छोटा भाऊ इकडून- तिकडून पडतो आहे. परत झोपेतच उठून बसतोय. व्हिडीओ बघताना एक वेळ अशी येते, आपल्याला पण वाटतं, असं गाढ आणि मनसोक्त झोपणं आपल्या आयुष्यात कधी येणार. शेवटी या मुलाला झोप इतकी अनावर होते की, व्हिडीओच्या शेवटी तो थेट पद्धतशीर आडवा झालेला आहे. हा व्हिडीओ मनोरंजन करणारा तर आहेच पण त्यासोबत आपल्याला झोपेचं महत्व सांगणाराही आहे. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :