Breaking News
Home / मनोरंजन / चालू वर्गामध्ये झोपा काढणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

चालू वर्गामध्ये झोपा काढणाऱ्या ह्या मुलीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

शाळेत जाणं ही बाब एरवी अगदी सामान्य वाटते. पण ज्यांना शाळेत जावं लागत असत त्या विद्यार्थ्यांसाठी बहुधा ही एक नावडती गोष्ट असते. पण काळाचा महिमा बघा, वय सरल आणि मोठेपण आलं की हेच शाळेत जाणं आपण सगळे मिस करतो. किंबहुना आपल्या प्रत्येकाच्या शाळेच्या सोशल मीडिया ग्रुपवर निदान एकदा तरी ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी’ छापाचे मेसेजेस आपण वाचलेले असतात. बरं ते काही केवळ फॉरवर्ड मेसेजेस नसतात. त्यात खरंच ती हुरहूर असते. हुरहूर त्या निसटलेल्या निरागस क्षणांची असते ! पण मग आपण हाच आनंद लहान मुलांमध्ये शोधू लागतो. त्यांचं शाळेत जाणं त्यांच्यापेक्षा आपण काही वेळा जास्त आनंदाने जगतो.

तसेच खऱ्या आयुष्यात हे सगळं होत असताना सोशल मीडियावर सापडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक गंमतीशीर व्हिडियोजचा आनंद ही आपण घेत असतो. कारण थेट शाळेत आणि वर्गात जाऊन मजा करणं हे सध्या याच माध्यमातून जमू शकतं. बरं हे व्हिडियोज पुन्हा पुन्हा पाहून, पुनःप्रत्ययाचा आनंद ही घेता येतो. आज असाच आनंद आपल्या टीमला घेता आला. झालं असं की आपली टीम लेख लिहिण्यासाठी म्हणून विषय निवडत होती. पण धड काही ठरेना. मग थोडा वेळ जाऊ दे असंच काही बघू म्हणून असेच कोणतेही व्हिडियोज बघायला घेतले.

त्यातूनच आजच्या लेखाचा विषय असलेला व्हिडियो बघण्यात आला. हा व्हिडियो तसा बऱ्यापैकी जुना आहे. त्यामुळे या व्हिडियोत दिसणारी मुलं आता मोठी झाली असणार हे नक्की. पण या व्हिडियोच्या वेळी ती अगदीच लहान म्हणजे पहिलीत वगैरे असावीत अस वाटतं. या मुलांचा एक तास चालू असतो. बहुधा इंग्रजी भाषेचा तास असावा. मुलं अगदी रांगेने बसलेली असतात. पण त्यातील एक मुलगी आपलं लक्ष वेधून घेते. कारण या छोट्या मॅडमला झोप अनावर झालेली असते. आता लहान मुलं आणि पेंगण हे काही नवीन नाही. अनेकवेळा रात्री कारण नसताना जागरण होऊन जातं आणि मग दिवसा झोप येते. तर काही वेळा मुलं अंमळ झोपळू असतात. कारण काहीही असलं तरी प्रत्येकजण यातून कधी ना कधी गेलेला असतोच. त्यामुळे या मुलीचं वागणं बघून हसू येतं. पण ज्या अर्थी हा व्हिडियो चित्रित केला जातो आहे त्याअर्थी पाठीमागे एखादे शिक्षक असावेत असा अंदाज आपण बांधतो. हा अंदाज खरा ही ठरतो. आता आपल्याला उत्सुकता असते ते हे शिक्षक कसे वागणार याची ! कारण काही वेळेस शिक्षक अशावेळी चट्कन ओरडतात.

पण या व्हिडियोत न दिसणारे पण हा व्हिडियो चित्रित करणारे शिक्षक मात्र कल्पकता दाखवतात. तिला उठवण्यापेक्षा किंवा इतरांना तिला उठवायला सांगण्यापेक्षा ते इंग्रजी कविता म्हणायला सुरुवात करतात. आता ते म्हणतात म्हणून मग मुलं ही सुरू होतात. एरोप्लेन म्हणजे विमानाविषयीची ही कविता असते. त्यांचा हा उपाय काम परीणामकारक ठरतो. फरक एवढाच की निद्रादेवीच्या अधीन असलेलं या चिमुकलीच विमान अजूनही स्वप्ननगरीत उडत असतं. पण थोडीबहुत जाग आलेली असते, त्यामुळे झोपाळलेल्या डोळ्यांनी तिचं आजूबाजूला बघणं चालू असतं. तसेच झोके ही येतच असतात. पण शेवटी, ‘ओव्हर द हिल्स’ या वाक्याला मात्र या चिमुकलीच विमान दप्तरावर येऊन विसावत. पण त्या झटक्याने तिला जी जाग येते ती पूर्ण झोप पळवून नेते. इतकंच काय पण आपण अगदी गाढ झोपलो होतो आणि हे सगळे आपल्याकडे बघताहेत याचं भान येतं. त्यानंतर मात्र सगळ्यांनी दाबून ठेवलेलं हसू बाहेर पडत. गंमतीचा भाग असा की यात शिक्षक आणि ही छोटी पोर सुद्धा सामील होऊन जाते. आपल्याबद्दल हसताहेत म्हणून तिच्या मनात राग नसतो आणि आजूबाजूची मुलं सुद्धा तिला चिडवत नसतात. इतकंच काय पण शिक्षक सुद्धा ही बाब हसण्यावारी नेतात आणि शाळेत डुलक्या घेतल्याबद्दल तिला ओरडत नाहीत हे आवडून जातं. कारण मुलं मोठी झाली की अजून शिस्तीने वागणं अपेक्षित असलं तरी लहणपनी त्यांना ओरडत सुटलं तर त्यांच्या मनात काही बाबींची भीती राहू शकते. या उलट त्यांच्या कलाकलाने घेत त्यांना शिकवलं तर ते ही आनंदाने नवनवीन गोष्टी शिकतात. एक प्रकारे या व्हिडियोतुन ही हे दिसून येतं.

कारण या व्हिडियोत ऐकायला येणारी कविता, मुलं अगदी आनंदाने म्हणताना दिसतात. तसेच अगदी आरामात पण शिस्तीत बसलेली असतात. शाळेत असल्याचं दडपण त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी दिसून येत नाही. असो. असे एक ना अनेक चांगल्या गोष्टी निरीक्षण म्हणून सांगता येतील. पण मग तुम्हाला तो व्हिडियो बघायचा झाला तर त्याची गंमत निघून जाईल. त्यामुळे सध्या इथेच थांबतो. पण मंडळी, आपल्यासाठी म्हणून आपल्या टीमने हा व्हिडियो खाली शेअर केला आहे. आपण हा व्हिडियो बघून स्वतः त्याचा आनंद घ्या. ते निरागस दिवस या व्हिडियोच्या माध्यमातून पुन्हा एकदा काही क्षण का होईना अनुभवा ! बघा आनंद, नक्की मिळेल. आमच्या टीमला तर हा आनंद नक्कीच मिळाला आहे. आता तुमची वेळ आहे.

चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.