असे म्हणतात कि, कोणतेही काम हे लहान नसतं. जर आपण आपले सर्व काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने केले तर आपल्याला निश्चितच यश मिळतं. बॉलीवूडच्या या स्टार्स सोबतही असेच काहीसे घडले. सध्या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे हे फिल्मी स्टार एकेकाळी बॉलिवूडमधील गाण्यांच्या बॅकग्राउंड ला नाचत होते. यानंतर त्यांनी सतत परिश्रम घेतले आणि आज ते मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये दिसतात. चला तर आजच्या लेखात आपण अश्या काही बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी एकेकाळी चित्रपटांत बॅकग्राउंड डान्सर्स म्हणून काम केले आहे.
दिया मिर्झा
दीया मिर्झा आज बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. यानंतर तिचे फिल्मी करिअर चांगले सुरु झाले. मध्ये तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने ‘संजू’ चित्रपटाद्वारे बराच काळानंतर चित्रपटांत काम केले. अलीकडेच ती ‘थप्पड’ या चित्रपटातही दिसली होती. आपल्याला आश्चर्य वाटेल कि, अभिनेत्री होण्यापूर्वी दिया मिर्झाने साउथच्या चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. ती ‘इन स्वसा कातरे’ ह्या चित्रपटाच्या टायटल सॉंग मध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती. दिया १८ वर्षांची असताना तिने ‘मिस एशिया पॅसिफिक’ ची उपाधी आपल्या नाववार केली.
शाहिद कपूर
‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहिद एक चांगला अभिनेता तसेच एक उत्तम डान्सर आहे. याचे कारण म्हणजे शाहिदने चित्रपटात येण्यापूर्वी बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम केले आहे. शाहिदला लहानपणापासूनच नृत्यात रस होता. कदाचित तो स्टार असेल पण तरीही चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी त्याने खूप परिश्रम केले. शाहिद कपूरने ताल चित्रपटातील ‘कही आग लगे लग जाये’, दिल तो पागल है चित्रपटातील ‘मुझको हुई ना खबर’ गाण्यांवर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आहे. सध्या शाहिद कपूरचीही गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांमध्ये केली जाते.
काजल अग्रवाल
काजल अग्रवाल ही साउथ फिल्म इंडस्ट्रीची एक नामांकित अभिनेत्री आहे. तिने ‘सिंघम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मुख्य अभिनेत्री होण्यापूर्वी, काजलने ऐश्वर्या रायच्या ‘क्यो हो गया’ चित्रपटातील ‘उल्झने’ गाण्यात पार्श्वभूमी नर्तक म्हणून काम केले आहे.
अर्शद वारसी
बॉलिवूडमध्ये अर्शद वारसी हे देखील एक नाव गाजलं आहे. अर्शद वारसी यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ८० च्या दशकात त्याने जितेंद्राच्या अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्स केला आहे. त्याने जितेंद्र आणि किमी काटकर ह्यांच्या आग से खेलेंगे चित्रपटातील ‘हेल्प मी’ ह्या गाण्यात साईड डान्सर म्हणून काम केले होते. पार्श्वभूमी नर्तकानंतर अर्शद नृत्यदिग्दर्शक बनला. अनिल कपूर यांच्या ‘रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा’ हे गाणं त्याने कोरिओग्राफ केले आहे. १९९६ मध्ये आलेल्या ‘तेरे मेरे सपने में’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून अर्शद बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तथापि, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ नंतर त्याला खरी लोकप्रियता मिळाली.
सुशांतसिंग राजपूत
सुशांतसिंग राजपूत हा लोकप्रिय कोरिओग्राफर शामक डावर ह्याच्या डान्सिंग ग्रुपचा एक भाग होता. हृतिक रोशनचे ‘धूम मचाले’ हे धूम २ चित्रपटातील टायटल सॉंग आपणा सर्वांना लक्षात असेलच, त्यामध्ये पार्श्वभूमी नृत्य करणारा सुशांतसिंग राजपूत होता. यानंतर तो टीव्ही शोमध्येही दिसला. ‘पवित्र रिश्ता’ सीरिअल मधून तो लोकांच्या घराघरांत पोहोचला. त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. ‘काय पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने ‘एम एस धोनी’ चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळवली.
डेझी शाह
डेझी शाहने सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तथापि, फारच थोड्या लोकांना माहिती असेल की डेझीने सलमान खानची फिल्म तेरे नामच्या ‘लगन-लगन’ गाण्यात पार्श्वभूमी नर्तक म्हणून काम केले आहे.
या तारांकडून तुम्हीही शिकवण घ्या आणि आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कोणतीही लहान कामे करण्यास घाबरू नका.