Breaking News
Home / बॉलीवुड / चित्रपटांत सेलिब्रेटींनी घातलेल्या कपड्यांचे नंतर काय होते

चित्रपटांत सेलिब्रेटींनी घातलेल्या कपड्यांचे नंतर काय होते

प्रत्तेक शुक्रवारी एक चित्रपट सिनेमागृहात हजेरी लावतो. यातील काही चित्रपट पडद्यावर खूप धमाल करतात आणि सुपरहिट होतात, तर काही हिट होतात आणि काही फ्लॉप तर काही सुपरफ्लॉप होतात. आता चित्रपट सुपरहिट असो किंवा फ्लॉप पण त्या चिञपटातील कलाकारांच्या कपड्यावर भाष्य केले जाते. चित्रपटांत कपड्यांना एखाद्या भूमेकेइतके महत्व असते. अगदी गब्बर सिंग पासून ते मोगॅम्बो, आणि शाहरुख खानच्या रावण पासून ते रजनीकांतच्या रोबोट पर्यंत प्रत्येकाच्या कपड्यांमध्ये विविधता आढळून आली आहे. पण आपल्याला माहिती आहे का सेलिब्रेटीने घातलेल्या कपड्यांचे नंतर काय होते? प्रत्येकाच्या मनात सेलिब्रेटीच्या कपड्यां विषयी असं वाटत असतं कि, जर असे कपडे मला मिळाले असते तर. सेलेब्रेटीजने घातलेले कपडे लगेच फॅशन होऊन जाते. अनेकजण त्याच स्टाईलचे, त्याच पॅटर्नचे कपडे घालण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तिथूनच नवीन नवीन ट्रेंड सुरु होतात. परंतु सेलेब्रेटीजने चित्रपटांत वापरलेल्या ह्या कपड्यांचे नंतर काय होत असेल? असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेलच. चला तर जाणून घेऊया आजच्या लेखात, ह्या कपड्यांचे नक्की काय होते ते.

या प्रश्नाचे खरे उत्तर यशराज फिल्मची स्टायलिस्ट आयशा खन्नाच्या मुलाखतीत मिळाले. एका मुलाखतीत आयशा खन्नाने सांगितले की, शक्यतो सेलिब्रेटीने वापरलेले कपडे जपून ठेवले जातात. त्याबरोबर चित्रपटाचा टॅग त्या कपड्यावर लावला जातो. त्यानंतर या कपड्यांना ज्युनिअर कलाकारांन साठी वापरले जातात. त्याच बरोबर त्या प्रोडक्शन हाऊस मधे दुसऱ्या चित्रपटासाठी याचा वापर केला जातो. आयशा पुढे म्हणते की या गोष्टीकडे पूर्ण लक्ष ठेवले जाते. दुसरे कलाकार हे कपडे वापरताना पहिल्या चित्रपटात याचा वापर केला आहे, हे प्रेक्षकांना कळू नये त्याकडे नीट लक्ष दिले जाते. कारण हे कपडे मोठया कलाकाराने अगोदर घातले आहेत, हे प्रेक्षकांना कळू नये त्यासाठी त्याकडे लक्ष दिले जाते. हे जरुरी नाही की प्रत्तेक वेळी असे होईल. काही कलाकार त्यांना आवडलेला कपडा स्वतः जवळ जपून ठेवतात. केव्हा असेही होते मोठा कलाकार डिझाईन केलेले कपडे चित्रपटासाठी देतो आणि चित्रपट तयार झाल्यानंतर ते पुन्हा परत घेतले जातात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या कपड्याचा लिलाव केला जातो. चित्रपट रोबोट मधे रजनीकांत आणि ऐश्वर्या रायने घातलेल्या कपड्यांचा एनजीओ साठी पैसे जमवण्यासाठी ऑनलाईन लिलाव केला.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.