Breaking News
Home / बॉलीवुड / चित्रपटांपासून खूप दूर आहे बोनी कपूरची मोठी मुलगी, स्वतः सांगितले ह्यामागचे कारण

चित्रपटांपासून खूप दूर आहे बोनी कपूरची मोठी मुलगी, स्वतः सांगितले ह्यामागचे कारण

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूरच्या घरात एका पेक्षा एक सरस कलाकार आहेत. या घराला छोटे बॉलिवूड सुद्धा म्हटले जाते. खरंच बोनी कपूरच्या घरात अभिनेता आणि अभिनेत्री सहज मिळतील, ज्यांनी पडद्यावर मोठं नाव कमावलं आहे. त्यांची पत्नी श्रीदेवी एक नामवंत अभिनेत्री होती. बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूड मधे धम्माल उडवत आहे. तसेच त्यांची दुसरी मुलगी जानवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांची छोटी मुलगी ख़ुशी ऍक्टिगचे धडे घेत आहे. सर्व कुटुंबाने मिळून बॉलिवूड मधे आपलं करियर केले आहे. परंतू याच घरात एक अशी व्यक्ती आहे जी बॉलिवूड पासून दूर राहणे पसंत करते, खरंतर आम्ही बोनी कपूर ह्यांची मोठी मुलगी अंशूला कपूर विषयी बोलत आहोत. अंशुला बॉलिवूड पासून दूर राहते. ती अभिनयापासून चार हात लांब आहे. बरं ती असं का करते ते जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक आहेत. लोकांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. याचे उत्तर तिने स्वतः दिले आहे.

बॉलिवूड मधे का नाही अंशूला?

बोनी कपूरची जेष्ठ मुलगी अंशूलाने बॉलिवूड मधे न येण्याचे कारण सांगितले. तिने सांगितले की तिला लोकां समोर बोलायला भीती वाटते, तर मग ती पडद्यावर कशी ऍक्टिग करेल? त्याच बरोबर तिने सांगितले की मला ऍक्टिग करायला खूप वेळा सांगितले. पण माझ्या मनातील भीती मुळे मी ऍक्टिग करू शकत नाही. त्यामुळे मी चित्रपट सृष्टीपासून दूर राहिले आणि सामाजिक कामे करू लागली. यामुळे मला खूप चांगलं वाटतं.

अंशूलाने पुढे सांगितले माझ्या आईने मला अभिनेत्री बनायला प्रोत्साहित केले. तिला वाटत होते मी नामवंत अभिनेत्री बनावी. पण असे घडले नाही. करण, मला स्टेजची भिती वाटते. यावरून स्पष्ट होते कि अंशूलाला अभिनेत्री बनण्यात काहीही रस नव्हता. म्हणून तिने आपला वेगळा मार्ग निवडला आणि तिने भाऊ बहिणी पासून वेगळा मार्ग निवडला आणि त्यात करियर केले. अंशूलाचे भाऊ बहीण सिनेसृष्टीत आपला करियर करत आहेत.

कुटुंबा सोबत स्पॉट होते अंशूला

भले अंशूला बॉलिवूडचा हिस्सा नसेल पण तिचे कुटुंब कलाकारांनी भरलेले आहे. त्यामुळे ती जिथे जाते तिथे तिथे तिच्यावर कॅमेरा रोखलेला असतो. केव्हा केव्हा ती फोटो काढायला फोटोग्राफरला नकार देते. परंतु तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. अंशूलाला जास्त करून आपल्या कुटुंबा सोबत पाहायला मिळते. एव्हढच नाही तर अंशूला आपला भाऊ अर्जुन कपूर सोबत क्लोज आहे. त्याच्या सोबत ती खूप वेळ घालवते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.