सोनाली बेंद्रे आपल्या काळातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. कॅन्सर वर मात केल्यावर सोनाली बेंद्रे आता एक सामान्य जीवन जगत आहे. चित्रपटांत सोनालीचे सौंदर्य पाहून सर्वांचे मन घायाळ झाले होते. तिचे नाव अनेक सेलेब्रेटींसोबत जोडले गेले, परंतु सर्व अफवांनंतर सोनाली बेंद्रेने अचानक गोल्डी बेहल सोबत लग्न केले. सोनाली बेंद्रेच्या लग्नाला आता १७ वर्षे झाली आहेत. आज आम्ही सोनाली बेंद्रे आणि दिग्दर्शक गोल्डी बेहल ह्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. सोनालीच्या प्रत्येक कठीण समयी तिचा पती नेहमीच तिच्यासोबत एक आधार बनून राहिला आहे. तो प्रत्येक क्षणी सोनालीची काळजी घेताना सोबत दिसतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, एक काळ असा सुद्धा होता, जेव्हा सोनाली गोल्डीचा चेहरा पाहणे सुद्धा पसंत करत नव्हती. चला तर जाणून घेऊया एकेकाळी गोल्डीचा द्वेष करणारी सोनाली कशी काय मग नंतर त्याच्या प्रेमात पडली ते.
सोनाली बेंद्रे ने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९९४ मध्ये आलेल्या ‘आग’ चित्रपटाने केली होती. ह्या चित्रपटात सोनालीसोबत गोविंदा सुद्धा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त काही कमाल दाखवू शकला नाही. ह्यानंतर १९९६ मध्ये सोनालीचा ‘दिलजले’ हा चित्रपट आला. ह्या चित्रपटात सोनालीचा अभिनय सर्वांना आवडला. ह्यानंतर सोनाली बेंद्रेने सलमान खान सोबत ‘हम साथ साथ है’ मध्ये काम केले. तर गोल्डी बेहलने २००१ मध्ये आलेल्या ‘बस इतना सा ख्वाब है’ ह्या चित्रपटापासून आपल्या दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. त्या अगोदर त्याने १९९८ मध्ये आलेल्या ‘अंगारे’ चित्रपटासाठी को प्रोड्युसर म्हणून काम केले होते.
पहिली भेट
सोनाली आणि गोल्डीची पहिली भेट १९९४ मध्ये एका चित्रपटाच्या सेट वर झाली होती. सोनालीला पाहताच क्षणी गोल्डीला आवडली होती. जसा चित्रपट संपला गोल्डीला खूप दुःख झाले. त्याला सोनालीपासून दूर जायचे नव्हते. ह्याच दरम्यान गोल्डीने महेश भट्ट सोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणे चालू केले. त्याच चित्रपटात सोनाली सुद्धा काम करत होती. ह्याप्रकारे गोल्डीला पुन्हा एकदा सोनालीसोबत काम करण्याची संधी मिळाली. गोल्डीने पहिल्यावेळी प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यावर सोनालीने नकार दिला होता. गोल्डीने बहलने एका मुलाखती दरम्यान सांगितले कि, ‘सोनालीला माझा चेहरा पाहणेसुद्धा पसंत नव्हते. कारण जेव्हा तिची नजर माझयावर पडायची तेव्हा ती तोंड फिरवायची.’
अश्याप्रकारे झाली मैत्री
चित्रपटाच्या कामामुळे अनेकदा दोघांची भेट होत असे, परंतु दोघे एकमेकांशी बोलत सुद्धा नसत. नंतर एके दिवशी गोल्डीच्या बहिणीने दोघांना एका पार्टी मध्ये भेटवले होते. ह्यादरम्यान दोघेही चांगले मित्र बनले. काही दिवसानंतर सोनालीला जाणवू लागले कि, गोल्डी खूपच केअरिंग आहे आणि तिची खूप काळजी करतो. हळहळू दोघांचे भेटणे आणि बोलणं वाढू लागले. सोनाली आपले प्रत्येक सुख दुःख गोल्डी सोबत शेअर करू लागली होती. तिला गोल्डी एक आधार बनला होता. तर दुसरीकडे गोल्डीला सोनाली सुरुवातीपासूनच आवडली होती. तो तिची मनापासून काळजी करायचा. तिला जेव्हा गरज लागेल तेव्हा तो तिच्या मदतीसाठी तयार असायचा. ह्या भेटीगाठी दरम्यान दोघांची हि मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही कळलं नाही.
१९९८ मध्ये एका पार्टी दरम्यान गोल्डी बहलने आपल्या घुडघ्यावर बसून सर्वांसमोर सोनालीला लग्नासाठी प्रपोज केले. सोनालीने सुद्धा त्याचा प्रेमाचा स्वीकार केला. ४ वर्षे डेटिंग केल्यानंतर १२ नोव्हेंबर २००२ ला गोल्डी आणि सोनालीने लग्न केले. दोघांनाही एक १३ वर्षाचा प्रेमळ मुलगा असून, मुलाचे नाव रणवीर आहे. कॅन्सरच्या आजारामुळे सोनाली खूप काही काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर आहे. परंतु ती सोशिअल मीडियावर आपल्या दैनंदिन घटना शेअर करत असते.