Breaking News
Home / मनोरंजन / चित्रपट पाहत असताना इमोशनल सिनच्या वेळी ह्या लहान मुलाला आलेले रडणं पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

चित्रपट पाहत असताना इमोशनल सिनच्या वेळी ह्या लहान मुलाला आलेले रडणं पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

सिनेमा हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि बऱ्याच अंशी जिव्हाळ्याचा ही विषय असतो. कारण नाही म्हंटलं तरी, मनोरंजनाचं हे माध्यम आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या अनेक स्मृती आपल्याला देऊन जातं. म्हणूनच आजही जुने चित्रपट त्यातील डायलॉग्ज आणि गाण्यांसहित आठवतात. बरं हे केवळ मोठ्या माणसांपरत मर्यादित असावं असं वाटत नाही. या सिनेमांचा प्रभाव लहान मुलांवरही पडतोच पडतो. याचीच साक्ष देणारा एक व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला. म्हंटलं आपल्या सिनेमाप्रेमी वाचकांसाठी यावर लिहिलंच पाहिजे. त्यातूनच या लेखाचा घाट घातला गेला आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आहे एका लहान मुलाचा. लहान म्हणजे अगदीच लहान. कदाचित त्याचं बोबडे बोल बोलणारं वय असावे. तर या व्हिडियोत आपल्याला हा मुलगा एक गाणं पाहताना दिसतो. कंन्नना कंन्ने हे ते सुप्रसिद्ध गाणं. २०१९ साली प्रसिद्ध झालेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या, ‘विश्वासम’ या तामिळ चित्रपटातलं हे गाणं. या चित्रपटाची कथा अगदी हृदयाला स्पर्शून जाते अशी आहे.

चित्रपटात एका अशा बापाची कथा आहे जो श्रीमंत आणि ताकदवान आहे. पण आपल्या पत्नी आणि मुलीपासून दुरावला आहे. पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावून जातो. पण त्यात त्याने त्याच्या मुलीला तो तिचा पिता असल्याचं सांगू नये अशी एक अट त्याच्या पत्नीकडून टाकण्यात येते. तो ती अट मान्य करून त्यांच्यासोबत राहू लागतो. पण सरतेशेवटी त्या मुलीला हे सत्य कळतच. याचा तिच्या मनावर परिणाम होतो. पण सरतेशेवटी तिच्या एका शालेय स्पर्धेदरम्यान या बाप लेकीची पुन्हा भेट होते आणि हे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतं. त्यातील क्लायमॅक्सचे सीन्स तर अतिशय अप्रतिम झाले आहेत.

वर ज्या मुलाचा उल्लेख झाला तो हेच क्लायमॅक्सचे क्षण बघत असतो आणि सोबत ‘कंन्नना कंन्ने’ हे गाणं सुरू असतं. त्यामुळे एकीकडे अगदी आर्त स्वरातलं हे गाणं आणि त्याला साजेल असे सीन बघून कोणालाही भरून येईलच. त्यात हे लहान मुलं म्हणजे हळवेपणा आलाच. त्यामुळे गाणं जस जसे पुढे जातं, तस तसा हा लहान मुलगा रडायला लागतो. सुरुवातीला केवळ त्याच्या चर्येवरील भाव बघून आपल्याला कळत असतं की त्याला एकदम भरून आलंय. पण तीस सेकंदाच्या आसपास मात्र त्याच्या भावनांचा बांध फुटल्या सारखा होतो.

त्याचं वय पाहता त्याने इतक्या एकरूप होत हा सिन बघणं आणि त्याचं रडणं हे मनाला स्पर्शून जातं. कदाचित त्याच्या मनात काही उलथापालथ होत असेल का अस ही वाटून जातं. पण त्याच्या मनात काय चाललेलं असतं ते मात्र कळायला मार्ग नाही. असो. हा व्हिडियो पुढे काही सेकंद चालतो. जेव्हा त्या सीन्स मध्ये बाप लेकीला मिठी मारतो तेव्हा तर या लहनग्याच्या भावना अगदी उचंबळून येतात. आपण त्याचा रडवेला चेहरा पाहत राहतो आणि काही वेळात हा व्हिडियो संपतो.

खरं तर अगदी कमी वेळेचा हा व्हिडियो आहे. तसेच सुरुवातीस हे मूल का रडतय ते कळत नाही. पण या सिनेमाविषयी माहिती घेतल्यावर मात्र त्याच्या मनात काय चाललं असेल याची कल्पना करू शकतो. पण केवळ कल्पनाच. असो. छोटा असला तरी हृदयाला स्पर्शून जाणारा असा हा व्हिडियो आहे. आपल्याला संधी मिळाली तर नक्की बघा. आपल्या मनाला तो स्पर्शून जाईल हे नक्की. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे सुद्धा कळवा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. त्यापाठी प्रोत्साहन असतं ते आपल्या सकारात्मक प्रतिक्रियांचं. हे प्रोत्साहन आजही मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहू दे. आपली टीमही जशी आज उत्तमोत्तम लेख लिहिते आहे त्याचप्रमाणे यापुढेही लिहीत राहीलच याची खात्री असू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि वाचण्याचा आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.