Breaking News
Home / मनोरंजन / चुकीचे पाढे म्हणताना देखील ह्या मुलाचा आत्मविश्वास पाहून तुम्हालाही हसू येईल, बघा हा वायरल व्हिडीओ

चुकीचे पाढे म्हणताना देखील ह्या मुलाचा आत्मविश्वास पाहून तुम्हालाही हसू येईल, बघा हा वायरल व्हिडीओ

मराठी गप्पावर गेल्या काही काळात आपण अनेक वायरल व्हिडियोज विषयी वाचलं असेल. आणि ह्या व्हिडीओजना मिळणाऱ्या तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. यात प्रामुख्याने लहान मुलाच्या वायरल व्हिडियोजचा समावेश होता, हे आपल्या चाणाक्ष बुद्धीस जाणवलं असेल. कदाचित लहान मुलांच्या निरागसतेमुळे ते जे बोलतात, ज्या प्रमाणे वागतात त्याचं आपल्याला आपसूक कौतुक किंवा गंमत वाटते. अर्थात अनेक वेळेस या मुलांचे विचार आपल्याला अगदी अंतर्मुख ही करून जातात. पण आज मात्र आमच्या टीमच्या नजरेस असा एक व्हिडियो पडला, ज्याने आम्ही स्वतः फार गंमत अनुभवली. म्हणूनच आम्ही हा व्हिडीओ मनोरंजापार हेतू तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत आहोत.

हा व्हिडीओ आहे एका लहान मुलाचा जो शाळेत पाढे म्हणून दाखवतो आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? मुलं शाळेत पाढे वगैरे म्हणतातच. हो अगदी बरोबर. पण ते चुकीचे म्हणत असतील तर. तर तुम्ही म्हणाल. तसंही होतं असतं, कधी कधी. पण यात किती मुलं अगदी आत्मविश्वासाने हे करताना दिसतात. अगदी थोडी. हा त्यातलाच एक धीट म्हणावा असा मुलगा. अर्थात ही माहिती देण्यामागे अभ्यास करू नये, असं म्हणण्याचा आमच्या टीमचा अजिबाज उद्देश नाही. किंबहुना, मुलांनी अभ्यास मन लावून आणि लक्ष देऊन करावा, हेच आमचं म्हणणं आहे. पण कधी कधी यांमुळे जी गंमत निर्माण होते, ती दुर्लक्षित करता येत नाही. कारण हा मुलगा, पाढे बोलताना काही भाग व्यवस्थित बोलत होता, तर काही भाग चुकलेला आहे. यामुळे तो पूर्णपणे चुकतो आहे, असं नाही. पण तरीही पूर्ण जोर काढून पाढे म्हणण्याची त्याची पद्धत पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणते. त्यात त्याला प्रोत्साहन द्यायला कॅमेराच्या पाठी कोणीतरी आहेच.

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा आणि आनंद घ्या. अर्थात हा व्हिडीओ मजेशीर असला, तरीही सध्या या मुलाने आपल्या अभ्यासात योग्य ती प्रगती साधली असावी आणि यापूढे प्रगती साधावी अशी मराठी गप्पाच्या टीमची या मुलाला शुभेच्छा ! आपण वर वाचलंय त्याप्रमाणे अनेक लहान मुलांचे वायरल व्हिडियोज बद्दल आमच्या टीमने वेळोवेळी लिखाण केलेलं आहे. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास आपण या वेबसाईटवरील सर्च ऑप्शनचा वापर करावा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास विविध लेख वाचता येतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा हा वायरल व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.