Breaking News
Home / जरा हटके / चुकी कोणाची माहिती नाही, पण ह्या माणसाने अचूक वेळेवर जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल

चुकी कोणाची माहिती नाही, पण ह्या माणसाने अचूक वेळेवर जे केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल

लहान मुलं आपल्या आजूबाजूला असणं म्हणजे जम्माडी जंमत, मस्त गंमत असंच आपल्याला बहुतेक वेळा वाटतं. बऱ्याच अंशी बरोबर ही आहे ते ! कारण या लहान मुलामुलींचं निरागस वागणं, तसच चुरचुरीत बोलणं, प्रश्न विचारून भंडावून सोडणं हे सगळं आपल्याला हवंहवंसं वाटतं. त्यांच्या या काळातला वावर मनात साठवून ठेवावा असाच असतो. पण यासोबतच ही मंडळी प्रचंड उपदव्यापी असतात हे ही मान्य करायला हवं.

कारण त्यांचं हे वयंच असं मनात कतुहुल असलेलं असतं. तसेच थोडा वेंधळेपणा ही असतो. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे आपल्याला कशापासून धो’का होऊ शकतो वगैरे विचार मनात अनेकवेळा येत नाहीत. तेवढा अनुभव ही नसतो म्हणा. परिणामतः ही मुलंमुली आजूबाजूला असली की त्यांच्यावर लक्ष ठेवणं क्रमप्राप्त असतं. अर्थातच ही जबाबदारी पालकांची आणि ते जवळ नसतील तर इतर आप्तस्वकीयांची असते. पण यात काही वेळा दुर्लक्ष झालं तर असे काही प्रसंग येतात की प्राण अगदी कंठाशी येतात. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो अतिशय कमी वेळेचा व्हिडियो आहे. कमी म्हणजे अगदीच कमी. केवळ आठ सेकंद इतकाच वेळ या व्हिडियोचा आहे. पण या आठ सेकंदात ही वर म्हंटल्याप्रमाणे आपले प्राण कंठाशी येतात. कारण यात एक लहान पोर मृ’त्यूच्या दाढेत जवळजवळ जाऊन येतं.

होतं हे की आपल्याला व्हिडियो सुरू झाल्यावर एक रहदारीचा रस्ता दिसतो. एखाद्या वर्दळीच्या भागातला हा रस्ता असावा असं जाणवतं. कारण रस्त्याच्या कडेला काही दुकानं दिसून येतात. तर एक सॉफ्ट टॉय खेळणी विक्रेत्याची जागा ही दिसून येते. तसेच एक स्त्री दुचाकीवर बसलेली असते आणि तिच्या पाठी एक लहान मुलगी बसलेली असते. या स्त्रीला रस्त्यावरून दुचाकी न्यायची असते पण वाहतूक थांबत नसल्याने ती वाट बघत उभी असते. आपण या सगळ्यांचं निरीक्षण करत असताना उजव्या बाजूने काही तरी हालचाल झाल्याची जाणीव होते. क्षणांत लक्षात येतं अरे हे तर एक छोटं मूल आहे जे दुडुदुडू धावतंय. पण त्याच क्षणात आपल्या काळजाचा ठोका चुकतो. कारण हे लहान मूल सरळ त्या रहदारीच्या रस्त्याच्या दिशेने धावत असतं. आता लहान मुलंच ते, धावणारच ! पण त्याची ही धाव पुढे किती घा’तक ठरू शकते याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. ते मुलं मात्र आपलं धावत सुटलेलं असतं. पण सुदैवाने दोन व्यक्ती हे पाहतात आणि स्वतः धावत सुटतात. त्यातील एक व्यक्ती सरतेशेवटी त्या मुलाच्या आसपास पोहोचते आणि त्याला उचलून घेते. या व्यक्तीने या मुलाला उचलून घेणं महत्वाचं असतं कारण अगदी त्याचवेळेत तिथून एक भला मोठा ट्रक जात असतो. तो ट्रक येणं, त्या माणसाने त्या मुलाला उचलून बाजूला घेणं हे अगदी एका क्षणात होतं. म्हणजे एका क्षणाचाही विलंब झाला असता तर काय अनर्थ घडला असता याचा विचार ही करवत नाही. किंबहुना तो तसा न केलेला बरा.

असो. हा व्हिडियो बघून काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच आपली प्रतिक्रिया असते. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही हेच वाटलं असणार हे नक्की !तसेच लहान मुलांकडे सातत्याने लक्ष पुरवत राहणं किती महत्वाचं असतं हे ही पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित होतं हे नक्की. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद!!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *