Breaking News
Home / मनोरंजन / चोराला अशाप्रकारची शिक्षा ह्यापूर्वी कोणीही दिली नसेल, बघून हसू आवरणार नाही… बघा या चोराचा विचित्र किस्सा…!

चोराला अशाप्रकारची शिक्षा ह्यापूर्वी कोणीही दिली नसेल, बघून हसू आवरणार नाही… बघा या चोराचा विचित्र किस्सा…!

आजकाल आपण अशा अनेक गोष्टी बघतो ज्या बघून आपल्याला त्या गोष्टी नक्की खऱ्या आहेत की खोट्या यावर विश्वासच बसत नाही. आणि आता अशीच एक घटना घडल्याचं समोर येत आहे आणि ती घटना म्हणजे चक्क एका चोराचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आणि या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ हा सोशल मीडिया माध्यमांवर चांगलाच पसरला आहे.

तर घटना अशी घडली आहे की, एका ठिकाणी एक चोर चोरी करण्यासाठी गेला होता. आणि तो चोर ज्यावेळेस चोरी करत होता नेमका त्याच वेळी तिथे काही लोक पोहचले आणि हा चोर तिथल्या लोकांच्या तावडीत सापडला होता. ज्यावेळी हा चोर त्या लोकांना सापडला त्यावेळी त्या लोकांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली.

तिथले लोक त्याची चौकशी करत असताना मात्र त्या चोराने आज त्याचा वाढदिवस असल्याचे त्या लोकांना सांगितले होते. आणि त्याच्या सांगण्यावरून तेथील लोकांनी त्या चोरासाठी एक केक मागवला आणि केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मधे तुम्ही बघूच शकता की कशाप्रकारे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्या चोराचा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच व्हिडिओ मधील एक माणूस असे सुद्धा सांगत आहे की, ह्या चोराने आम्हाला आज याचा वाढदिवस असल्याचे सांगितले आणि म्हणून आम्ही आता त्याचा वाढदिवस करत आहोत.

तसेच त्याच्या बाजूला उभा असणारा माणूस हा त्याच्या तोंडात केक चा एक मोठा तुकडा त्याला भरवत त्याला जबरदस्ती ने खायला लावत आहे. हा व्हिडिओ बघून तर अस वाटत आहे की, ह्या चोराला चोरी करण्याची चांगलीच शिक्षा मिळाली आहे. आणि आता यापुढे तरी तो कोणतीही चोरी करण्याचा विचार सुद्धा करणार नाही.

चोराच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया माध्यमांवर चांगलाच पसरला असून, लोक ह्या व्हिडिओ चा पुरेपूर आनंद घेत आहेत. आणि तसेच या व्हिडिओ वर लोक मजेशीर कमेंट्स सुद्धा करत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *