दिल्ली पोलिसांनी दिल्ली, पंजाब आणि देशातील इतर भागात चोऱ्या करणाऱ्या एका सराईत चोराला अटक केली आहे. ह्या चोराचे नाव मोहम्मद इरफान उर्फ उजाले असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मोहम्मद इरफान ह्याने आपल्या टोळीसोबत अनेक राज्यांत चोऱ्या करून लाखों रुपये जमा केले होते. ह्या पैश्यांनी ते आपले सगळे शौक पूर्ण करायचे. पोलिसांना आरोपीजवळ महागडे कपडे, महागड्या गाड्या मिळाल्या आहेत. पोलिसांनी सांगितले कि ह्या सर्व गोष्टी त्यांनी चोरीच्या पैश्यांनी खरेदी केलेल्या आहेत. दिल्लीच्या क्राईमब्रँचने आरोपीबद्दल माहिती देताना सांगितले कि, हा गृह जानपद बिहार येथील सीतामढीमध्ये राहणारा आहे आणि ह्या वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होता.
आपले नाव बनवण्यासाठी तो गरिबांची मदत करायचा आणि चोरींच्या पैश्यांनी त्याने सीतामढी मध्ये आरोग्य कॅम्प ठेवले होते. क्राईम ब्रँचच्या डीसीपी मोनिका भारद्वाज ह्यांच्या माहितीनुसार त्यांना आरोपी मोहम्मद इरफान हा दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ जानेवारीला नारायण फ्लायओव्हरजवळ त्याला पकडलं. पोलिसांना त्याच्या जवळून जॅग्वार आणि निसान ह्या २ महागड्या गाड्या सापडल्या. आरोपीला पकडल्या नंतर पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले कि, तो आपल्या टोळीसोबत फक्त पॉश एरियातील घरामध्ये चोरी करायचा, जे बंद असायचे. ते अगोदर ह्या गोष्टीची माहिती घ्यायचे कि कोणते घर किती जास्त काळापासून बंद पडून आहे. त्यानंतर ते अश्या घरात घुसून चोरी करायचे. अश्याप्रकारे त्यांनी लाखोंची लूट केली होती. डीसीपी मोनिका ह्यांच्या म्हणण्यानुसार हि टोळी फक्त रोकड आणि दागिन्यांची चोरी करायची आणि खूप काळापासून पोलीस ह्यांचा शोध घेत होते.
तर ह्याला पकडल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कामगिरीनंतर पंजाब च्या जालंधर येथून इरफानच्या टोळीतील तीन लोकांना सुद्धा पकडलं. ज्यामध्ये एक महिला सुद्धा आहे. पोलिसांना त्यांच्याजवळून फ्रांसमेड पि’स्तूल आणि दागिने मिळाले आहेत. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले कि मागच्या वर्षी त्याच्या टोळीने जालंधरयेथील एका घरातून २६ लाख रुपये, हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. त्यानंतर को’रोना मुळे हि टोळी खास काही करू शकत नव्हती. कारण ह्या काळात अनेक लोकं आपल्या घरातच राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार इरफान बिहारमध्ये लोकप्रिय युवा नेता बनू इच्छित होता. आणि चोरीच्या पैशांचा वापर तो निवडणुक लढवण्यासाठी करणार होता.