Breaking News
Home / जरा हटके / छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गु’प्तहेर अश्याप्रकारे सांकेतिक भाषेचा वापर करून माहिती देत असे, बघा व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गु’प्तहेर अश्याप्रकारे सांकेतिक भाषेचा वापर करून माहिती देत असे, बघा व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द कोणी उच्चारले, तरीही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. आपसूक आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचं दैवत आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक वस्तुपाठ. महाराजांनी शून्यातून विश्व म्हणजेच स्वराज्य उभं केलं. हे करत असताना त्यांना विशेष साथ लाभली ती त्यांच्या गुप्तहेर खात्याची. सै’न्यबळ कमी असताना, गनिमी काव्याच्या साथीने ल’ढताना आणि इतर वेळीही गुप्तहेर खात्याची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. पण गुप्तहेर होणं हे तेवढंच जिकिरीचं काम. गुप्तहेर म्हणून पकडलं गेलं तर जीवानिशी जाण्याची भी’ती. पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी या भी’तीवर मात केली. अशा वेळी या गुप्तहेरांमधील संवाद सोप्पा व्हावा म्हणून अनेक कल्पक पद्धती वापरल्या जात. त्यातील एक म्हणजे हाताच्या बोटांचा विशिष्ट पद्ध्तीने वापर करत संवाद साधण्याची कला. आमच्या टीमच्या नजरेस असा एक वायरल व्हिडियो पडला, ज्यातून ह्या कलेचं दर्शन आपल्याला घेता येतं.

या व्हिडियोत आपल्याला दिसतात ते समाधान जोगी एकलग्न. त्यांच्या सोबत संबळ हाती घेतलेले त्यांचे एक सहकारीही असतात. ही कला सादर करण्यासाठी, समाधानजी आणि त्यांचे सहकारी एकमेकांमध्ये बऱ्यापैकी मोठं अंतर ठेऊन उभे असतात. निदान एवढं अंतर तर नक्की असतं, की ज्यामुळे अगदी हलक्या आवाजात सांगितलेल्या गोष्टी त्या सहकाऱ्यांस ऐकायला जाणार नाहीत. कॅमेऱ्यापाठी असतात आपल्या सारखेच उत्सुक असे एक शिवभक्त. करपावली या नावाने ओळखली जाणारी ही कला पाहण्यास ते ही उत्सुक असतात. सुरुवातीस समाधान यांना ते चामुंडा मातेचा जयघोष आपल्या सहकाऱ्याकडून करवून घेण्यास सांगतात. समाधान यांची बोटं अगदी लयीत पण विशिष्ट पद्धतीने हलतात. ही हालचाल होईपर्यंत समोरून केवळ संबळाचा आवाज येत असतो, आणि हाताची हालचाल थांबली रे थांबली की चामुंडा मातेचा जयघोष सुरू होतो. अप्रूप वाटावं अशीच घटना. मग कॅमेऱ्यामागून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यास सांगितले जाते. समाधान पुन्हा आपल्या बोटांनी आणि हातवाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याला समजवतात आणि सुरू होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष.

केवळ काही सेकंदातच आपण या व्हिडियोने मंत्रमुग्ध झालेले असतो. या कलेच्या सादरीकरणामुळे काही तरी विलक्षण गोष्ट अनुभव असल्याची भावना आपल्यात बळकट होत असते. याच भारलेल्या वातावरणात कॅमेऱ्यामागून राजपुतांचा जयघोष व्हावा अस सांगितलं जातं. तेव्हा समाधान चट्कन म्हणतात, ‘महाराणा प्रताप’. होकार मिळाल्यावर, पुन्हा समाधान यांच्याकडून हातांची जादुई म्हणावी अशी हालचाल होते आणि महाराणा प्रतापांचा जयघोष होतो. तेवढ्यात पाठून अजून कोणीतरी बद्रीनाथाचा जयघोष व्हावा असं सुचवतं. त्यांच्या सांगण्याबरहुकूम समाधान हाताने खुणा करतात आणि बद्रीनाथाच्या नावाने जयघोष सुरू होतो. तेवढ्यात मगासचाच आवाज बादलपूर गावात बद्रीनाथाचं स्थान आहे असं सुचवतात. समाधान हे चाणाक्षपणे सगळं ऐकत असतात, त्यामुळे ते पुन्हा एकदा खूण करतात आणि यावेळी जयघोष होताना बादलपूर गावाचं नाव घेतलं जातं. हे घडतं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत कॅमेऱ्यामागून एक व्यक्ती समाधान, त्यांचे सहकारी आणि त्यांनी जोपासलेल्या या कलेचं कौतुक करत असतात. आपणही या कौतुकात सामील होतो. कॅमेरा सांभाळणाऱ्या गृहस्थांकडूनही समाधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं ही शिवकालीन कला जोपासल्याबद्दल कौतुक होतं आणि व्हिडियो संपतो.

व्हिडियो संपल्यावरही आपण काही क्षण अगदी थक्क होऊन राहिलेले असतो. हा दोन मिनिटांचा व्हिडियो आपण पुन्हा पाहतो, पुन्हा एकदा पाहतो आणि पुन्हा कित्येक वेळा पाहतो याचं आपल्याला भान राहत नाही. याचं कारण एकंच. आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक नवीन गोष्ट अनुभवता आली याचं आपल्याला मनापासून समाधान वाटत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना दाखवलेली कल्पकता केवळ कालातीत. आजही शाबूत राहिलेली करपावली ही कला याचं उत्तम उदाहरण. काळाच्या ओघातही, ही कला जपणाऱ्या समाधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. तसेच यानिमित्ताने पुन्हा एकदा ज्यांच्या बुद्धीचातुर्याने, पराक्रमाने आपण सदैव थक्क होतो आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

आमच्या टीमने या व्हिडियो वर आधारित माहितीचा आधार घेत हे लेखन केलेले आहे. पण तरीही आमची टीम इतिहास संशोधन या विषयातील अभ्यासक नाही. तेव्हा यातील काही बाबींवर इतिहासातील योग्य दाखले देत प्रकाश टाकल्यास ते आमच्या सारख्या प्रत्येक शिवप्रेमीस दिशादर्शक ठरतील हे नक्की. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.