Breaking News
Home / मनोरंजन / छोट्याश्या गोष्टीसाठी सख्ख्या आईने मुलासोबत १० व्या मजावल्यावरून असं काही केलं कि पाहून तुम्हीदेखील चक्रावून जाल, बघा व्हिडीओ

छोट्याश्या गोष्टीसाठी सख्ख्या आईने मुलासोबत १० व्या मजावल्यावरून असं काही केलं कि पाहून तुम्हीदेखील चक्रावून जाल, बघा व्हिडीओ

व्हिडियो हा शब्द कोणी नमूद केला की हल्ली त्याला जोडून वायरल हे विशेषण ही सहसा वापरलं जातं. मग तो व्हिडियो कोणताही का असेना. मनोरंजक असो, टाईमपास असो वा इतर कोणताही चांगला व्हिडियो असो. त्याचे व्ह्यूज जबरदस्त असले आणि तो लोकप्रिय ठरला की सहसा वायरल म्हणून गणला जातो. पण या वायरल व्हिडियोजची अजून एक बाजू असते आणि ती मात्र काही वेळा आपला श्वास रोखून धरायला लावते.

ही बाजू अर्थातच वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारात मोडत नाही. ही बाजू असते ती म्हणजे धक्कादायक प्रकार दाखवणारे वायरल व्हिडियोज. हा प्रकार नाही म्हंटलं तरी आपला रक्तदाब वाढवू शकणारा आणि काही वेळेस शास रोखून ठेऊ शकतो असाच असतो. आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो हा या प्रकारात मोडतो. काय आहे हा व्हिडियो? हा व्हिडियो फरिदाबाद येथील एका रहिवासी सोसायटी मधला आहे ! टोलेजंग इमारतींच्या सानिध्याने तयार झालेली ही सोसायटी आहे, असं म्हणता येईल.

या सोसायटीच्या एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाने दुसऱ्या इमारतीतील कुटुंबाचं आश्चर्यकारक वागणं यात चित्रित केलं आहे. पण अस काय आहे हे आश्चर्यकारक वागणं? तर या व्हिडियोत दिसत असल्याप्रमाणे या दुसऱ्या कुटुंबातील काही सदस्य एका लहान मुलाला कपड्यांच्या साहाय्याने वर ओढून घेताना दिसून येतात. बरं घरातल्या घरात मजा मस्ती करताहेत असं ही नाही. हा सगळा प्रकार या इमारतीच्या तळापासून बऱ्याच उंचीवर दहाव्या मजल्याच्या बाल्कनी बाहेर चाललेला असतो असं कळतं. आता एवढ्या उंचीवर एका लहान मुलालाच काय पण कोणालाही असं वर उचलून घेणं हा जिवावरचा प्रकार आहे हे काही वेगळं सांगायला नको. बरं यात त्याचा जीव वाचवणं वगैरे प्रकार होता तर तशी माहिती अजून तरी काही कळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब फरीदाबादमधील सेक्टर-८२ मधील फ्लोरिडा सोसायटीध्ये १० व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. महिलेचे काही कपडे खालच्या मजल्यावर म्हणजे नवव्या मजल्यावर पडले होते. परंतु नवव्या मजल्यावर कुणीही राहत नसल्यामुळे त्या घरातून कपडे परत आणणे शक्य होत नव्हते. परंतु कपडे मिळवण्यासाठी ह्या महिलेने चक्क जीवावर बेतणार प्रकार केला. चक्क आपल्या मुलाला साडीच्या साहाय्याने खालच्या मजल्यावर पाठवले आणि पुन्हा त्याच साडीने वर आणले.

कदाचित याच दरम्यान कधी तरी या दुसऱ्या इमारतीतील कुटूंबाला याविषयी कळतं. त्यातूनच मग हा व्हिडियो चित्रित केला गेला असावा. असो. आपल्याला फक्त हा मुलगा एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीत वर खेचून घेतला गेलेला दिसतो. त्यामुळे त्या आधी काय घडलं असावं याबाबत जास्त भाष्य करता येत नाही. जी माहिती प्रथितयश वृत्तसंस्थांमार्फत कळली आहे ती नमूद केलेली आहे. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या घटनेत समाधानाची एकच बाब म्हणजे त्या मुलाला कुठेही दुखापत झालेली दिसून येत नाही. या लेखाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या वाचकांना आवाहन आहे की, कारण कोणतंही असो पण जीवावर बेतेल असं कोणतंही धाडस कधीही करू नका. काही वेळा आपल्या दृष्टीने अगदीच किरकोळ वाटणारी घटना आपलं किंवा इतरांचं आयुष्य वैराण करण्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच अशा प्रसंगी इतरांची मदत घेऊन, जीवावर न बेतता ही काही करता येतील असे उपाय योजलेले कधीही उत्तम. बाकी आपण सुज्ञ आहातच. असो. हा व्हिडीओ विषयी लिहिण्याचा एकच उद्देश आहे कि अशाप्रकारची मानसिकता किती महागात पडू शकते ते. त्यामुळे आपण जे काही करतो त्याचा पुढे परिणाम काय होऊ शकतो ह्याचा पूर्ण विचार करा.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *