रेल्वे किंवा ट्रेन दु’र्घटना, अपघा’ताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी धावत्या ट्रेनमध्ये चढताना तर उतरताना को’सळतं, कुणी रेल्वे रूळ क्रॉस करताना अचानक ट्रेन येते. काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत एक महिला रेल्वे ट्रॅकवर आपल्याच धुंदीत चालत होती. त्यावेळी अचानक ट्रेन आली आणि पुढे अघटित घडता घडता राहिलं. आज व्हायरल झालेला ट्रेनमधील व्हिडीओ मात्र भयंकर आहे, अक्षरशः अंगावर काटा आणेल असा हा व्हिडीओ आहे.
अनेकदा आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात. आपण रागात असतो, आपल्याला लक्षात येत नसते की, आपण काय करतोय? परिस्थिती काय आहे? याचे परिणाम काय होऊ शकतात आणि मग नको ती गोष्ट घडून गेल्यावर पश्चाताप होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रागाच्या आणि वादाच्या भरात नको ती गोष्ट होऊन बसली. विशेष बाब म्हणजे घटना घडल्यावरही गुन्हेगार अशा पद्धतीने वावरत होता की, जसे काही झालेच नाही.
खरं तर दैनंदिन आयुष्य जगत असताना, काही लोक त्यांच्या विचारात वावरत असतात. तर काही लोक नशेत असताना भयंकर वागतात. अशा लोकांना आपल्या आजू-बाजूला काय सुरु आहे, आपण नेमकं काय करत आहोत,हे देखील माहित नसतं. पण काहीवेळा असे करणं खूप धोकादायक ठरू शकतं, हेच या व्हायरल झालेल्या व्हिडीओतुन लक्षात येतं.
या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, 2 प्रवासी ट्रेनमध्ये कुठल्यातरी कारणावरून भांडत आहेत. दोघांनीही दा’रूचे सेवन केले आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दोघेही एकमेकांना ढकलत आहेत, एकमेकांवर रुबाब करत आहेत. अगदी त्यांची सुरुवातीला किरकोळ वाटणारी झटापट पुढे मोठा रंग घेईल, असे आपल्याला वाटतं नाही. अचानकपणे एक जण दुसऱ्याला धक्का देतो आणि पुढे मोठे अघटित होऊन बसते. दोघांची ही भांडणं ट्रेनच्या दरवाजानजीक सुरु होती. यामधील एका प्रवाशाला प्रचंड राग आला आणि मग पुढे नको तो उद्योग घडला.
पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून या राग आलेल्या प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकललं. या घटनेत प्रवासी गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांनी धक्का देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एकानं रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुदैवाने या जखमी व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी वाचवले. हावडा-मालदा टाउन इंटरसिटी एक्स्प्रेसमधून बाहेर ढकलण्यात आलेल्या सजल शेखला ज’खमी अवस्थेत रुळांवरून वाचवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बघा व्हिडीओ :
Shocking video 😳 is from Birbhum district of #WestBengal. In a minor altercation, a passenger pushed another passenger from the train #viral #viralvideo #India pic.twitter.com/p9ABmH67Go
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 17, 2022