Breaking News
Home / बॉलीवुड / छोट्या कामातून करोडो कमावते ड्रामा क्वीन राखी सावंत, 15 करोडच्या सम्पत्तीची मालकीण आहे

छोट्या कामातून करोडो कमावते ड्रामा क्वीन राखी सावंत, 15 करोडच्या सम्पत्तीची मालकीण आहे

बॉलिवूडची ड्रामा क्वीन प्रत्तेक मुद्द्यावर आपलं मत मांडते. मग ते आपल्या पॉलिटिकल पार्टी विषयी असुदे किंवा कोणत्या कमेंट बद्दल. तिला बरोबर माहिती आहे, काय केले कि सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले जाईल. 25 नोव्हेंबरला राखीचा जन्मदिवस असतो, जो तिने गेल्या महिन्यातच साजरा केला. पण राखीच्या नाव पाहिले कि आपल्या डोळ्यांसमोर चित्र येते ते म्हणजे ड्रामेबाजी आणि कॉन्ट्रोवर्सी. राखीला तर सगळ्यात मोठी ड्रामा क्वीन म्हणून घोषित केले आहे. कारण ती सतत बातम्यांमध्ये येण्याचा कोणता ना कोणता बहाणा शोधतच असते. ‘अग्निचक्र’ चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्या नंतर तिने खूप आयटम सॉंग्स केले. एवढंच नाही तर ती काही ना काही कारणाने मीडिया समोर येतच राहिली. त्यापेक्षा जास्त ती आपल्या खराब कपड्यांमुळे चर्चेत राहिली. राखी सावंतने रियालिटी शो मधे ‘राखी का स्वयंवर ‘ हा रियालिटी शो लॉन्च केला होता. 2009 मधे लॉन्च झालेल्या या शो मधे तीने टोरँटोच्या एका सहभागी सोबत विवाह केलं आणि काही दिवसात ती वेगळी झाली असे दर्शवले होते.

राखी सावंतचे वडील आनंद सावंत मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत आपली आई जया हिच्या सोबत राहते. राखी आपल्या बोल्ड अंदाजाने केव्हा ब्रेस्ट डोनेट कारण्याची बातमी देते तर कधी सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो टाकून आपल्या फॅन्सना आपली सुंदरता दाखवते. तिच्या मालमत्ते विषयी बोलायचे झाले तर तिचे मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. त्यांची किंमत जवळ जवळ 11 कोटीच्या घरात आहे. राखीने 2014 साली राष्ट्रीय आम पार्टी बनवली होती आणि इलेक्शन लढवले होते. टीओआय च्या रिपोर्ट नुसार यावेळी तिने ऍफिडेेवीट भरले होते, त्या बोल्ड लेटर मधे लिहिले होते. तिची हायस्कुल कॉलिफिकेशन illiterate आहे. तिने स्वतःहून आपले शैक्षणिक पात्रता न लपवता खरी माहिती दिली होती. इतकंच नाही तर इंटरनेटवरील आकड्यांनुसार तिची मालमत्ता 15 कोटी आहे. आणि हि मालमत्ता तिने स्वतः बनवली आहे. राखी जवळ 21.6 लाखाची फोर्ड एंडेवर गाडी आहे. कॉंट्रोव्हर्सीवाले आयुष्याशिवाय राखी जवळ खूप सारे पैसे सुद्धा आहेत. तिच्या जवळ कोणताही मोठा प्रोजेक्ट नसताना सुद्धा ती करोडोंची मालकीण आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का कि इतके सारे पैसे तिच्याजवळ कुठून येतात. राखीची जवळजवळ कमाई स्टेज परफॉमन्स मधून येते. ह्याशिवाय राखी जवळ पैसे आपले व्हिडीओज वैगेरे पासून येतात. त्याशिवाय राखी आपला पैसे शेअर आणि बॉण्ड्स मध्ये सुद्धा गुंतवते ज्यामुळे ती लाखों रुपये कमावते. काही मीडिया रिपोर्टचा दावा आहे कि अभिनेत्री राखी सावंतची आताची संपत्ती ४० कोटींच्या आसपास झाली आहे. राखी कमाई साठी नेहमीच कोणता ना कोणता मार्ग शोधून काढते. ह्याशिवाय ती स्टेज परफॉर्मन्ससाठी सुद्धा खूप मोठी रक्कम घेते. त्याशिवाय राखी जवळ एक महत्वपुर्ण काम आहे, ते म्हणजे आपल्या नवीन नवीन कारनाम्याने बातमीत राहणे. राखी ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त ‘नच बलिये 3’, ‘ये है जलवा’, ‘अरे दिवानो मुझे पहचानो’, ‘राखी का स्वयंवर’ अशा सारख्या रियालिटी शो मधे झळकली आहे.

About IrK0sFrKWQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *