Breaking News
Home / माहिती / जगातील सर्वात जास्त मुस्लिम असेलेल्या इंडोनेशियात २० हजाराच्या नोटेवर गणपतीचे चित्र का आहे

जगातील सर्वात जास्त मुस्लिम असेलेल्या इंडोनेशियात २० हजाराच्या नोटेवर गणपतीचे चित्र का आहे

प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन आहेत. प्रत्येक देश आपल्या देशातील महान लोकांचे फोटो त्या चलनावर लावतात. त्यावर काही खुणा असतात, काही राष्ट्रीय चिन्हे असतात ह्याव्यतिरिक्त काही चिन्हात्मक गोष्टी आपल्या चलनावर असतात. परंतु असा एक देश आहे ज्या देशाच्या चलनावर हिंदू दैवत श्रीगणेशाचे चित्र आहे. त्या देशाचे नाव आहे इंडोनेशिया. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल कि इंडोनेशिया देशाची ८७ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे तर फक्त ३ टक्के लोकं हिंदू आहेत. तरी सुद्धा तिथे २० हजाराच्या नोटीवर गणपतीचे चित्र आहे. परंतु खूपच कमी लोकांना ह्यामागचे कारण माहिती आहे कि का ह्या नोटीवर गणपतीचे चित्र लावले होते. चला तर आजच्या लेखात आम्ही ह्या बद्दल माहिती देणार आहोत. चला अगोदर आपण अगोदर ह्या नोटेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडोनेशियातील २० हजाराच्या नोटीवर गणपतीच्या चित्राच्या बाजूला ज्या व्यक्तीचे चित्र आहे ते म्हणजे ‘की हजार देवांतरा’. त्यांच्या फोटोच्या डाव्या बाजूला गव्हर्नरची स्वाक्षरी दिसते. सोबतच नोटेच्या डाव्या बाजूला वरच्या दिशेने राष्ट्रीय चिन्ह सुद्धा आहे. हे राष्ट्रीय चिन्ह म्हणजे गरुडदेव आहेत. जे भगवान विष्णूचे वाहन मानले जाते. नोटेच्या मागच्या बाजूस विध्यार्थी शाळेत शिकत असल्याचे चित्र दिसत आहे.

ह्या नोटीवर गणपतीचे चित्र लावले जाते ह्यामागचे कारण सांगितले जाते कि इंडोनेशिया द्वीपसमूह पहिल्या शतकात हिंदू धर्माच्या प्रभावामध्ये होता. तेव्हापासून आजपर्यंत तिथे हिंदू परंपरा, हिंदू प्रथा आणि हिंदू संस्कृती वाढत गेली आणि त्याकारणामुळे तिथे गणपतीचे चित्र लावल्याचे सांगण्यात येते. आणि दुसरे कारण हे सांगितले जाते कि हि नोट शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी बनवली गेली होती. त्यामुळे नोटीवर शिक्षणासंबंधी चित्र लावण्यात आले. नोटेच्या मागच्या बाजूला मुलं शिकत असल्याचे दिसत आहेत. नोटेच्या पुढच्या बाजूला ज्या व्यक्तीचे चित्र आहेत ते ‘की हजार देवांतरा’ एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यावेळी इंडोनेशियातील सर्व मुलांना शिक्षण मिळावे असा त्यांचा हेतू होता. त्यालाच अनुसरून गणपतीचे चित्र लावण्यात आले आहे. कारण हिंदू धर्मात श्रीगणेशाला विद्येचे दैवत मानले जाते. त्याचप्रमाणे अजून एक कारण सांगितले जाते, परंतु ह्या गोष्टीला अजून कोणता दुजोरा नाही आहे. असे सांगितले जाते कि ९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियातील सर्व चलनाचे मूल्य घसरत चालले होते. त्यावेळी इंडोनेशियातील एका मंत्रीने श्रीगणेशाचे चित्र लावण्याचा सल्ला दिला होता. ह्यामागचे कारण असे कि श्रीगणेश हे उत्कर्ष, भरभराटीचे दैवत आहेत त्यामुळे हे चित्र लावण्यात आले. आणि जेव्हा हे चित्र नोटीवर लावण्यात आले त्यानंतर सुदैवाने इंडोनेशियन चलनाचे मूल्य स्थिर राहिले. त्याची घसरण थांबली.

इतकंच नाही तर तिथे तुम्हांला अनेक खुणा पाहायला मिळतील ज्या हिंदू धर्मासंबंधित आहेत. तिथे तुम्हांला हिंदूंची अनेक मंदिरे पाहायला मिळतील. तेथील जकार्तामधील एका चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांची भव्य मूर्ती पाहायला मिळेल. तेथील आर्मीच्या मॉस्कोत (शुभ वस्तू) हनुमान आहेत. तेथील एक इन्स्टिट्यूट आहे, बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्या इन्स्टिट्यूटच्या लोगोवर श्रीगणेशाचे चित्र आहे. तिथे अश्या अनेक गोष्टी तुम्हांला पाहायला मिळतील ज्या हिंदू धर्मासंबंधीत आहेत. तेथील एका बँकेचे नाव ‘कुबेर बँक’ आहे. तेथील एका एअरपोर्टचे नाव ‘गरुड एअरपोर्ट’ आहे. ह्या गोष्टींवरून माहिती पडते कि इंडोनेशियामध्ये आजही हिंदू संस्कृतीच्या गोष्टी मानल्या जातात. मिळालेल्या माहितीनुसार हि नोट १९९८ साली चलनात आली होती. परंतु आताच्या २०००० च्या नोटीवर हे चित्र नाही आहे. हि नोट आता चलनात वापरात नाही आहे. आता २०००० च्या नोटींवर राजकीय व्यक्ती साम रटुलंगी ह्यांचे चित्र असून हि नोट २०१६ पासून चलनात आली आहे. इंडोनेशियाचे २०००० हजार रुपयांची जर भारतीय चलनासोबत तुलना केली तर त्याची किमंत जवळ जवळ १०० रुपये होतात. जरी ह्या नोटेचा आजच्या काळात चलनात उपयोग होत नसला तरी अनेकांनी हि नोट जपून ठेवली आहे. अनेकांनी आपल्या नोटांच्या अल्बममध्ये ह्या नोटेला खास स्थान दिले आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *