असं बोलतात ना कि जीवनात पाहिजे तितके कमवा, जेव्हा तुम्ही निघून जातात ना तेव्हा सर्व काही इथेच सोडून जावे लागते. हि गोष्ट कुठे ना कुठे खरी सुद्धा आहे. चला तर आम्ही तुम्हांला अश्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी खऱ्या आयुष्यात खूप संपत्ती कमावली, परंतु जेव्हा त्यांना ह्या जगातून जावे लागले तेव्हा मात्र खूप सारे धन येथेच सोडावे लागले. आज तुम्हांला जी लिस्ट सांगणार आहोत, कदाचित त्यातील आकडे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते.
दिव्या भारती
बॉलिवूडमध्ये खूप कमी वेळात लोकप्रिय होणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिव्या भारतीचे नाव घेतले जाते. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ५ एप्रिल १९९३ ला तिच्याजवळ खूप सारं होतं आणि जेव्हा तिने हे जग सोडले तेव्हा तिच्या नावावर ७० कोटी रुपये इतकी संपत्ती होती. जी कोणत्याही प्रकारे कमी नव्हती. केवळ १९ व्या वर्षीच दिव्याला हे जग सोडावे लागले होते.
रीमा लागू
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कमाल दाखवणारी अभिनेत्री रीमा लागू ह्यांना १८ मे २०१७ ला हे जग सोडून जावे लागले. त्यावेळी त्यांच्याजवळ जवळपास १५ कोटी रुपये इतकी संपत्ती होती, जे आता तिच्या कुटुंबजवळ आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी रीमा लागू ह्यांची प्राणज्योत मावळली होती.
जिया खान
३ जून २०१३ जिया खानला प्रेमामध्ये प्राण द्यावा लागला होता. तिने गजिनी, हाउसफुल सारख्या अनेक चित्रपटांत कामे केले होते. आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत जियाने चित्रपटांत काम करून १० कोटी रुपये पेक्षा सुद्धा जास्त संपत्ती कमावली होती. केवळ २५ वर्षे वय असताना जियाला हे जग सोडावे लागले होते.
श्रीदेवी
बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री श्रीदेवी हिने बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट तर गाजवलेच त्याशिवाय गाणीही सुपरहिट केली. श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ ला हे जग सोडून गेली. दुबईतील एका हॉटेलं मध्ये कार्डियाक अरेस्ट मुळे तिची प्राणज्योत मावळली होती. जेव्हा श्रीदेवी हे जग सोडून गेली तेव्हा तिच्याजवळ तब्बल २४७ कोटी रुपये इतकी संपत्ती होती, जे तिच्या कुटुंबाच्या नावे सोडून गेली. जेव्हा श्रीदेवी हे जग सोडून गेली त्यावेळी तिचे वय ५४ वर्षे होते.