अवजड सामान घेऊन नेणारी सायकलवाली रिक्षा चालवणं खूप मेहनतीचं काम आहे. जो व्यक्ती हि रिक्षा चालवतो तो दिवसभर आपली एनर्जी त्यात घालवत असतो. अनेकवेळा सायकलमध्ये खूप जास्त वजन सुद्धा असतं. अशामध्ये ती घेऊन नेण्यामध्ये खूप त्रास होतो. असंच काहीसं एका गरीब रिक्षावाल्या जोडप्यांसोबत होत आहे. ते एका घाटावरती कसंतरी सायकलवाली रिक्षा चढवत होते. नवरा पुढे सायकलवर बसला होता आणि त्याची पत्नी मागून रिक्षाला धक्का मारत होती. असे दृश्य आपल्यापैकी अनेक लोकं नेहमी पाहतात. परंतु त्यापैकी खूपच कमी लोकांना त्यांच्यावर दया येते आणि ते त्यांच्या मदतीसाठी धावतात. ह्या स्वार्थी दुनियेत काही चांगल्या मनाची माणसं देखील आहेत. ते वेळोवेळी माणुसकी दाखवतात. आता अश्याच एक चांगल्या मनाचा बाइकस्वार सोशिअल मीडियावर वायरल होत आहे.
खरंतर, जेव्हा हा बाईकस्वार जेव्हा ह्या गरीब जोडप्यांना घाटावर रिक्षा चढताना संघर्ष करताना पाहतो तेव्हा तो त्यांची मदत करतो. हा बाईकस्वार रिक्षाला धक्का देणार्या महिलेला रिक्षावर बसायला सांगतो. त्यानंतर तो आपल्या बाईकवर बसूनच एका पायाने रिक्षाला धक्का मारतो. त्यामुळे रिक्षा खूपच सहज वर चढत जाते. बाइकस्वाराद्वारे केली गेली हि मदत आपल्या सर्व बाईकस्वारांसाठी एक चांगली शिकवण सुद्धा आहे. आपण मनात आणलं तर रोज अश्या कितीतरी लोकांची मदत करू शकतो. अश्या मदत करण्यानेच माणुसकी जिवंत राहते. ह्या व्हिडिओला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सोशिअल मीडियावर शेअर केले आहे. सेहवागने कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘माणुसकी जिंदाबाद. एका बाइकस्वाराने ब्रिजवर वजन घेऊन जात असेलेल्या रिक्षा चढताना पाहिली. रिक्षाला धक्का मारत असलेल्या महिलेला बाइकस्वाराने रिक्षामध्ये बसण्याची विनंती केली. त्यानंतर तो बाइकवरूनच धक्का मारून रिक्षाला मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवतो.’
सेहवागने शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील एनसीआर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ ‘NCR Bikerz’ नावाच्या युट्युब चॅनेल चालवणाऱ्या ‘रॅमी रायडर’ ह्याचा आहे. त्यानेच रिक्षाला धक्का मारणाऱ्या जोडप्याची मदत करण्याची विनंती केली होती. मित्रांनो आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत. नक्की पाहून घ्या. आणि तुम्हांला व्हिडीओ कसा वाटला, त्याबद्दल प्रतिक्रिया देखील द्या. त्याचप्रमाणे आम्ही वायरल व्हिडीओज नेहमी अपलोड करत असतो, तुम्ही अशाप्रकारचे वायरल व्हिडीओज आपल्या वेबसाईट वर पाहू शकता.
बघा व्हिडीओ :
Insaaniyat Zindabad.
A Biker saw a couple pulling a loaded cycle rickshaw on a bridge with wife pushing the rickshaw.
Biker requested the lady to sit on rickshaw and pushed it with his bike till they reached the main road. pic.twitter.com/ks0cPugEPT— Virender Sehwag (@virendersehwag) January 5, 2021