शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ, असं आपल्याला शिकवलं जातं. पण तुम्ही कधी शेतकऱ्याला जाऊन विचारलं ना तुझं काळीज म्हणजे कोण तर त्याचं पहिलं उत्तर असेलं माझा सर्जा-राजा… शेतकरी दादा कधीच आपल्या सरजा राजाला डोळ्याआड करणार नाय आणि मालक जर नसतील ना तर आपले सर्जा राजा काय करतील ते तुम्ही या व्हीडिओमधून नक्की बघा… शेतात नांगरणी सुरू आहे. भल्या पहाटे उठून यायचं. शेत नांगरायला घ्यायचं. कसदार धान्य पेरायचं आणि निवांत आभाळाकडं पाहत वाट बघायची, अशी बळीराजाची रीत…. कधी आभाळं दाटतं तर कधी मोकळंच राहतं. निसर्गाची अवकृपा होते पण राजाचे सर्जा आणि राजा हे दोस्त कधी त्याला एकटं पडू देत नाहीत. शंभर मण धान पिकलं तरी समाधानी आणि सोबत एक पोतं जरी मिळालं तरीही तितकचं समाधानी…
त्यांच्या याच समाधानी वृत्तीनं राजाचं उर भरून येत असतं. एखादी दोन मोठी पोरंपण इतकी गुणानं वागायची नाहीत. इतकी शहाणी वागणारी जोडी पाहून मालकच काय मालकीण बाईच्या पण डोळ्यात आसवं आली. सकाळी आलेली ही जोडी… दुपारच्याला भाकरीच्या वेळेला शेताच्या बुंध्यावर झाडांच्य सावलीत येऊन बसली. चारा खाऊन पाणी पिऊन तृप्त झाली. क्षीण त्यानाही इतका आलेला की उठावं की नको, असा मालकालाही सवाल होता. पण समोर शेत नांगारायचं बाकीय. पाऊस डोक्यावर येऊन उभा आहे म्हटल्यावर उठणं भाग आहे. इतक्यात एक चमत्कार झाला. बैलांना आराम मिळावा म्हणून त्यांच्या मानेवर जू बाजूला काढून ठेवला जातो. पण सरजा राजाला कळलं की चला आता काम करायची वेळ झाली म्हणत खाली पडलेला जू शिंगांनी डोक्यावर अलगत उचलून घेतला.
अगदी दोघांनीही डोकं लावून ते काम पूर्ण केलं. मालक आणि मालकीण बघत दोघांच्या करामती बघत होते त्यांनी डोकं लावलं. सरजा राजाचा व्हीडीओ रेकॉर्ड केला. व्हीडिओ इतका व्हायरल झालायं की सरजा राजा इंटरनेट स्टार झालेत. अवघ्या काही सेकंदात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलीयंत. मानेवर जू ओढून घेण्याची पद्धत मालक मालकीणीला इतकी भावली ना की सगळ्या गोष्टींचा क्षीण कुठच्या कुठं दूर निघून गेला आणि सारी मंडळी कामाला लागली. पुन्हा नव्या जोमानं पाऊस कधीबी पडू दे आम्ही तयार आहोत या वेगात. सरजा राजानं अख्खं शेत नांगरुन दिलं. फक्त काही सेकंदाच्या या चमत्कारानं सगळ्यांना उर्जा दिली.
बघा व्हिडीओ :