Breaking News
Home / मराठी तडका / जबरदस्तीने अभ्यासाला बसवलेल्या ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

जबरदस्तीने अभ्यासाला बसवलेल्या ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

गेले वर्षभर गृहपाठ आणि शाळेतला अभ्यास यातल्या रेषा पुसट होताना आपण सगळ्यांनी पाहिल्या आहेत. कारण सगळे पाठ हे ‘गृह’पाठचं झाले होते. पण एक खरं की घरी बसून अभ्यास करायचा, म्हणजे मुलांच्या दृष्टीने अंमळ वैतागच. त्यात जर अभ्यास करण्याची अजिबात इच्छा नसेल पण आपली आई आणि इतर घरचे आपल्या बाजुला बसून अभ्यास घेत असतील तर. असंच काहीसं होत होतं एका मुलाच्या बाबतीत. ह्या मुलाला टीव्ही पाहणं आणि खेळणं हे आवडतं, अगदी इतर लहान मुलामुलींसारखं. पण त्याची आई मात्र त्याला अभ्यासाला बसवते. मग सूरु होते ती या मुलाची नकार घंटा. आपल्या भावाला केवळ दोनंच पानं आणि आपल्या वाट्याला चार पानं याचं या मुलाला वाईट वाटत असतं. पण त्यावर त्याच्या आईचं उत्तर असतं, की त्याच्या भावाने आधी अभ्यास केला आहे आणि या मुलाने नाही.

त्यामुळे आधीचा अभ्यास आणि आताच अभ्यास असा वाढून प्रमाण जास्त झालेलं दिसतंय. त्यात पाठून त्याच्या आईला पाठींबा देणारी एक मोठी व्यक्ती असतेच. पण या सगळ्यांत आपल्या लक्षात राहतं, ते या मुलाचं बोलणं. एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपले मुद्दे मांडावे अशा पद्ध्तीने हा मुलगा आपले मुद्दे मांडत असतो. त्यात त्याच्या अभिनयाची जोड. जणू काही आभाळ कोसळलं आहे, या थाटात त्याचे मुद्दे उपस्थित करणं ऐकून आपल्याला हसू येतं. त्यात इंग्रजी मुळाक्षरे गिरवताना होणाऱ्या त्याच्या चुका ह्या गंमतीत भर टाकतात. पण या सगळ्यांत जाणवते ती त्याच्या आईची आपल्या मुलाने अभ्यास करावा ही तळमळ. केवळ टीव्ही पाहून आणि खेळून काम भागणार नाही तर अभ्यास करणंही तेवढंच महत्वाचं आहे, हे या माऊलीच्या बोलण्यातून दिसून येतं. कारण पाठी बसलेली व्यक्ती या संभाषणा दरम्यान एक दोनदा हसते, पण या मुलाची आई मात्र ठाम असते. या माऊलीचा चेहरा दिसत नाही, पण तिची तळमळ आपल्या पर्यंत पोहोचते.

त्यामुळे या मुलाच्या बोलण्याची गंमत आमच्या टीमने अनुभवली आणि त्याच्या आईला मनापासून सलामही केला. तसेच या व्हिडियोवरील लेखातून मनोरंजन निर्मिती हा उद्देश आहे. तसेच आमच्या छोट्या मित्र मैत्रिणींनी आपल्या आई वडिलांचं ऐकावं आणि आपला खेळाचा वेळ सांभाळून अभ्यासही करावा हा आमचा त्यांना मोठी भावंडं म्हणून सल्ला. आपल्या वेळेसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनापासून धन्यवाद. तसेच आमच्या टीमने केलेल्या इतर बातम्याही वाचा. त्या बातम्याही आपल्याला आवडतील हे नक्की. आपल्याला वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायला आवडत असतील तर वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. आपल्या आमच्या वरील प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *