बोलतात ना जाको राखे सैय्या मर साके ना कोई…. यूपी मधल्या एका गावातून या म्हणीला सामान अशी एक घटना समोर आली आहे. इथे मातीत गाडलेल्या एका लहान मुलाला बाहेर काढले गेले आहे, ज्याचे श्वास चालू होते. उत्तर प्रदेश मधल्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील सौनोरा गावात हि घटना आहे. गावात बसलेल्या लोकांना अचानक एका मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी मुलाचा आवाज ऐकलं आणि त्या दिशेने ते निघाले. पुढे जाऊन पाहिल्यावर मातीच्या ढिगाखाली एक मुलगा त्यांना गाडलेल्या अवस्थेत सापडला. त्या मुलाला बाहेर काढून लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले जिथे त्या मुलाची तब्येत आता स्थिर सांगितली जात आहे.
मातीतून येत होता मुलाच्या रडण्याचा आवाज
सिद्धार्थनगर च्या सौनोरा गावात काही लोक काम करत होते. काम करत असताना अचानक त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या बाजूने आवाज येत होता ते लोक त्या बाजूला गेले. आवाजाचा पाठलाग करत ते लोक त्या ठिकाणी पोहचले, जिथे एका इमारतीचे काम चालू होते. त्या इमारतीच्या बाजूला एक जंगल सदृश्य जागा होती जिथे काम चालू होते.
रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी जेव्हा माती बाजूला केली तेव्हा त्यांना दिसले कि एका नवजात बाळाचा पाय बाहेर आहे. त्यानंतर त्यांनी हळू हळू माती बाजूला केली आणि मुलाला सावधपणे बाहेर काढले आणि लगेच हॉस्पिटल मध्ये दाखल केले. तिथे मुलावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी सांगितले कि मुलाची प्रकृती चांगली आहे, परंतु थोडा चिखल बाळाच्या तोंडात गेला आहे.
दत्तक घेण्यास पुढे आले लोक
असे समजले जाते कि या बाळाला जन्म देऊन लगेच फेकून देण्यात आले आहे. लखनऊ पासुन ६० कि मी लांब सिद्धार्थ नगर जिल्ह्यात या प्रकरणबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात याचिका दाखल केली आहे. सामाजिक स्वास्थ्य केंद्र जोगिया मध्ये मुलावर उपचार चालू आहेत. प्रभारी चिकित्सा अधिकारी मानवेंद्र पाल यांनी सांगितले कि, नवजात बाळाला बघून असे वाटते कि बाळाचा जन्म काही वेळा पूर्वीच झाला आहे.
सगळ्यात जास्त थक्क करणारी गोष्ट अशी कि, बाळाच्या श्वसननलिकेत माती गेलेली, परंतु आता प्रकृती स्थिर आहे. या घटनेला लोक डॉक्टरांसोबत दैवी चमत्कार मानत आहेत. जिथे जन्माला आलेल्या बाळांना काळजीपूर्वक ठेवले जाते तिथे या बाळाने मातीमध्ये आपले डोळे उघडले. बाळ काहीही न खाता पिता मातीत जिवंत राहिला हि एक थक्क करणारी गोष्ट आहे.
सौनोरा टोला मध्ये काम करणारे मजूर जर बाळाला काळजीपूर्वक उचलून हॉस्पिटलला जर नाही घेऊन गेले असते तर बाळाचं वाचणं अवघड होतं. एवढ्या मातीखाली सुद्धा बाळाचा जीव कसा वाचला हा पण एक चमत्कारच म्हणावा लागेल. गावातील द्वारिका च्या पत्नी ने बाळाला दत्तक घेण्यासाठी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले कि या बाळाला त्या आपला मुलगा बनवू इच्छितात. तसेच दुसरीकडे या घटनेवर कारवाई सुरु केली आहे कारण या बाळाला मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्याला लवकर पकडता यावे.