Breaking News
Home / मराठी तडका / जयदीप आणि गौरीचा डान्स प्रॅक्टिस दरम्यानचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

जयदीप आणि गौरीचा डान्स प्रॅक्टिस दरम्यानचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

मालिका म्हणजे आपला जीव की प्राण. आपल्या रोजच्या आयुष्यात असलेली गरज म्हणा ना. कारण आपण या मालिका, त्यातील पात्रं यांच्याशी इतके एकरूप होऊन जातो की आपल्यालाही कळत नाही. आपल्या क’मेंट्स वरून हे स्पष्ट होतंच. तर अशा या मालिकांतील पात्र आपल्याला अगदी जवळची वाटण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. कारण आधी सेलिब्रिटी म्हणजे आपल्यापेक्षा काहीशी वेगळी वाटणारी ही मंडळी आता मात्र आता अगदी घरची वाटायला लागली आहेत. कारण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांच्या आयुष्यात आपल्याला काही वेळ का होईना पण डोकावतात येतं. त्यातून सहजपणे आपले भावबंध त्यांच्याशी जोडले जातात. पण केवळ वैयक्तिक आयुष्यच नव्हे तर पडद्यामागे चालणारी कलाकारांची मस्ती, मजा आणि अगदी तयारी सुद्धा आपल्याला पाहता येते. आता मंदार जाधव यांनी शेअर केलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना.

मंदार जाधव यांना आपण सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘जयदीप’ या भूमिकेसाठी ओळखतो. याआधीही त्यांनी विविध मालिकांतून लोकप्रिय भूमिका केल्या आहेतच. पण ही मालिका काही खास आहे. या मालिकेतील त्यांचं मुख्य पात्र खूपच लोकप्रिय ठरलं आहे. या पात्रासोबतच लोकप्रिय ठरलेलं दुसरं पात्र म्हणजे गिरीजा प्रभू हिने साकार केलेली गौरी. ह्या दोन्ही व्यक्तिरेखांनी अतिशय अल्पकाळात प्रेक्षकांच्या मनात जागा बनवण्यात यश मिळवलं आहे. याचाच प्रत्यय स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात आला. दोघांनाही या सोहळ्यात पहिल्याच वर्षी पुरस्कार मिळाले. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. तसेच त्यांचा एक स्पेशल डान्स परफॉर्मन्स सुद्धा झाला होता. त्यांच्या मालिकेप्रमाणे त्यांनी या परफॉर्मन्स मध्येही अगदी जान ओतून सादरीकरण केलं. त्यामुळे हा परफार्मन्स सुद्धा अतिशय लोकप्रिय ठरला. त्यामुळे चाहत्यांची या डान्स परफॉर्मन्स बद्दलची उत्सुकता ही वाढली. याच्यावर प्रतिक्रिया म्हणून मग मंदार जाधव यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या डान्सची तालीम करतानाचा व्हिडियो अपलोड केला.

आम्हीही या जोडीने चाहते. त्यामुळे आमच्या टीमने हा डान्स पाहिला आणि आपल्यापुढे लेखाच्या मार्फत आणावा, असं आम्हाला वाटलं. मागेही एकदा सोनाली कुलकर्णी यांचा डान्स तालीम करतानाचा व्हिडियो आम्ही पाहिला होता आणि त्यावर लेख लिहिला होता. त्या व्हिडियो प्रमाणेच हा व्हिडियो ही आपल्या पसंतीस उतरतो. यात दोन्ही कलाकारांमध्ये असलेलं ट्युनिंग जाणवतं. या ट्युनिंग मुळे तालीम असली तरीही एकूण परफॉर्मन्स हा फायनल परफॉर्मन्स इतका उत्तम वाटतो. तसेच यात बऱ्याचशा स्टेप्स या लिफ्ट करतानाच्या आहेत. या स्टेप्स करतानाही एकमेकांना सांभाळून, न धडपडता ही जोडी सादरीकरण करत असते. त्यांच्या या केमिस्ट्रीचं कौतुकच वाटतं. एरवीही मंदार आणि गिरीजा हे त्यांच्या डान्स साठी प्रसिद्ध आहेतच. किंबहुना तुम्ही युट्युब वर गिरीजाच्या नावाने सर्च केलंत तर सर्च रिजल्ट्स मध्ये girija prabhu dance असं आपसूक येतं.

यावरून गिरीजाच्या डान्स चे चाहते किती आहेत हे लक्षात येईल. त्यामुळे हा व्हिडियो म्हणजे मंदार आणि गिरीजा यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. आम्हीही त्याचा आनंद घेतला. तुम्हाला या जोडीचा हा डान्स कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी क’मेंट्स से’क्शनचा वापर करा. तसेच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही अगदी आवर्जून वाचा आणि शेअर करा. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandar Jadhav (@mandarjadhavofficial)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *