Breaking News
Home / जरा हटके / जागतिक महिला दिनानिमित्त ह्या महिला ट्रॅफिक पो’लिसांचा व्हिडिओ होतोय वायरल

जागतिक महिला दिनानिमित्त ह्या महिला ट्रॅफिक पो’लिसांचा व्हिडिओ होतोय वायरल

८ मार्च निमित्त ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील आई, ताई, माई, अक्का, आज्जी, पणजी, मैत्रीण, सखी, बायको, मुलगी अशा कित्येक भूमिकांतून आपली काळजी घेणाऱ्या महिलांप्रति असलेली आदरभावना व्यक्त करण्याचा हा दिवस. यातील आई ही व्यक्ती तर अगदीच जवळची आणि जिवाभावाची. स्वतःच्या आवडीनिवडींना मुरड घालत तिने केलेलं पालनपोषण कोणतंही मूल विसरणार नाही. अशाच एका माऊलीचा वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला आणि तोही जागतिक महिला दिनाच्या दिवशी. ही माऊली पेशाने एक ट्रॅफिक पो’लीस आहे. चंदिगढ येथे ती कार्यरत असते, असं कळतं. पो’लीस असणं हे केवळ काम नसतं, तर ते कर्तव्य असतं. त्यामुळे काम टाळता येतं, पण कर्तव्य नाही. याचीच प्रचिती या माऊलीकडे पाहून येते.

कारण ती ट्रॅफिक पो’लीस असण्याचं कर्तव्य निभावत असताना आपल्या तान्ह्या बाळाला सोबत घेऊन आलेली असते. हा व्हिडियो एक प्रवाशाने काढल्या सारखा वाटतो. यात ही माऊली त्या बाळाला एका हाताने धरून दुसऱ्या हाताने ट्रॅफिक सांभाळत असते.आजूबाजूला असणारे ट्रॅफिक पो’लीस आणि प्रवासी यांचंही तीच्याकडे लक्ष जात असतं. हे प्रसंग बघून आपल्याला क्षणात झाशीच्या राणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ती आपल्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांविरुद्ध ल’ढली होती. झाशीच्या राणीप्रमाणेच या काळातही कर्तव्यदक्षपणे आपली भूमिका पार पाडणाऱ्या या माउलीला मराठी गप्पाच्या टीमचा त्रिवार मुजरा. आजपर्यंत अनेक वायरल व्हिडियोज वर आमच्या टीमने लेख लिहिले, पण या सारखा हाच. या माऊलीला तिच्या लहान बाळासोबत घरी जास्तीत जास्त वेळ व्यतीत करता येऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तसेच या लेखानिमित्त आमच्या वाचकांमधील सगळ्या माउलींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू देत. आपल्याला हा लेख आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेले वायरल व्हिडियोज वरील छोटे पण माहितीपूर्ण लेख वाचायला विसरू नका. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. तुमच्याकडून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *