Breaking News
Home / मराठी तडका / भागो मोहन प्यारे मधल्या गोडबोले बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत पहा

भागो मोहन प्यारे मधल्या गोडबोले बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत पहा

प्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा या सहसा मध्यवर्ती पात्रांच्या असतात. पण काही वेळेस असंही होतं, कि एखादी सहकलाकाराची भूमिका खूप भाव खाऊन जाते. पण ती भूमिका नकारात्मक असेल तर. तरीही काही कलाकार लोकांच्या पसंतीस उतरतात. अशा निवडक लोकांपैकी एक म्हणजे दीप्ती केतकर.

दिप्तीचा जन्म १६ एप्रिल १९८१ साली मुंबईत झाला. दीप्ती यांनी आज पर्यंत सिनेमे, मालिका केल्या. नायिकेच्या आणि खलनायिकेच्या भूमिका पण केल्या. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी वाहवा मिळवली. त्याचं करियर सुरु झालं ते बालकलाकार म्हणून, माणूसदेवता या मालिकेतून. पुढे दामिनी सारख्या लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या मालिकेतही त्या होत्या. हळू हळू त्यांनी आपली मनोरंजन क्षेत्रातली घोडदौड चालू ठेवली.

त्याआधी त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण गोरेगाव येथील एसटी थॉमस ह्या शाळेतून पूर्ण करून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं ते नालंदा नृत्य कला महाविद्यालय. त्यांना पहिल्यापासून नृत्याची खूप आवड. आपण नृत्यदिग्दर्शक व्हावं असं त्यांना वाटे, म्हणूनच त्यांनी भरतनाट्यम या नृत्यप्रकारात एम.ए. केलं. नृत्यात अभिनयकलेचाही समावेश असतोच. त्यांच्या एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांनी मग जाहिरातींसाठीही ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. जाहिरातीतून मग मालिकांकडे त्या वळल्या आणि मग सिनेमांकडे.

त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये कामे केली आहेत. पण प्रत्येक कलाकाराप्रमाणे आपण त्यांना काही खास व्यक्तिरेखांसाठी ओळखतो. नुकत्याच प्रसिद्ध होऊन घेऊन गेलेल्या ‘भागो मोहन प्यारे’ मधली गोडबोले बाई असो वा, ‘मला सासू हवी’ या मालिकेतली अभिलाषा. त्याचं अभिलाषा हे पात्र त्यांच्या साईन लँग्वेज मुळे तुफान गाजलं. त्याच बरोबर त्यांची ‘अवघाची हा संसार’ मधली भूमिका सुद्धा त्यांना खास ओळख मिळवून गेली. त्यांनी ‘कुंकू’ या गाजलेल्या मालिकेतही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यावेळी, त्या गरोदर होत्या पण त्याचा परिणाम त्यांच्या कामात त्यांनी होऊ दिला नाही.

या सहायक भूमिकेसाठी त्यांना अवॉर्ड हि मिळालं. नंतर त्यांनी सुमारे दीड वर्षांचा गॅप घेतला. त्याचवेळी ‘मला सासू हवी’ या मालिकेसाठी बोलावणं आलं. सुरुवातीला काही कारणांमुळे त्यांनी नकार दिला, पण मग त्यांनी काम करायला होकार दिला. आणि पुढे त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. भूमिका कोणतीही असो. दिप्तीजी त्या भूमिकांना समजावून घेऊन न्याय देतात. ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेसाठी तर त्यांनी खास कोल्हापुरी लहेजा बोलण्याचा सराव केला होता.

त्यांना चित्रपटांचीही ऑफर्स आल्या. त्यांनी ‘रंगराव चौधरी’, ‘भक्ती हीच शक्ती’, ‘चल गमंत करू’ ह्यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. पण अभिनय करतात करता, त्याचं पहिलं प्रेम – नृत्य – पाठी राहत कि काय असं वाटेल. पण तसं नाही. त्यांनी ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ हे पर्व केलं. त्यात आपल्या नृत्य अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या करियरमध्ये त्यांनी विनोदी, नायिका, खलनायिका, सहायक अशा विविध भूमिका बजावल्या आहेत. दीप्ती ह्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. नुकतेच त्यांनी स्वतःचे फोटोशूट्स करून घेतले आहेत.

त्यात त्यांची केशभूषा, कपड्यांची स्टाईल बदलंलेली दिसते. आधीच्या भूमिकांमध्ये त्यांचे पारंपारिक पेहारावं असायचे. हे फोटोशूट्स प्रोफेशनल वेशभूषेत आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका आपल्याला पहायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. सतत प्रयोगशील राहून प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणाऱ्या दीप्ती यांना पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.