आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीने एका इंटरव्हू दरम्यान जिया खान केसवर भाष्य केले. त्याच्यावर जिया खानला सुसाईट साठी प्रवृत्त करण्याचा अरोप लावण्यात आला होता. सूरजच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याला अटक झाली होती तेव्हा एक महिन्यापर्यंत तुरुंगात सर्वात निर्जन (सुनसान) स्थळी ठेवण्यात आले होते. सुरज म्हणाला,
“मला आर्थर रोड तुरुंगाच्या अंडा सेल मध्ये ठेवण्यात आले होते, जे सर्वात सुनसान सेल आहे. जिथे तुम्ही कोणाशीच संपर्क करू शकत नाही. तुम्हांला तिथे वाचायला साधा न्यूजपेपर सुद्धा मिळत नाही. मी संपूर्णपणे स्तब्ध होते. परंतु त्यावेळी मला हे सगळं काहीच वाटत नव्हतं. मी फक्त हाच विचार करत बसायचो कि मी एका अश्या व्यक्तीला गमावलं आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करायचो.
सुरज पुढे म्हणाला,
“मी गप्प बसलो कारण मी त्या कुटुंबाचा आदर करतो. त्या कुटुंबाने जे केले, मी त्यांचा आदर करतो. पण मीडिया खुप गैरजबाबदार झाली. त्यांना फक्त आपल्या टीआरपी ची काळजी असते. अश्यावेळी जेव्हा मी कोर्टात उभा आहे आणि सर्व गोष्टी माझ्या बाजुने आहेत. तेव्हा तिथे खूप सारे वार्ताहर होते. मी त्यांना विचारले हे तुम्ही छापाल? कारण की हि एक सकारात्मक गोष्ट आहे, जी चालणार नाही. हे चुकीचे आहे! पण मी वेळेवर विश्वास ठेवतो.”
3 जून 2013 ला 25 वर्षाच्या जिया खान घरात प्राण गमावलेल्या अवस्थेत सापडली होती. तिथे एक पत्र सापडले, जे सूरज च्या नावाचे होते. त्यात लिहिले होते, “एक वेळ होती, जेव्हा मी माझे जीवन मी तुझ्यासोबत पाहत होते. तुझ्या सोबत आपले भविष्य बघत होते, पण तू माझ्या स्वप्नांना पायदळी तुडवलेस”. ऑक्टोबर 2013 मध्ये जियाच्या आई राबिया ने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि सांगितले कि, त्यांच्या मुलीला मारलं गेलं आहे. राबियाने सीबीआय चौकशीची मागणी केली आणि कोर्टाने त्याचा स्वीकार केला.
सीबीआयच्या मते, विचारपूस करताना सुरजने काही बाबी लपवल्या आणि स्वतः च्या मनाला वाटेल अशी चुकीची माहिती दिली. त्याने पॉलीग्राफ किंवा ब्रेन मैपींग टेस्ट करायला सुद्धा नकार दिला होता. त्यामुळे सीबीआयला ह्या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावायचा होता आणि सुरजची ह्या प्रकरणात नक्की काय भूमिका होती ते जाणून घ्यायचे होते. ज्यामुळे सीबीआय या खटल्यात खोलवर पोचायला बघत होती. सुरजने 2015 मध्ये सिनेमा ‘हिरो’ मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. सूरजचा पुढील सिनेमा ‘टाईम टुडांस’ आहे. त्यात तो कतरीना कैफची बहीण इसाबेल सोबत दिसेल. त्या व्यतिरिक्त सैटेलाईट शंकर मध्ये दिसेल. जी ऑक्टोबर मध्ये प्रदर्शित होईल.