Breaking News
Home / मनोरंजन / जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलाचा खणखणीत आवाज एकदा ऐकाच, तुम्हीसुद्धा कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत

जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलाचा खणखणीत आवाज एकदा ऐकाच, तुम्हीसुद्धा कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत

आपली टीम लेखन करण्याच्या निमित्ताने अनेक व्हिडियो बघत असते. त्यातील अनेक व्हिडियो आवडून जातात आणि काहींच्यावर लेखन ही केलं जातं. यातील काही व्हिडियो निखळ मनोरंजन करून जाणारे असतात तर काही असे असतात की जे आमच्या आठवणी अगदी ताज्या करून जातात. आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो ही असाच आहे. आमच्या एका मित्राच्या जुन्या आठवणी ताज्या करून जाणारा असा एक व्हिडियो आम्ही बघितला. तसेच या व्हिडियोतील कंटेंट ही आवडला. म्हंटलं यावर तर लिहायला पाहिजे.

पण असं काय होतं त्या व्हिडियोत ? त्या व्हिडियोत आपल्याला भेटतो एक लहान शाळकरी मुलगा ! हा व्हिडियो चित्रित झाला तेव्हा चौथी की पाचवीत असेल इतकं वय. पण हुशारी मात्र वयाच्या पुढची. चुणचुणीत मुलं असतात ना, त्यातला हा एक मुलगा. तसेच सभाधीट आणि गायन, नृत्य यांची आवड असणारा मुलगा. त्याच्या सुदैवाने त्याला लाभलेले शिक्षक ही कलाप्रेमी असतात असा कयास करायला हरकत नाही. कारण हा व्हिडियो त्या गुरुजींनीच चित्रीत केल्याचं कळतं. त्या गुरुजींचं नाव, युवराज बडे असल्याचं कळतं. तसेच त्या लहान मुलाचं नाव हार्दिक रहांगडाले असल्याचं लक्षात येतं.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा हार्दिक, आपल्याला त्याच्या शाळेच्या पटांगणात उभा असलेला दिसतो. सोबत इतर सन्माननीय शिक्षक आणि एक छोटीशी विद्यार्थिनी उभी असते. व्हिडियो सुरू झाल्याबरोबर हार्दिक आपलं सादरीकरण सुरू करतो. पाण्याला निघालेली गवळण आणि तिथे उपस्थित असणारा श्रीकृष्ण हा विषय त्याच्या सादरीकरणाच्या केंद्रस्थानी असतो. यात त्याचं पहिलं कौतुक वाटतं ते त्याच्या खणखणीत आवाजासाठी ! काय आवाज लागतो पोराचा ! जबरदस्त ! तसेच त्याला गुरुजनांनी सादरीकरण कसं करावं हे शिकवलेलं असतं. त्याबरहुकूम अगदी हुशारीने तो हे सगळं करत असतो. पण कितीही हुशारी असली तरी लहानपणी सगळेच थोडेसे भांबावलेले असतात. तेच इथेही तेच होताना दिसतं. पण त्याचीही गंमत वाटते. कारण त्याच्या बालसुलभ वयाला अनुसरून तो जीभ चावतो. आपल्यालाही हसू येतं. पण पुढे क्षणांत तो सावरतो आणि पुढच्या स्टेप्स सुरू करतो आणि गाण्याचे पुढचे बोल ही बोलायला सुरुवात करतो. त्याच्यातली ही लहान वयातील समयसूचकता आवडून जाते. पुढेही त्याचं सादरीकरण सुरू राहतं आणि शेवटी हळूहळू सूर होत होत संपत. त्यावेळी हळुवार सुरांसोरबत त्याच्या डान्स स्टेप्स ही हळू होत जातात हे बघून आनंद वाटतो.

गाण्याच्या गतीसोबत जुळवून घेत सादरीकरण करणं ही त्याची हुशारी आवडून जाते. तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या आणि शिकवणाऱ्या शिक्षकांच ही कौतुक वाटतं. आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे हा सगळा व्हिडियो आमच्या एका मित्राच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. आमचा एक मित्र, सामाजिक कार्यासाठी त्याच्या महाविद्यालयातर्फे एका गावी गेला होता. शहरांत राहिलेला असल्याने त्याला गावच हे वातावरण वेगळं होतं. पण तरीही शहरी मुलांच्या मानाने, गावातील मुलांमध्ये असलेली हुशारी त्याला भावून गेली. त्यांच्यात असलेली उत्सुकता, तसेच शिस्त, गुरुजींचं ऐकण्याची वृत्ती, हे सगळं बघून बरं ही वाटलं आणि मन विषणणं ही झालं. कारण या मुलांना शिकायची ,पुढे यायची आवड असूनही परिस्थिती त्यांना बांधून ठेवते हे त्याला दिसलं. अर्थात त्यांच्या महाविद्यालयाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. त्यामुळे थोडीफार मदत झाली. पण शेवटी ती तरी किती पुरणार ! असो. या सगळ्याची हा व्हिडियो बघून आठवण झाली. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थिती असूनही शिक्षक आणि विद्यार्थी, प्रगती करण्यासाठी करत असलेले कष्ट पुन्हा आठवले. त्यातूनच म्हटलं याविषयी लिहू. या व्हिडियो विषयी लिहू. असो. सध्या थांबलेलं बरं. पण यानिमित्ताने त्या सगळ्या गुरुजनांना आणि विद्यार्थ्यांना आमच्या टीमचा सलाम !

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *