Breaking News
Home / मनोरंजन / जिल्हा परिषद शाळेतल्या मुलाने शाळेच्या पटांगणात केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

जिल्हा परिषद शाळेतल्या मुलाने शाळेच्या पटांगणात केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ढोल, ताशा आणि अशीच काही वाद्य वाजायला लागली की नकळत आपल्यात जी ऊर्जा संचारते तिचं वर्णन करता येत नाही. खासकरून ढोल ताशा जेव्हा मोठ्या संख्येने आणि एकसाथ वाजत असतात तेव्हा तर मजा येते. आपल्याकडे कित्येक ढोल ताशा पथकं प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक सुप्रसिद्ध गाण्यांमध्ये या वाद्यांचा वापर केलेला दिसून येतो.

तर अशी ही वाद्य एका बँड कडून वाजवली गेली आणि पुढे त्यांचं डीजे व्हर्जन खूप प्रसिद्ध झालं. खासकरून दक्षिण भारतात तर जबरदस्त या संगीताने जबरदस्त धमाल घडवून आणली होती. अनेक जण यावर डान्स करत होते आणि त्यातले काही जण तर याचे व्हिडियोज इंटरनेट वर पण प्रदर्शित करत होते. असाच एक व्हिडियो काही वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय झाला होता. एका शाळकरी मुलाचा हा व्हिडियो आहे. कित्येक लक्ष लोकांनी पाहिलेला. आपल्या टीमने आज हा व्हिडियो पुन्हा पाहिला. यावर लेख लिहिला तर वाचकांना आवडेल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला शाळेची इमारत दिसत असते. समोर पटांगण असणार. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असणार म्हणून डान्स करायला एक मुलगा येऊन उभा राहतो. बाकीचे विद्यार्थी समोर बसून या डान्सचा आनंद घेणार असतात. तेवढ्यात वर उल्लेख केलेलं संगीत वाजायला लागतं. Chatal Band DJ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे संगीत वाजायला लागतं आणि म्हणता म्हणता हा मुलगा नाचायला लागतो. सुरुवातीपासूनच त्याची छान छाप पडायला सुरुवात झालेली असते. त्यातही त्याच पदलालित्य म्हणजे लाजवाब. त्याने या डान्सचा खूप मनापासून आनंद घेत सराव केलेला असावा असं वाटून जातं. मस्त नाचतो पोरगा. त्याच्या पाठी उपस्थित असलेले सगळे जण सुदधा त्याचा डान्स आनंदाने बघत असतात. समोर बसलेले विद्यार्थी तर त्याहून खुश. आधीच आवडीचं संगीत आणि त्यात या मुलाच्या भन्नाट स्टेप्स. बरं या संगीतात जेव्हा जेव्हा डीजेचं नाव येतं तेव्हा आपसूक वाद्य बदलतात. ही जागा हेरून हा मुलगा स्टेप्स करताना काहीशी उसंत घेत राहतो. यांमुळे त्याने केलेल्या नवीन स्टेप्स आपल्या लक्षात राहतात. प्रत्येक स्टेपची मजा घेता येते आणि डोक्यात भेळ होत नाही. खासकरुन तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा केलेल्या स्टेप्स विशेष लक्षात राहतात. अशा एकंदर सात ते आठ स्टेप्स पेक्षा जास्त स्टेप्स तो करतो.

काही वेळेस काही स्टेप्स पुन्हा केल्या जातात. जसे की बाण मारत नाचण्याची स्टेप. पण त्याचा डान्स बघताना मजा येते. नंतर नंतर शेवटच्या एका मिनिटात मात्र त्याला काहीसा थकवा आल्याचं जाणवतं. पहिल्या काही मिनिटांत तो एवढ्या जबरदस्त ऊर्जेने नाचतो याचा परिणाम असावा. पण हरकत नसते. तो सुद्धा पठ्ठ्या हार मानायला तयार नसतो. जोपर्यंत कानावर या संगीताचा आवाज पडतो आहे तोपर्यंत त्याचा डान्स चालूच राहतो. जवळपास सवा तीन मिनिटं हा आपला छोटा मित्र डान्स करत राहतो. त्याच्या कौशल्याला तर दाद द्यायला हवीच. सोबतच त्याच डान्स वर असलेलं प्रेम सुद्धा उल्लेखनीय आहे. आज हा मुलगा कुठे असेल माहिती नाही. पण त्याने केलला डान्स आजही लक्षात राहिला आहे हे नक्की.

आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही तो आवडला असेलच. सोबतच आपल्या टीमने यावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण वाचक म्हणून आपल्या टीमच्या पाठीशी नेहमीच शुभचिंतक म्हणून उभे असता. आम्हाला प्रोत्साहन देत असता, सूचना करत असता. त्यातून आम्हीही नवीन गोष्टी शिकत असतो. त्यातून उत्तम लेख लिहिले जातात आणि आपलं मनोरंजन सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने होत राहतं. तेव्हा येत्या काळात ही आपला हा स्नेह कायम असू द्या. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *