Breaking News
Home / मनोरंजन / जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होत आहे वायरल, बघा हा उत्कृष्ट डान्स

जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होत आहे वायरल, बघा हा उत्कृष्ट डान्स

आपल्या मराठी गप्पाच्या टीमने डान्सशी संबंधित अनेक वायरल व्हिडियोजवर लेख लिहिलेले आहेत. पण बहुतेक व्हिडियोज मध्ये आपल्याला सहसा मोठी माणसं डान्स करताना दिसतात. तसेच अनेक वेळेस त्यांना कोरिओग्राफ केलेलं असतं. पण काही दिवसांपूर्वी आमच्या टीमने असा एक लेख लिहिला होता ज्यात अवघ्या काही वर्षांच्या शाळकरी मुलाने केलेला डान्स वायरल झाला होता त्याविषयी माहिती होती. या व्हिडियो सारखा अजून एक व्हिडिओ आमच्या टीमला दिसला आणि त्याविषयी आज लेख लिहायचं ठरलं. हा वायरल व्हिडियो आहे एका जिल्हा परिषद शाळेमधला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक गुणी मुलं पुढे येताना आपण पाहिली असतील. सध्याच्या उदयोन्मुख सेलिब्रिटीज पैकी अनेकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे. असाच एक गुणी मुलगा आपल्याला या व्हिडियोच्या माध्यमांतून भेटतो.

त्याचं किंवा शाळेचं नाव शेवटपर्यंत कळत नाही. पण त्याने केलेला अफलातून डान्स मात्र मनात घर करून राहतो. डान्सची सुरवात करताना हा चिमुरडा एकटा असतो.त्याच्या सोबत असतात ते पाठीमागे बसलेले ‘प्रेक्षक’. सच्चा प्रेक्षकांप्रमाणे त्यांचीही कार्यक्रम चालू असताना सतत ‘ये-जा’ चालू असते. पण त्यांच्या चुलबुळेपणाचा आपल्या भावावर काही परिणाम होत नाही. त्याचं केवळ एकंच ध्येय असतं. आपल्याला जो डान्स येतो तो उत्तम करणे आणि त्याचा आंनद घेणे. त्याच्या डान्स मूव्हज बघून आपली उत्सुकता वाढते. तेवढ्यात जवळपास एक मिनिटं होत आलेलं असताना त्याचे सवंगडी या डान्स मध्ये सामील होतात. ते त्यांच्या परीने डान्सला खुलवण्याचा प्रयत्न करतात. पण मग पुन्हा बाजूला होतात आणि आपला मुख्य कलाकार जीव तो’ड मेहनत करत आपलं मन जिंकत असतो. त्यातही त्याचं लक्ष हे स्टेप्स योग्यरितीने करण्याकडे असतं. त्यामुळे तो डोक्यावरची टोपी खाली ठेवतो, पण त्याचं मन भरत नाही तर ती टोपी पुन्हा योग्य रीतीने ठेवण्यात त्याचा वेळ जातो.

अर्थात एवढा काटेकोरपणा असेल तर डान्स उत्तम होतोच. पुढे त्याचे सवंगडी पुन्हा येतात आणि धमाल करतात. गडबड होते ती शेवटच्या काही क्षणांत. एका डान्स मूव्हला करताना काहीसा गोंधळ उडतो आणि तेवढ्यात व्हिडियो संपतो. पण या काही मिनिटांच्या व्हिडियोने जो आंनद मिळतो त्यास तो’ड नाही. कारण, इंटरनेट मुळे पाश्चिमात्य कलाप्रकार सुद्धा गावागावात पोहोचायला लागले हे माहिती होतंच. पण त्यात आपल्या गावांकडची पोरं इतकी अग्रेसर असतील हे पहिल्यांदा पाहण्यात आलं. त्याचा आंनद आहेच. सोबत आनंद हा, की या चिमुरड्याने आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांनी नवीन काही करू पाहण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच या प्रयत्नात त्यांना भरगोस यश मिळालेलं दिसतंच. या मुलाच्या या तयारीला, हिमतीला मराठी गप्पाच्या टीमचा सलाम. तसेच त्याच्या सोबत ज्या ज्या लहान मुलांनी सहभाग घेतला त्यांचं विशेष कौतुक आणि या सगळ्या चिमुरड्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मोठ्या मंडळींचे मनापासून आभार. आपल्या प्रोत्साहनमुळे आम्हाला एवढा सुंदर डान्स बघण्याची संधी मिळाली.

आणि वाचकहो तुम्हालाही हा लेख आणि या लहान मुलांचा स्तुत्य प्रयत्न आवडला असेलंच. तेव्हा आमचा हा लेख शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा, शेअर करा आणि मराठी मुलांची टीम असणाऱ्या या मराठी गप्पाच्या टीमला तुमचा पाठिंबा सदैव असू दे. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.