Breaking News
Home / मराठी तडका / जीव झाला येडा पिसा मालिकेतील सिद्धी खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा तिची जीवनकहाणी

जीव झाला येडा पिसा मालिकेतील सिद्धी खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा तिची जीवनकहाणी

सोळावं वरीस धोक्याचं असं म्हणण्याची पद्धत असते. पण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर हे सोळावं वरीस मोक्याचं असं म्हणण्याची वेळ गेल्या काही काळात आलेली दिसते. कारण आपल्या आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीत आहे. या बदलत्या परिस्थितीत अनेक अशा लहान वयाच्या मुला मुलींनी केलेल्या गोष्टी, व्यवसाय, मिळवलेलं यश हे आपल्याला थक्क व्हायला लावतं. आज आपण अशाच एका लहान वयाच्या पण कमी कालावधीत यशाची भरारी घेणाऱ्या नायिकेविषयी जाणून घेणार आहोत.

त्या नायिकेचं नाव आहे विदुला चौघुले. होय, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, ‘जीव झाला येडा पिसा’ मधली सिद्धी. सिद्धीची व्यक्तिरेखा साकार करताना तिने दाखवलेली प्रगल्भता ही खरेच वाखाणण्याजोगी आहे. तसेच या मालिकेतील एक स्टंट ही तिने स्वतः केलेला दिसतो. यावरून तिची कामाप्रति असलेली समर्पित वृत्ती दिसून येते. तिला लहानपणापासून अभिनय करण्याची आवड. तिची ही आवड जोपासली गेली शालेय जीवनातील ती एकांकिका आणि नाटकांच्या माध्यमातून. या माध्यमातून अभिनय करताना आलेला अनुभव, स्वतःची निरीक्षणशक्ती यांचा उत्तम वापर तिने ही भूमिका साकार करताना केलेला आहे. अगदी विशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नायिकेने स्वतःच्या उत्तम अभिनय आणि व्यक्तिमत्वाने, अल्पावधीत स्वतःचे लाखो चाहते बनवलेले आहेत. सोशल मीडियावरील तिचे वाढते फॉलोवर्स याची साक्ष देतात. अभिनयाव्यतिरिक्त तिला नृत्याची प्रचंड आवड आहे. तसेच तिला स्टायलिश राहायलाही आवडतं. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून तिचं लेटेस्ट स्टाईल स्टेटमेंट तुम्ही नक्की पाहू शकता.

या फॅशन स्टेटमेंट सोबत तिचा निरागस, उत्साही, खेळकर स्वभाव तिच्या व्यक्तिमत्वाला अजून आकर्षक बनवतो. शूटिंगच्या वेळी चालणारी सहकलाकारांसोबत तिची मस्ती, गंमती जमती आपल्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटवून जातात. विदुला ही आपल्या आई वडील आणि बहिणीच्या अगदी जवळ आहे. खासकरून तिच्या बहिणीसोबत असलेलं घट्ट नातं, तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून दिसून येतं. अशा या उत्साहाने सळसळत्या, समंजस अभिनेत्रीचा प्रगल्भ अभिनय येत्या काळातही विविध कलाकृतींमधून आपल्याला पाहता येईल हे नक्की. विदुलाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.