Breaking News
Home / मनोरंजन / जेव्हा अक्षय कुमारने स्वतःला मिळालेला अवॉर्ड आमिर खानला दिला होता

जेव्हा अक्षय कुमारने स्वतःला मिळालेला अवॉर्ड आमिर खानला दिला होता

आताचा जमाना सोशिअल मीडियाचा आहे. शोधता शोधता एक व्हिडीओ मिळालाच. अक्षय कुमारला स्टार स्क्रीन बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड मिळाला होता. ह्या व्हिडीओ मध्ये तो हा अवॉर्ड घेण्यास नकार देतोय. आणि तो हे का करत होता, काय होते ह्यामागचे कारण, चला जाणून घेऊया. गोष्ट आहे २००९ सालची. जेव्हा अक्षय कुमारचा ‘सिंग इज किंग’ हा चित्रपट २००८ ला रिलीज झाला होता. चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ ह्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल बजमी ह्यांनी केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. ह्या चित्रपटात अक्षय कुमारच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. चित्रपटातील त्याच्या ह्या भूमिकेसाठी त्याला २००९ स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचा बेस्ट ऍक्टर (पॉप्युलर चॉईस) अवॉर्ड मिळाला. परंतु स्टेज वर जाताच अक्षयने अवॉर्ड घेण्यापासून नकार दिला. अवॉर्ड न घेण्याचे स्पष्टीकरण देताना अक्षय ने सांगितले कि तो १८ वर्षांपासून ह्या अवॉर्डची प्रतीक्षा करत होता. पण चांदनी चौकातून आलेल्या एका मुलाला इतकं काही मिळू शकते, हे स्वप्नातही विचार केला नव्हता.

त्याने अवॉर्ड हातात घेत म्हटले, ” मी माझ्या हातात एक स्वप्न आणि दुसऱ्या मध्ये वडिलांचे प्रेम पकडलं आहे. परंतु मी तुम्हां सर्वांना काही सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वीच मी ‘गजनी’ चित्रपट पाहिला. आणि विश्वास ठेवा मी हा चित्रपट पाहून हैराणच झालो होतो. काही दिवसांपूर्वी मी लंडनवरून परत येत होतो तेव्हा मी माझा ‘सिंग इज किंग’ चित्रपट पाहिला. नंतर मग मी दोन्ही चित्रपटातील कलाकारांची तुलना केली. आणि तेव्हा मला माहिती पडलं कि ह्या बेस्ट वर्षीचा ऍक्टर मी नाही तर आमिर खान आहे. आमिरने ह्या चित्रपटात जे काम केले आहे ते इतिहासात लिहून ठेवण्यासारखंच आहे. मी त्या व्यक्ती कडून हा अधिकार आणि सम्मान हिसकावून नाही घेऊ शकत. मला माहिती आहे कदाचित हा क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणारही नाही. परंतु मी तो अवॉर्ड घेऊनच जाऊ शकत नाही जे माझं नाहीच आहे, आणि जे माझ्यापेक्षा कुणीतरी त्याचे जास्त हकदार आहे. माझ्यासाठी वोट करणाऱ्या सर्व चाहत्यांची मी मनापासून क्षमा मागतो. तुमच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा जरासुद्धा हेतू नाही आहे. जर परमेश्वर आणि जनतेला वाटलं तर मी हा अवॉर्ड पुन्हा जिंकू शकतो. परंतु आमिर खान, मित्रा हा अवॉर्ड तुझ्यासाठी आहे.”

 

जरी असं असलं तरी सर्वांना माहिती आहे कि आमिर खान अवॉर्ड फंक्शन मध्ये जात नाही. जेव्हा हि घटना घडली तेव्हा आमिर तिथे उपस्थित नव्हता. जर ‘गजनी’ चित्रपटाची गोष्ट कराल तर ती एक ट्रॅजिक लव्ह स्टोरी होती. ह्या चित्रपटासाठी आमिरने आपल्या शरीरावर अनेक प्रयोग केले होते. त्याची भूमिका एक अश्या व्यक्तीची होती, जो अगोदर एक खूप मोठा बिजनेसमॅन असतो. नंतर डोक्याला खूप मोठा आघात झाल्यामुळे तो प्रत्येक १५ मिनिटाला गोष्टी विसरत जातो. ह्यामुळे तो आपल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी स्वतःच्या शरीरावर त्या त्या गोष्टींचे टॅटू गोंदवून घेतो. त्याच्या आयुष्याचा एकच ध्येय आहे तो म्हणजे बदला. ह्या चित्रपटात आमिर सोबत असिन ने काम केले होते. आणि ह्या चित्रपटाला ए. आर. मुरुगाडोस ह्यांनी दिग्दर्शन केले होते. ‘गजीनी’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतल्या इतिहासातील पहिलाच चित्रपट होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्त कामे केली होती. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता :

#AkshayKumar gave his award to #AamirKhan

Akshay Kumar gave his award to Aamir Khan

Posted by Bollywood on Wednesday, March 13, 2019

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.