अभिनेते जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधे आपल्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. ते जवळपास 38 वर्षांपासून या फिल्म इंडस्ट्रीत काम करीत आहेत. जॅकी श्रॉफ यांना सुभाष घई यांच्या ‘हीरो’ या चित्रपटाने सुपरस्टार बनवल होतेे. परंतु खूप कमी लोकांना माहिती असेल की, त्यांचं पदार्पण 1982 साली प्रकाशित झालेल्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून झालेले. या चित्रपटात मुख्य भूमिका देव आनंद यांची होती आणि जॅकी श्रॉफ चित्रपटात विलनची भूमिका स्वीकारत होते. या चित्रपटाची गोष्ट आपण यासाठी करतोय कारण, मुंबई मिरर मधे दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ ह्यांनी या चित्रपटाशी निगडित काही किस्से शेअर केले आहेत.
त्यांनी सांगितले की,
“चित्रपट इंडस्ट्री मधे माझा पहिला चित्रपट ‘स्वामी दादा’ असून, मी त्यात जूनियर कलाकार होतो. आज जेव्हा मी त्या चित्रपटाबद्दल विचार करतो, तेव्हा दोनच गोष्टी माझ्या लक्षात येतात. पहिलं म्हणजे जेव्हा मी, शक्ति कपूर आणि एक दुसरा विलन सेटवर होतो आणि एका सीनमध्ये आमच्यावर मधमाश्या सोडल्या जाणार होत्या तेव्हा आम्हाला जीव मुठीत धरून पळायचे होते. सीन सुरू झाला आणि एक्शन म्हणताच मधमाश्यांची झुंडच्या झुंड आमच्यावर सोडली गेली. आम्ही जीव मुठीत धरून पळायला लागलो, पण धावताना मी म्हणालो की हि तर ऍक्टिंग नाही आहे,ह्या खरंच मधमाश्या आहेत. मी इतक्या जोरात पळालो होतो कि त्या चित्रपटात माझ्या बॉसची भूमिका करणाऱ्या शक्ती कपूर ह्यांनाही मागे टाकले होते. तेव्हा कळलं कि आमचा जीव मुठीत घेऊन धावतानाचा सीन खरा वाटावा म्हणून आमच्यावर खऱ्या मधमाश्या सोडण्यात आल्या होत्या.”
दुसरा किस्सापण त्याच चित्रपटाचा व त्याच दिवशीचा आहे. ते म्हणतात की,
“त्याच दिवशी एक सीन शूट करायचा होता. देव आनंद साहेबांच्या बॉडी डबलला (डमी) त्या सीनमध्ये मला त्यांना पाठीवर उचलून फेकायचे होते. पण माझ्याकडून तो सिन होत नव्हता. मी स्ट्रीट फायटर आहे त्यामुळे अशी टेक्नीक मला येत नव्हती. तर मी फाइट मास्टरला सांगितले की, माझ्याकडून हे नाही होत आहे. त्यावर फाइट मास्टरांना राग आला आणि त्यांनी मला शिव्या द्यायला सुरुवात केली. तिथे जवळच देव साहेब बसलेले होते, ते मास्टरला म्हणाले की , त्याला शिव्या नका देऊ. आरामात चर्चा करा. नवीन आहे तो, शिकवा त्याला कसं करायचं ते. जर तुम्ही त्याला चांगल्याप्रकारे शिकवाल तेव्हा तो लवकर शिकेल.” त्या दिवशी मी देव आनंद यांच्याकडून एक गोष्ट शिकलो की, सेटवर कधीही कोणी नवीन कलाकार आला असेल तेव्हा त्याच्याशी आदराने वागायला हवे. हा स्वभाव नाही ठेवला पाहिजे की, मी केवळ वरिष्ठ किंवा सुपरस्टारलाच मान देईन. मी देव आनंद यांच्याकडून शिकलो की सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांची काळजी घ्या. जसे देव साहेब माझ्यावर प्रेम करायचे जेव्हा मी काहीच नव्हतो. मी आजही ते पाळतो.”
देव आनंद ‘स्वामी दादा’ चे दिग्दर्शकही होते, त्यांनी टी के देसाईंसह या चित्रपटाचे निर्देशन सुद्धा केले होते. चित्रपटात देव आनंद आणि जॅकी श्रॉफ शिवाय मिथुन चक्रवर्ती, कुलभूषण खरबंदा, शक्ति कपूर , ए के हंगल, उर्मिला भट्ट, सुधीर दळवी सारखे अभिनेते सुद्धा होते.