Breaking News
Home / जरा हटके / जेव्हा खूप काळानंतर मुलगा न सांगता पत्नीमुलासोबत घरी परत येतो तेव्हा आईला झालेला आनंद, बघा व्हिडीओ

जेव्हा खूप काळानंतर मुलगा न सांगता पत्नीमुलासोबत घरी परत येतो तेव्हा आईला झालेला आनंद, बघा व्हिडीओ

व्हिडियोज वायरल होतात आणि मग त्यावर मराठी गप्पाची टीम लेख लिहिले हे आपल्यासाठी वाचक म्हणून सवयीचं झालेलं असेल एव्हाना. पण कधी कधी असाही विचार येतो की हे व्हिडियोज वायरल का होतात? थोडा विचार केला को उत्तर मिळतं – कारण या व्हिडियोज मधून मानवी भावभावनांच नैसर्गिकरित्या झालेलं प्रकटीकरण असतं. अर्थात यांसही अपवाद आहेतच, पण तसे ते कुठे नसतात. पण एकंदर आढावा घेतला तर मानवी भावना जशा आहेत तशा बघायला मिळणारे व्हिडियोज जास्त वायरल झालेले पाहायला मिळतात. बरं आजंच हे कळलं का ? तर नाही. पण याचं प्रत्यक्ष उदाहरण एका व्हिडियो मार्फत बघण्याचा योग आज आला. हा व्हिडियो आहे एका माऊलीचा आणि खूप काळानंतर तिला भेटायला आलेल्या तिच्या मुलाचा. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा या काकू घराच्या बाल्कनीत उभ्या असतात.

त्यांचं लक्ष खाली रस्त्यावर असतं. तेवढ्यात त्यांना आपला मुलगा आणि इतर मंडळी घरात प्रवेश करताना दिसतात. एवढ्या दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला मिळणार म्हणून ही माऊली हरखून गेलेली असते. तिच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. त्या धावतपळत एक मजला उतरून खाली जातात. त्यांच्या सोबत इतर मुलीही धावत खाली जातात. या धावपळीत कॅमेरा स्थिर राहत नाही पण जेव्हा कॅमेरा स्थिर होतो तेव्हा मात्र आपल्याला त्या माऊलीची आणि तिच्या लेकराची गळाभेट पाहण्याचा योग येतो. खरं तर एखाद्याच्या आयुष्यातील खासगी क्षण पण या व्हिडियो च्या निमित्ताने आपल्याला ते पाहता येतात. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे त्यातील मायेचा ओलावा अनुभवता येतो. जवळपास दोन मिनिटांचा हा व्हिडियो असेल, पण यातील ती गळाभेट आपल्या लक्षात राहते. आजूबाजूला इतर कुटुंबीय ही एकमेकांना भेटत असतात. एका क्षणी या लेकरांना इतरांनीही गळाभेट दिल्याचं दिसतं. इतर जणांचे न’मस्कार च’मत्कार चालू असतात. पण अतिशय दीर्घ काळाने भेटलेली मायलेकरांची ही जोडी मात्र काही विलग होत नाही.

किंबहुना त्यांच्यात कोणत्याच प्रकारचा दुरावा येऊ नये अशी मराठी गप्पाच्या टीमची मनापासून इच्छा आहे. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो पण आजही डोळ्यात पाणी आणतो आणि मन हेलावून सोडतो. आपणही आपल्या आई वडीलांपासून कधी दूर राहिले असू, त्याच्या आठवणी नकळत जागृत होतात. याच सगळं श्रेय त्या उत्कट पण तेवढ्याच निर्मळ ममत्वाला जातं ज्याची आपण या व्हिडियो मार्फत अनुभूती घेत असतो.

या व्हिडियो वर आधारित हा लेख आपल्याला आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या वाचकांपर्यंत मनोरंजक, उद्बोधक आणि तरीही निर्मळ लेख पोहोचावेत याबद्दल आपली मराठी गप्पाची टीम सतर्क असते. आपणही आपल्या कमेंट्स मधून, लेख शेअर करून प्रोत्साहन देत असता. चांगुलपणाची ही देवाणघेवाण अशीच चालू ठेवा आणि आपल्या टीमला सतत प्रोत्साहन पाठिंबा देत राहा ही सदिच्छा. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *