Breaking News
Home / बॉलीवुड / जेव्हा पहिल्या प्रेमात नकार मिळाला होता तेव्हा आमिर खानने काय केले होते बघा

जेव्हा पहिल्या प्रेमात नकार मिळाला होता तेव्हा आमिर खानने काय केले होते बघा

आमिर खानला बॉलिवूडमध्ये असंच मिस्टर परफेक्टनिस्ट म्हटलं जात नाही. तो आपल्या चित्रपटातील रोल, भूमिकेसोबतच त्याच्या लूकवर सुद्धा खूप जास्त मेहनत करतो. त्याचे चित्रपट पाहूनच ह्या गोष्टीची जाणीव होते. जसे कि मंगल पांडे, गजिनी, दंगल ह्यासारख्या चित्रपटांत आमिर खानने आपल्या सर्व चित्रपटांत आपल्या भूमिकेवर खूप जास्त मेहनत घेतली आहे. जर कोणता चित्रपट चालला नाही तर ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आमिर खान आपल्या बाजूने १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा नेहमी हाच प्रयत्न असतो कि कोणत्याही प्रकारे त्याला रिजेक्शनचा सामना करावा लागू नये. आणि जर गोष्ट रिजेक्शनची करत असाल तर हीच एक गोष्ट आहे ज्याला आमिर खान सर्वात जास्त घाबरतो. आणि एकदा तर आमिर खानला मुलीने प्रेमात नकार दिला होता. ज्याचे त्याला खूप दुःख झाले होते. त्यानंतर आमिर खानने असे काही केले होते, जे रूप आपल्याला एका चित्रपटात पाहायला मिळाले. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊया केव्हा आमिर खानला नकार मिळाला आणि नकार मिळाल्यावर अमीर खानने काय केले.

आमिर खानने चित्रपटात मुख्य हिरो म्हणून पर्दापण भलेही ‘कयामत से कयामत तक’ ह्या चित्रपटातून केले असेल, परंतु त्याअगोदर सुद्धा तो चित्रपट इंडस्ट्री मध्ये होता. त्याने ‘मंजिल मंजिल’ आणि ‘जबरदस्त’ ह्या चित्रपटांत असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले होते. त्याच्या अगोदर सुद्धा त्याने ‘यादों कि बारात’ ह्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. आणि ‘कयामत से कयामत तक’ च्या अगोदर सुद्धा तो अजून एका चित्रपटात दिसून आला होता. खरंतर हा चित्रपट एक प्रोजेक्ट होता, एक परीक्षा होती. डिरेक्टर केतन मेहता एफटीआयआय साठी एक प्रोजेक्ट बनवत होते. हा चित्रपट होता ‘होली’. ह्या चित्रपटात त्यांनी आमिर खानला मुख्य अभिनेता म्हणून घेतले होते. ह्या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, नीरज व्होरा, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी ह्यासारख्या कलाकारांनी काम केले होते. हा एकमेव असा चित्रपट होता ज्यात आमिर खान भडक दृश्य देताना दिसला. ह्यात आमिर खानने एक भडक चुंबनदृश्यसुद्धा दिले होते. परंतु जर गोष्ट कराल ह्या चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेची किंवा त्याच्या लूकची, तर चित्रपटात त्याला पाहून कोणी ओळखूच शकणार नाही कि हा आमिर खान आहे म्हणून.

कारण ह्या चित्रपटात त्याची हेअरस्टाईल खूपच वेगळी होती. त्याची केसं खूप छोटी छोटी होती, आणि सोबतच त्याने मिश्या ठेवल्या होत्या. असं बोललं जातं कि आमिर खानला ह्या चित्रपटात ती हेअरस्टाईल डिरेक्टरकडून दिलेली नव्हती तर त्यावेळी आमिर खानने आपली केसं काढली होती. हि केसं त्याने का काढली होती ह्याचे कारण खूपच अजब आहे. जे आमिर खानने स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे. आमिर खानने सांगितले कि त्या दिवसांत तो एका मुलीवर खूप प्रेम करत होता. परंतु त्या मुलीचे आमिरवर प्रेम नव्हते. ती आमिरला त्याच्याइतकं जास्त काही पसंद करत नव्हती. त्यामुळे तिने आमिरला प्रेमासाठी नकार दिला. ह्या रिजेक्शनमुळे आमिरला इतका राग आला होता कि त्याने आपले डोकंच भादरलं होतं. डोक्याला पूर्ण टक्कल केलं होतं. आणि जेव्हा तो ‘होली’ चित्रपट करत होता तेव्हा त्याचे केसं इतकीच वाढली होती. त्यामुळे आमिर खान आपल्याला ह्या चित्रपटात अशाप्रकारच्या लूकमध्ये दिसला होता. तेव्हा आमिर खानचे वर साधारण १७-१८ वर्षे होते, त्याचे काही दिवसांअगोदरच ब्रेकअप झाले होते आणि त्याचा हा लूक त्याच्या ब्रेकअपची निशाणी होता. असं बोललं जातं कि आमिर खानचे तेव्हापर्यंत इंडस्ट्रीमध्ये हिरो म्हणून करिअर करण्याचा असा कोणताच मूड नव्हता. म्हणूनच ह्या चित्रपटात त्याने चित्रपटाच्या क्रेडिटच्या यादीत त्याचे नाव ‘आमिर हुसैन’ असे दिले होते.

आमिरच्या आयुष्यातील अश्याच काही गोष्टी जेव्हा जाणून घेतो तेव्हा माहिती पडते कि आमिर खान कोणत्या गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा तो ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्याला ती गोष्ट मिळत नाही तेव्हा तो अश्याप्रकारे स्वतःवरच राग काढून घेतो. हि गोष्ट अश्याच घटनेतून स्पष्ट होते कि ज्यावेळी आमिर खान आपली पहिली बायको म्हणजेच रिनाच्या प्रेमात पडला होता तेव्हा रिनाला मनावण्यासाठी त्याने आपल्या रक्ताने लव्हलेटर लिहिले होते. परंतु एक गोष्ट चांगली झाली कि आमिर खानची हि जिद्द आहे ती लोकांवरून शिफ्ट होऊन चित्रपटांवर आली आहे. म्हणूनच आपल्याला बॉलिवूडमध्ये त्याचे इतके चांगले चित्रपट पाहायला मिळत आहेत. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि केव्हा एका मुलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आमिर खानने आपले डोकंच भादरलं होते, आणि त्यानंतर त्याच लूकमध्ये एका चित्रपटात काम केले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *