रतन टाटा हे भारतातील लोकप्रिय व्यक्तींपैकी एक. रतन टाटा ‘टाटा ग्रुप’ चे चेअरमनच नाही तर अनेकांच्या हृदयातील श्वास सुद्धा आहेत. अनेकजण त्यांना आपले आदर्श मानतात. रतन टाटांचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. त्यापैकीच हा एक छोटासा किस्सा. काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर त्यांचे दहा लाख फॉलोवर्स झाले. ह्यामुळे रतन टाटांनी आपला एका फोटोसोबत सर्व फॉलोवर्सना धन्यवाद सांगितले. ह्याच पोस्ट वर एका महिलेने त्यांना शुभेच्छा देत ‘छोटू’ म्हणून संबोधले. ह्यावर रतन टाटा ह्यांचे चाहते त्या महिलेवर भडकले आणि ते त्या महिलेला कमेंट मध्ये टीका करू लागले. जेव्हा टाटांना ह्याबद्दल माहिती झाले, तेव्हा त्यांनी त्या महिलेच्या कमेंटवर उत्तर देत तिचे समर्थन केले आणि त्यांच्या चाहत्यांना तिच्यासोबत चांगले वागण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा रतन टाटांनी आपल्या अनोख्या अंदाजाने लोकांचे मन जिंकले आहे. चला तर पाहूया काय झाले होते नक्की.
११ फेब्रुवारीला रतन टाटा ह्यांच्या इंस्टाग्राम वर फॉलोवर्सचा आकडा १० लाख पेक्षा जास्त झाल्यामुळे रतन टाटा ह्यांनी एक प्रेमळ पोस्ट लिहिली, ‘मी आताच पाहिले कि ह्या पेजच्या फॉलोवर्सची संख्या १० लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे. ह्या सुंदर ऑनलाईन कुटुंबाची मी तेव्हा कल्पना केली नव्हती, जेव्हा मी इंस्टाग्राम वर आलो होतो. मी ह्यासाठी आभारी आहे. माझे मानणं आहे कि, इंटरनेटच्या ह्या युगात जे कनेक्शन तुम्ही बनवलं आहे ते कोणत्या आकड्यापेक्षा शानदार आहे. तुमच्या कम्युनिटीचा एक भाग असणे आणि तुमच्या काढून शिकणं, मला आनंद देण्यासोबतच रोमांचित सुद्धा करत आहे. मला अपेक्षा आहे कि, आपला हा प्रवास असाच चालू राहील.’
त्यांच्या ह्या पोस्टवर ९ हजारापेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या. ह्यात एक कमेंट अशी आली जी लोकांच्या चर्चेचा विषय बनली. हि कमेंट एका महिला यूजरने केली होती. त्यात रतन टाटांना ‘छोटू’ म्हटले आणि १० लाख फॉलोवर्स झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. टाटांनी उत्तरामध्ये लिहिले, “प्रत्येकाच्या आतमध्ये एक मूल लपलेलं असतं. कृपया ह्या तरुण मुलीसोबत सर्वांना चांगले वागा.’ रतन टाटांचा हा रिप्लाय अनेकांना आवडला. इतका मोठा माणूस असूनही आपल्या चाहत्यांना त्या महिलेशी चांगले वागण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर हि पोस्ट वायरल होऊ लागली. सोशिअल मीडियावर ह्याबाबत खूप लिहिले गेले. आणि पुन्हा एकदा आपल्या दिलदार स्वभावाने रतन टाटांनी सर्वांचे मन जिंकले. तुम्हाला खाली दिलेला हा फोटो लक्षात आहे का ? ह्या फोटोला पाहिल्यानंतर अनेकांनी रतन टाटांना हॉलिवूड स्टार इथपर्यंत म्हटले होते. हि त्यांची १५ वी पोस्ट होती. खरंतर, ८२ वर्षीय टाटांचा हा फोटो तरुणपणीच्या काळात काढला गेला होता, जेव्हा ते लॉस एंजलिस मध्ये होते.