Breaking News
Home / माहिती / जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आला होता तेव्हा त्याने जे लिहिले होते ते वाचून तुम्हांलाही गर्व वाटेल

जेव्हा मायकल जॅक्सन भारतात आला होता तेव्हा त्याने जे लिहिले होते ते वाचून तुम्हांलाही गर्व वाटेल

पॉप संगीताचा राजा, किंग ऑफ हार्ट्स ह्यासारखे अनेक विशेषणे म्हणून प्रसिद्ध असलेला गायक म्हणजे मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनच्या करिअर वर खूप काही लिहिले गेलेले आहे. तो अनेक वादविवादांमध्ये सुद्धा अडकलेला आहे. परंतु ह्या सर्वांमध्ये एक छोटीशी घटना आहे, जी जितक्या वेळा पण तुम्ही वाचाल तितक्यावेळा तुमच्या मनाला खूप बरं वाटेल. १९९६ ची घटना आहे. विजक्राफ्ट इंटरनॅशनल कंपनीकडे एक फॅक्स आले. त्यात लिहिले होते, मायकल जॅक्सन भारतात परफॉर्मन्स करू इच्छितो. त्यावेळी त्या कंपनीचे सीईओ विरफ सरकारी होते. त्यांना त्यावेळी विश्वास बसला नाही. त्यांनी सांगितले कि जोपर्यंत मायकल जॅक्सन वचन देत नाही तोपर्यंत मी ऐकणार नाही. इतका मोठा पॉप आयकॉन असे कसे प्लॅन बनवू शकतो. त्यासाठी तेथील लोकांनी लॉस एंजेलिस मध्ये मायकलशी भेट घेतली. मायकलने वचन दिले कि भारतात येऊन मुंबईमध्ये परफॉर्म करणार. त्यावेळी नुकतेच बॉंबेचे नाव ‘मुंबई’ करण्यात आले होते. अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये शो बुके केले गेला आणि संपूर्ण भारतात वाऱ्यासारखी बातमी पसरली. ३० ऑक्टोबर १९९६ ला मायकल जॅक्सनचे प्रायव्हेट जेट उतरणार होते. आपल्या फेव्हरेट पॉपस्टारची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकं जमा झाले होते.


मायकल आपल्या ट्रेडमार्क लाल नेपोलियन जॅकेट मध्ये उतरल्या बरोबरच संपूर्ण गर्दी झाली. त्याला सहारा एयरपोर्टवरून ओबेरॉय हॉटेलपर्यंत नेण्यासाठी अनिल अंबानीने टोयोटो गाडी अरेंज केली होती. ओबेरॉय हॉटेल किंग ऑफ पॉपच्या आगमनासाठी आतुर होते. मायकल हा प्रवास करताना मध्येच धारावी लागले. तेव्हा मायकल गाडीतून उतरून लोकांना भेटायला गेला. तो गाडीच्या सनरूफ मधून बाहेर निघून गर्दीसमोर हात हलवत अभिवादन करत राहिला. एअरपोर्ट पासून ते नरिमन पॉईंट पर्यंतच्या बीच पर्यंतचा संपूर्ण रस्ता गर्दीने भरला होता. मायकलला भेटण्यासाठी प्रत्येकजण उतावळा होता. प्रभू देवाने तर मायकलला भेटण्यासाठी पूर्ण दिवस लॉबीमध्ये वाट पाहिली. लोकं कसेही करून मायकलच्या शो ची तिकिटं मिळवू इच्छित होते. परंतु त्यावेळी पिशव्या भरून सुद्धा पैसे कमी पडत होते. मुंबईत आल्यानंतर मायकल जॅक्सनने बाळासाहेबांची सुद्धा भेट घेतली होती. राज ठाकरे स्वतः मायकलला एअरपोर्टवर घ्यायला आले होते. मायकलच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील ओबेरॉय हॉटेल मध्ये करण्यात आली होती. आपला दौरा संपल्यानंतर जातेवेळी मायकल जॅक्सनने जाते वेळी एक निशाणी सोडली. ओबेरॉय हॉटेलच्या एका खोलीच्या उशीवर त्याने एक संदेश लिहिला :

भारत देशा, मी माझे संपूर्ण आयुष्य तुझा चेहरा पाहण्यासाठी वाट पाहिली आहे. मी तुला आणि तुझ्या माणसांना भेटलो आणि मला त्यांच्यासोबत प्रेम झाले आहे. आता माझे हृदय दुखी आणि उदास झाले आहे, कारण मला आता जायचे आहे. परंतु मी वचन देतो कि मी परत येणार. तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुला मिठी मारण्यासाठी. तुझ्या दयेने मला द्रवित केले आहे, तुझ्या अध्यात्मिक जागृकतेने मला प्रभावित केले आहे, आणि तुझ्या मुलांनी माझे हृदय स्पर्शिले आहे. त्यांच्या चेहऱ्यात मला परमेश्वर दिसून येतो. भारत देशा, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. मुलांना प्रेम देत राहा, त्यांना सुशिक्षित करत राहा, भविष्याची चमक त्यांच्यापासूनच आहे. तू माझे खूप खास प्रेम आहे, भारत देश. परमेश्वर नेहमी तुम्हांला सुखी ठेवो.

ह्या उशीचा नंतर चॅरिटी साठी लिलाव करण्यात आला.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.