Breaking News
Home / मनोरंजन / जेव्हा मुकेश अंबानींनी मुलगा आकाश अंबानीला एका वॉचमॅनची माफी मागायला लावली होती, बघा काय घडला होता किस्सा

जेव्हा मुकेश अंबानींनी मुलगा आकाश अंबानीला एका वॉचमॅनची माफी मागायला लावली होती, बघा काय घडला होता किस्सा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपल्या बिझनेस शिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सुद्धा चर्चेत असतात. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर आहेच, शिवाय त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ५ वा क्रमांक लागतो. त्यांची जशी जीवनशैली आहे तसे जीवन जगायचं इतर लोकं फक्त कल्पनाच करू शकतात. मुकेश अंबानी आणि त्यांचे पूर्ण कुटुंब सर्व सोयी सुविधायुक्त आयुष्य जगतं, परंतु अंबानी कुटुंबात साधेपणाची सुद्धा कमतरता नाही आहे. त्यांचे राहणीमान तितकंच साधं आणि वागणूक नम्र आहे. संपूर्ण कुटुंबाला मीडियापासून दूर राहणंच जास्त पसंत आहे. तसेच ते कोणत्या कॉंट्रोवर्सी मध्ये सुद्धा दिसून येत नाही.

विनम्र आहेत मुकेश अंबानी
मुकेश अंबानी स्वतः अनेकदा खूपच साध्या कपड्यांत दिसून येतात. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानींनी एकदा वॉचमॅनसाठी मुलगा आकाश अंबानीला सुनावले होते आणि आकाशला गार्डशी माफी मागायला लागली होती. चला तर जाणून घेऊया काय घडलं होतं नक्की. मुकेश अंबानी हे आपली पत्नी नीता अंबानी सोबत काही वर्षांअगोदर सिमी ग्रेवालच्या टॉक शो ‘Rendezvous विथ सिमी ग्रेवाल’ मध्ये पोहोचले होते. ह्या शो मध्ये कपल्स आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक खुलासे करतात आणि मुकेश-नीता ह्यांनी ह्या शो मध्ये अनेक खुलासे केले होते. ह्या शो मध्ये अंबानी जोडप्यांनी तो किस्सा सुद्धा सांगितलं जेव्हा आकाश अंबानीला वॉचमॅनकडून माफी मागायला लागली होती आणि आकाश अंबानीने हि माफी मुकेश अंबानी ह्यांच्या सांगण्यावरून मागितली होती.

जेव्हा मुकेश अंबानींनी आकाशला सुनावले होते
नीता अंबानींनी शो मध्ये सांगितले कि, मुकेश एक मातीशी नातं असलेला व्यक्ती आहे. भलेही त्यांना वडील धीरूभाई अंबानी ह्यांचा बिजनेस मिळाला असेल, परंतु ते नेहमी आपल्या मातीशी जुळलेले राहिले आहेत. त्यांना सुरुवातीपासून वाटत होते कि त्यांची मुलं सुद्धा ‘डाऊन तू अर्थ’ म्हणजेच विनम्र असावीत. नीता अंबानींनी सांगितले कि तिचा आणि पती मुकेश अंबानींचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे कि मुलांना पैश्याचे महत्व कळेल. त्यांना समजायला हवं कि पैसे कमावण्यासाठी मेहनत करावी लागते. नीता अंबानींनी पुढे सांगितले कि मुकेश अंबानींनी असं कधीच वाटले नाही कि त्यांच्या कोणत्याही मुलाला पैशांचा गर्व होईल, त्यामुळेच ते नेहमी मुलांना शांत आणि विनम्र राहण्याची शिकवण देतात. ह्याच गोष्टीवर बोलताना नीता अंबानी ह्यांनी सांगितले कि एकदा त्यांचा मोठा मुलगा आकाश घरातील वॉचमॅनसोबत उंच आवाजात बोलत होता आणि त्यांना ओरडत होता. मुकेश अंबानींनी आकाशला असं करताना बाल्कनीतून पाहिले.

वॉचमॅनकडून मागावी लागली माफी
जेव्हा आकाश वडिलांसमोर गेला, तेव्हा मुकेश ह्यांनी त्याला वॉचमॅन सोबत केलेल्या गैरवर्तुणीकीबद्दल खूप सुनावले. इतकंच नाही तर त्यांनी आकाशला सांगितले कि, ताबडतोब जा आणि त्यांची माफी मागून ये. आकाश अंबानीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी लगोलग त्या सिक्युरिटी गार्ड ह्यांच्याजवळ जाऊन त्यांची माफी मागितली. ह्यानंतरच मुकेश अंबानींचा राग शांत झाला. मुकेश अंबानी ह्यांचे वडील धीरूभाई अंबानी हे एक श्रीमंत व्यावसायिक होते आणि त्यांनी कधीही आपली संस्कृती आणि संस्कार सोडले नव्हते आणि तीच शिकवण त्यांनी आपल्या मुलांना दिली. जर आकाश अंबानीबद्दल बोलाल तर तो लाइमलाईट पासून दूर असतो. जेव्हा काही काही काळापूर्वी रिलायन्स जिओ ने फेसबुकतर्फे ४३,५७४ कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केले होती, तेव्हा ह्यात आकाश अंबानी ह्याने मुख्य भूमिका निभावली होती. आकाश सर्व सोयी सुविधा असलेले जीवन जगतो, परंतु जास्त चर्चेत राहणे त्याला पसंत नाही. आकाशला खेळामध्ये खूप आवड आहे. अनेकदा आयपीएलच्या दौरान मुंबई इंडियन्सचे सामने पाहणारा आकाश अंबानीला खेळा संबंधी असणाऱ्या आठवणींना साठवण्याची खूप आवड आहे. १९८३च्या विश्वचषकामध्ये सुनील गावस्करांनी ज्या बॅटने फलंदाजी केली होती, आकाश अंबानीने ती बॅट मिळवली होती.

सोयीसुविधांयुक्त आयुष्य जगतो आकाश
आकाशला लग्जरी गाड्यांचा सुद्धा शौक आहे. इतकंच नाही तर त्याला स्वतः गाडी चालवायला खूप आवडते. अनेकदा त्याला रेंज रोव्हर, रॉल्स रॉयल्स, बेंटले सारख्या गाड्या चालवताना पाहिलं गेलं आहे. आकाश स्वतः कॅमेरापासून दूर राहतो, परंतु श्लोका मेहता सोबत त्याचे झालेले लग्न हे वर्षातील सर्वात चर्चित लग्न होते. असं सांगितलं जातं कि, लग्नाच्या निमंत्रणामध्येच ६००० अमेरिकन डॉलर्स खर्च झाला होता. त्यांचे लग्न ९ मार्च २०१९ मध्ये झाले होते, ज्यात बॉलिवूड सितारे, मोठे मोठे उद्योगपती आणि रा’जकारणी सुद्धा सहभागी झाले होते. आकाशला हॉलिडे चे सुद्धा शौक आहे. लग्नानंतर पत्नी श्लोका सोबत तो अनेक लग्जरी हॉलिडे स्पॉट्स वर दिसून आला होता.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.