Breaking News
Home / बॉलीवुड / जेव्हा यश चोप्रा ह्यांना अमिताभ, जया आणि रेखा ह्यांना एकाच चित्रपटात घ्यायचं होतं तेव्हा काय घडलं

जेव्हा यश चोप्रा ह्यांना अमिताभ, जया आणि रेखा ह्यांना एकाच चित्रपटात घ्यायचं होतं तेव्हा काय घडलं

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटात यश चोप्रा अमिताभ बच्चन ह्यांच्या सोबत रेखा आणि जया बच्चन ह्यांना घ्यायचे होते. परंतु तेव्हा अमिताभ आणि रेखा ह्यांच्या अफेअर्स आणि जया बच्चन ह्यांच्या नाराज होण्याच्या चर्चा खूप होत्या. यश चोप्रांना वाटले कि हे तिघे एका चित्रपटात येऊच शकत नाही. तेव्हा त्यांनी परवीन बॉबी आणि स्मिता पाटील ह्यांना चित्रपटासाठी साइन केले. शूटिंगच्या अगोदर यशजी जेव्हा काश्मीर मध्ये गेले जिथे अमिताभ बच्चन ‘कालिया’ चित्रपटाची शूटिंग करत होते. तेव्हा ते डिनर करतेवेळी अमिताभ बच्चन ह्यांना भेटले. अमिताभ ह्यांनी ‘सिलसिला’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली होती. डीनर झाल्यानंतर जेव्हा सर्व लोकं तिथून निघून गेले तेव्हा अमिताभने यशजी ह्यांना विचारले, “चित्रपटाच्या कास्टिंगला घेऊन तुम्ही समाधानी आहात का?” तेव्हा यशजी म्हणाले, “नाही.” तेव्हा अमिताभ बच्चन ह्यांनी विचारले, “तुम्हांला सर्वात योग्य कास्टिंग कोणती वाटते आहे?” तेव्हा यशजी म्हणाले, ” सांगून काही उपयोग नाही आहे. आता तर आपण शूटिंग करायला आलो आहोत.” बच्चन ह्यांनी सांगितले, “तरी सुद्धा तुम्ही सांगा. मी स्क्रिप्ट वाचत आहे आणि खूपच सुंदर आहे. पहिल्यांदाच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वर चित्रपट बनत आहे.”

तेव्हा यशजी ह्यांनी सांगितले, ” खरं सांगू तर अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा ह्यांची कास्टिंग.” हे ऐकताच अमिताभ बच्चन ह्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, “असं करूया, मुंबईत जाऊया. आणि तुम्ही जया आणि रेखा ह्या दोघींसोबत बोलून घ्या.” दोघेही श्रीनगर वरून दिल्ली आणि दिल्ली वरून मुंबईला फ्लाईट वरून एकत्रच आले. परंतु ह्या दरम्यान दोघेही गप्पच होते. एक शब्दही एकमेकांशी बोलले नाहीत. पुढच्या दिवशी यशजी जया कडे गेले. ती चित्रपट करण्यास तयार झाली. तेव्हा यशजी म्हणाले, “ठीक आहे तर, आपण उद्याच शूटिंगसाठी काश्मीरला जात आहोत. मी रेखालाही चित्रपटाविषयी सांगितले. ती सुद्धा तयार आहे.”

चित्रपट सुरु होण्याअगोदर यश चोप्रा ह्यांनी रेखा आणि जया ह्या दोघीनांही वेगवेगळे बोलावून सांगितले कि,”तू माझी मैत्रीण आहे आणि हा चित्रपट मैत्रीसाठी करत आहे. तुम्हा दोघींना रोल आवडला आहे. मी तर काही बेईमानी तर नाही करणार ना ह्यात ? स्क्रिप्ट तुमच्या जवळ आहे. यार माझ्या सेटवर काही गडबड वैगेरे करू नका यार.” त्यांचा इशारा तेव्हा रेखा आणि जया ह्यांच्या मध्ये असलेल्या तणावपूर्ण नात्याच्या दिशेने होता. परंतु यशजी ह्यांचे बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी यशजी ह्यांना विश्वास दिला कि आम्ही असे काही करणार नाही. आणि शूटिंग दरम्यान त्यांना कोणतीच समस्या आली नाही.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *