Breaking News
Home / मनोरंजन / जोधा अकबर फेम अभिनेत्री परिधि शर्माचा आताचा लूक पहा

जोधा अकबर फेम अभिनेत्री परिधि शर्माचा आताचा लूक पहा

जेव्हा ‘जोधा-अकबर’ च नाव घेतलं जातं तेव्हा सर्वांच्या मनात एक हिंदू राजकुमारी जोधा आणि एक मुस्लिम शासक अकबर यांची प्रेम कहाणी आठवते. जोधा-अकबर यांच्या जीवनावर आधारित एक लोकप्रिय चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. खरंतर, जोधा आणि अकबर यांची प्रेमकथा ही एक हिंदू राजकुमारी आणि मुस्लिम शासक यांच्यातील प्रेमकथा आहे. ज्यामध्ये एक राजकुमारी आपले घरदार, राहणीमान, धर्म सर्व सोडून दुसरा धर्म स्वीकारते. या प्रेमकथेवर वर आधारित कित्येक चित्रपट तसेच टीव्ही मालिका बनवल्या गेल्या आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय मालिका ‘जोधा-अकबर’ ही होती. ही मालिका वर्ष 2013 मध्ये प्रकाशित झाली होती. तेव्हापासून तेआतापर्यंतच्या कालावधीत या मालिकेतील कलाकारांचे रूप भरपूर बदलले आहे. असेच काहीसे जोधा ची भूमिका पार पडणाऱ्या ‘परिधि शर्मा’ च्या बाबतीतही घडले.

 

जोधा ची भूमिका पार पडणारी पारिधी शर्मा आता अशी दिसते. आम्ही तुम्हाला सांगू इछितो की, 2013 साली टीव्ही वर प्रसारित होणारी ‘जोधा अकबर’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेस लोकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे मालिकेत जोधा आणि अकबर चे पात्र पार पडणाऱ्या कलाकारांची वास्तवात सुद्धा लोकांसाठी सिरीयल मधील तीच प्रतिमा बनली. या मालिकेस अतिशय सुदंररित्या सादर केले गेले होते. त्यामुळे प्रेमक्षकांना खऱ्या जोधा अकबर ला पाहण्याचा अनुभव या मालिकेने दिला. जोधा( परिधि शर्मा) आणि अकबर (रजत टोकस) यांच्या जोडीने या मालिकेस भरपूर लोकप्रिय बनवले. परंतु जोधा चे पात्र पार पाडणाऱ्या अभिनेत्री परिधि शर्मा हीचा लूक आता भरपूर बदलला आहे. आता ती आधी सारखी बिलकूल दिसत नाही.

हा शो खूपच लोकप्रिय झाला आणि शो बंद झाल्यानंतर जोधाची भूमिका साकारणारी परिधी शर्मा अचानक छोट्या पडद्यावरून गायबच झाली. जोधा अकबर नंतर खूपच लोकप्रिय झालेली परिधी गेले अनेक दिवस छोट्या पडद्यापासून दूर झाल्यानंतर ती आता पुन्हा सामोरे आली आहे. टीव्हीवरची हि जोधा सध्या खूप चर्चेत आहे. ह्यावेळी ती कोणत्या टीव्ही सिरीयल मुळे नाही तर तिच्या लूक मुळे चर्चेत आहे. तिने २ वर्षाअगोदरच मुलाला जन्म दिला होता. हि गोष्टी तिने मीडियापासून अनेक दिवस लपवून ठेवली होती. परंतु तिचे काही फोटोज पाहून तिचे हे गुपिताही सर्वांसमोर आले. काही दिवसापूर्वीच परिधी शर्माचे काही फोटोज समोर आलेत. त्या फोटोत ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. ती आई बनली आणि तिचा लूक पहिल्यासारखा नाही आहे.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.