राणू मंडल एक महिन्याअगोदर पर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत गाणं गात होती. गाणं गाऊन जे पैसे मिळायचे त्याच पैश्याने तिचे पॉट भरायचे. राणू मंडल ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात असताना एका विद्यार्थ्याने त्या गाण्याचे रेकॉर्डिंग करून फेसबुकवर अपलोड केले. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने राणू मंडल सुद्धा लोकप्रिय झाली. आता त्या चित्रपटासाठी गाणं गात आहेत. ह्याच दरम्यान बातमी आली कि ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं ज्यांनी लिहलं आहे ते अनामिक जीवन जगत आहेत. ह्या लेखकांचे नाव आहे संतोष आनंद. त्यांचे गाणं गाऊन राणू तर स्टार बनली पण संतोष कुठे आहेत हे कुणालाच माहिती नव्हतं. बेपत्ता असल्याच्या बातम्यासुद्धा आल्या. तेव्हा संतोष ह्यांच्या पर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या. तेव्हा स्वतः संतोष ह्यांनी ह्या गोष्टीचे खंडन केले. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात त्यांनी मी एकदम ठणठणीत असून चांगले जीवन जगत असल्याचे सांगितले.
सबसे पहले सभी को मेरा प्रणाम, पिछले कुछ दिनों से मीडिया में जो मुझे लेकर खबरें हैं वह सही नहीं है मैं बिल्कुल सही हूं, एक अच्छी जिंदगी जी रहा हूं और आज भी पूरा भारत मुझे उतना ही प्यार करता हैं जितना पहले करता था ! जय हिंद जय भारत
Posted by Santosh Anand on Friday, August 30, 2019
त्या व्हिडिओत त्यांनी काळजी करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. ते म्हणाले कि मला नेहमीच लोकांकडून प्रेम मिळत आलेले आहे. आणि हे प्रेम नेहमीच वाढत जाते, आणि ते वाढलेले प्रेम पाहून अजून बरं वाटतं. ते सांगतात जेव्हा मी माझ्या गाण्यातील ‘एक प्यार का नगमा है’ हे शब्द बोलतो आणि पूर्ण जनता उभे राहते आणि संपूर्ण गाणंच गाते. मी ऐकत राहतो. त्यावेळेला जनता गीतकार होते. मला ह्यापेक्षा अजून कोणतं चांगले भाग्य हवे आहे. ह्या गाण्यातील सर्व मुखडे, अंतरे सर्व लोकांच्या अजूनही लक्षात आहेत ह्या गोष्टीने मला खूप आनंद होतो. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आता तर लहान मुलेही हे गाणं ऐकतात. माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार आहे. व्हिडीओ च्या शेवटी त्यांनी लोकांचे आभार मानले.
संतोष ह्यांनी १९७० पासून १९९५ पर्यंत चित्रपटांसाठी सुदंर गाणी लिहिली. ते आता दिल्ली मध्ये सुखदेव विहार कॉलोनी मधील डीडीए फ्लॅट मध्ये राहतात. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. कोण्या एकेकाळी प्रेत्येकवेळी ऍक्टिव्ह असणारे संतोष ह्यांना आता नीट चालताही येईनासे झाले आहे. ते खूप प्रयत्न केल्यानंतर वॉकरच्या साहाय्याने काही पाऊले चालतात. त्यांनी व्यक्तिगत जीवनात सुद्धा खूप मोठे आघात सहन केले आहे. २०१४ मध्ये त्यांच्या मुलाने आणि सुनेने आत्महत्या केली होती. ह्या घटनेच्या जखमा अजूनही संतोष ह्यांच्या मनात आहेत. ते आता ७९ वर्षांचे आहेत. परंतु अजूनही कविता करतात. कवी संमेलनात भाग घेतात. त्यांना नीट चालताही येत नाही तरीही कवी संमेलनात भाग घेण्यासाठी हिम्मत करून प्रवास करत. संतोष आनंद कोठे आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत हे कोणालाच माहित नव्हते. परंतु रानू मंडल लोकप्रिय झाल्यानंतर लोकांनी कमीत कमी त्यांच्याबद्दल चर्चा करायला तरी सुरुवात केली. कोण्या एकेकाळी अप्रतिम गाणी लिहिणारे हे लेखक आज त्यांना पाऊल उचलायलाही त्रास होत आहे.