Breaking News
Home / मराठी तडका / ज्या कारणामुळे आजकालचे विद्यार्थी निराश होतात, त्याच कारणामुळे झाले सुबोध भावे लोकप्रिय कलाकार

ज्या कारणामुळे आजकालचे विद्यार्थी निराश होतात, त्याच कारणामुळे झाले सुबोध भावे लोकप्रिय कलाकार

आयुष्यात यश आणि अपयश या गोष्टी येतंच असतात. पण अपयश आलं कि ते जास्त तीव्रतेने जाणवतं. आपण स्वतःवर आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर त्यामुळे कमी विश्वास ठेऊ लागतो. शंका घेऊ लागतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी कि कोणताही काळ तसाच राहत नाही. अपयशाचा काळही निघून जातोच आणि यशाचा काळ सुरु होतो. पण या अपयशाच्या काळात माणसाने डगमगून न जाता, जी गोष्ट त्याला सगळ्यात उत्तम करता येते त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हेच समजण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या एका उत्तम अभिनेत्याचं उदाहरण घेऊ.

तो लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुबोध भावे. लोकमान्य, बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखा असोत, कि मालिकेतला विलन, किंवा लोककलेच्या कार्यक्रमाचा सूत्रधार. एखादी भूमिका अथवा काम सुबोध भावे यांना द्यावं आणि त्यांना जमू नये हे विरळच. पण अशा या प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यानेही अपयशाचा सामना केला आहे. १०वी आणि १२वी च्या परीक्षा किती महत्वाच्या असतात हे आपल्याला माहिती आहेच. पण अशा या महत्वाच्या १२वी च्या परीक्षेत सुबोध नापास झाले होते. अपयश आलं होतं त्यांना. परंतु म्हणून त्यांनी निराश होऊन दु:ख्ख करणं पसंत केलं नाही.

त्याऐवजी त्यांनी आपलं शिक्षण तर पूर्ण केलंच, तसंच आपली आवड असणाऱ्या अभिनय कलेवरही जोर दिला. मेहनत केली. सतत काम करत राहिले आणि जो घडत गेला तो इतिहास आहे. त्याऐवजी त्यांनी दु:ख्ख करत नशिबाला दोष दिला असता तर. म्हणून सुबोध भावे म्हणतात जर मी बारावीत नापास झालो नसतो तर मी बीई, बीएससी ला ऍडमिशन घेतले असते. त्यानंतर मग नोकरी करत राहिलो असतो. त्यामुळे मग कलाकार म्हणून आज जी मला ओळख मिळाली आहे ते घडलं नसतं. त्यामुळे बारावीत नापास होणं हे माझ्यासाठी चांगलंच झालं असे ते म्हणतात. त्यामुळे काही वेळेस आलेलं अपयश आपल्याला आवश्यक असलेल्या वाटेवर नेऊन ठेवत असतं. आणि कितीही अपयश आलं तर त्याला डगमगून न जाता, येणाऱ्या परिस्थितीचा सामना करणं महत्वाचं ज्यातून पुढील मार्ग सापडत जातो.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *