बॉलिवूड चित्रपटातील कथा पडद्यावर जितक्या चांगल्या वाटतात, तसेच ह्या मध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील कथा सुद्धा तितक्याच इंटरेस्टिंग असतात. आज आमही तुम्हाला बॉलिवूडच्या अश्याच एका जोडीबद्दल सांगणार आहोत जे प्रेक्षकांना पडद्यावर खूप काळापासून हसवत आलेले आहे. बॉलिवूड अभिनेते परेश रावल ह्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्या चित्रपटांत त्यांनी कॉमेडी केली, तर अनेक चित्रपटांत ते व्हिलन म्हणून सुद्धा दिसले. परेश रावल हे बॉलिवूडचे एक लोकप्रिय कलाकार असले तरी ते जास्त इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये दिसून येत नाहीत. त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. मित्रांनो, तुम्हांला परेश रावल त्यांच्या अभिनयाबद्दल तर माहितीच आहे, परंतु तुम्हांला माहिती आहे का ह्यांची पत्नी ‘मिस इंडिया’ झालेली आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम सुद्धा केले आहे. त्या समाजसेविका सुद्धा आहेत. कोण आहे त्यांच्या पत्नी, त्या कश्या दिसतात, काय करतात चला तर आजच्या लेखात जाणून घेऊया.
परेश रावल ह्यांची पत्नी सुद्धा एक अभिनेत्री आहे. त्यांच्या पत्नीला तुम्ही टीव्ही सीरिअलच्या विश्वात सुद्धा पाहिले असेल. कॉमेडी सीरिअल ‘ये जो है जिंदगी’ ह्या सीरिअल मध्ये हसवणारी स्वरूप संपत ह्या परेश रावल ह्यांच्या पत्नी आहेत. स्वरूप संपत ह्या ब्युटी क्वीन सुद्धा राहिल्या आहेत. साल १९७९ मध्ये स्वरूप संपत ह्यांनी मिस इंडिया स्पर्धा जिंकलेली आहे. ह्यानंतर त्यांनी त्याच वर्षी त्यांनी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९८४ मध्ये रिलीज झालेल्या ‘करिष्मा’ चित्रपटांत त्या बिकिनीत दिसल्या होत्या. त्यांनी टीव्ही सीरिअल मध्ये काम करण्याव्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी ‘नरम गरम’ (१९८१), ‘हिम्मतवाला’ (१९८३), ‘करिष्मा’ (१९८४), ‘साथिया'(२००२), ‘सप्तपदी’ (२०१३) सारख्या चित्रपटांत काम केले आहे. १९८४ मध्ये आलेल्या ‘करिष्मा’ चित्रपटांत त्यांनी बिकनी घालून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी ‘कि अँड का’ (२०१६) चित्रपटांत करीना कपूरच्या आईची भूमिका निभावली होती. कॉमेडी टीव्ही शो ‘ये जो है जिंदगी’ साठी त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. परंतु त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण ‘ये जो है जिंदगी’ हा टीव्ही शो खूपच लोकप्रिय झाला होता.
स्वरूप संपत आणि परेश रावल हे दोघेही नाटकांमध्ये काम करायचे. त्याच दरम्यानच्या दोघांची भेट झाली. दोघेही कॉलेजचे विद्यार्थी होते, साल १९७५ मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. स्वरूपला पाहिल्यावर पहिल्याच नजरेत परेश रावलला प्रेम झाले. ह्याच दरम्यान परेश रावल ह्यांनी आपल्या एका खास मित्राला सांगितले होते कि तो लग्न करणार तर त्याच मुलीसोबत. परेश रावल स्वरूपची एक झलक पाहूनच वेडे झाले होते. तर दुसरीकडे स्वरूप ह्यांनी परेशला नीटसे पाहिले सुद्धा नव्हते आणि नोटीस सुद्धा केले नव्हते. एकदा परेश स्टेजवर परफॉर्म करत होते, बस त्याच दिवशी त्यांनी परेशला पाहिले. त्यादरम्यान ती परेश ह्यांच्या अभिनयाची फॅन बनली. ती एक पाऊल पुढे जात सरळ स्टेजच्या मागे गेली आणि तिथे जाऊन ती परेश बद्दल विचारू लागली. जेव्हा परेश आणि स्वरूप दोघेही समोरासमोर आले तेव्हा स्वरूप ह्यांनी परेश रावल ह्यांना एक प्रश्न केला कि, तुम्ही कोण आहात. खूप चांगला अभिनय करत आहात. अश्याप्रकारे दोघांची ओळख वाढत गेली आणि वेळेसोबत दोघेही एकेमकांच्या प्रेमात पडले.
एका रिपोर्ट्सनुसार, स्वरूपने सांगतिले कि तिचे लग्न कोणत्या मंडपात नाही तर झाडाच्या खाली झाले होते. परेश आणि स्वरूप दोघांनीही झाडाच्या खाली लग्न केले. ह्या दरम्यान मागून पंडित मंत्र वाचत होते आणि आमचे लग्न होत होते. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते कि, “जेव्हा मी मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती, तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता. कारण मी अनेक वर्ष गावात एका झोपडीत राहिली आहे. इतकंच नाही जेव्हा मी चित्रपटांत काम करायची तेव्हा आरसा सुद्धा पाहत नसे. चित्रपटांत काय घालणार आहे, माझा लूक कसा असणार ह्याबद्दल मी कधीच चर्चा करत नसे.” चित्रपटसृष्टी सोडण्याबद्दल त्यांनी सांगितले होते कि, “८० च्या दशकानंतर चांगले चित्रपट बनणे बंद झाले होते. मला सुजाता आणि अनुराधा सारख्या चित्रपटांत काम करायचे होते. परंतु नंतर त्याप्रकारचे चित्रपट बनले नाहीत.” ‘हिम्मतवाला’ चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी कुमकुम बनवऱ्या ‘शृंगार’ कंपनीसाठी मॉडेलिंग सुद्धा केली आहे. त्या आता दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. आताचे पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वरूप संपत ह्यांना मुलांसाठी असणाऱ्या एज्युकेशन विभागासाठी हेड म्हणून नियुक्त केले होते. शिक्षिका आणि समाजसेवा व्यतिरिक्त त्या एक चांगल्या लेखिका सुद्धा आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. परेश रावल ह्यांनी सुद्धा २०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम करून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे आदित्य तर छोट्या मुलाचे नाव अनिरुद्ध आहे. ते पती पत्नी आणि त्यांची दोन मुले असे हे छोटेसे कुटुंब मुंबई मध्ये राहतात. आजही हे दोन्ही पती पत्नी बॉलिवूड चित्रपटांत काम करून खूप लोकप्रियता मिळवत आहेत.