डान्स करणाऱ्याला कधी अडवू नये म्हणतात, तिथे डान्स थांबविला ना की, तो डान्स तिथे थांबेल, पण कधीतरी नको तिथे नको त्यावेळी बाहेर येईल, हा बाहेर आलेला डान्स कसा असतो हे पाहण्यासाठी आपल्या या व्हीडिओतील काकांचा हा डान्स नक्की पहा. काय होतं एकदा काकांच्या गल्लीत ना हळद होती. काका फुल्ल डान्स करण्यात दंग होते. काका तेव्हा काका नव्हते. तेव्हा असेच असतील कुणीतरी पिंट्या चिंट्या वैगरे वैगरे. काका त्यांच्या बालपणी डान्स करत होते. काकांचा डान्स आला होता रंगात. त्यांनी एकदम लावला वरचा गिअर…. हळद पण शेवटच्या गाण्यावर रंगात येणार ना तितक्यात डान्स करणाऱ्या चिंट्या काकाला पाठीत असा रट्टा बसला असेल. काकांना अचानक काही सुचेना. मागे कुणी मारलं पहायला वळून पाहिलं तर लक्षात आलं मागे आईस लाटणं घेऊन उभी आहे. चिंट्या काका तिथून जे धूम ठोकून पळालेत ना. ते परत कधी कुणाच्या हळदीला नाचलेच नाहीत.
काकींच्या हातातलं ते लाटणं आणि तो शेवटचा डान्स… चिंट्या काका जस जसा मोठा होत गेला तसा डान्स किंवा सगळा तसला प्रकार बाजूला सारत गेला. ज्या अभ्यासासाठी काकांनं रट्टा खाल्ला होता तो काही होऊच शकला नाही. परिस्थितीनं तसंचं अशिक्षित ठेवलं पण काकांच्या अंगातील कला काही कमी नव्हती ती समृद्ध होती. काकांनी एकदम मनात साठवून ठेवली होती. पुढे काकांना एका पालिका शाळेत सफाई कामगाराची नोकरी लागली होती. रोज सकाळी उठायचं आणि संपूर्ण शाळा झाडून काढायची. संध्याकाळी मुलं शाळेतून निघून गेली की, पुन्हा एकदा झाडू मारायची, स्वच्छतेची जेवढी कामं ती सर्व जबाबदारी काकांची. दिवसातून फक्त दोनदा काम, संपूर्ण दिवसभर काका रिकामी. तेव्हा काका करणार काय म्हणून काकांनी एकदम भन्नाट आयडीया शोधून काढलीय. काकांनी अशाच व्हीडिओ पोस्ट करायंचं ठरवलं.
गाणं सुरू करायचं आणि त्यावर वाट्टेल तसं अतरंगी डान्स करत नाचायचं. हळदीच्या वेळी राहून गेलेली डान्सची हौस त्यानी अशीच भरून काढायला सुरू केलीयं. डान्सच्या या सगळ्या करामती काकांनी इतक्या व्हायरल केल्यायत की हाताता झाडू घेऊन काकांची गिटारची स्टेप त्यांनी सिग्नेचर स्टेप करुन घेतली आहे. काकांच्या डान्सवर आता शाळेतल्या मावशीपण फिदा आहेत. काका वन्स मोअर, अशी दाद देणाऱ्या त्यांच्या प्रतिक्रीया पाहून त्याला अधिकच चेव चढत जातोय. काकांच्या या डान्सला तुम्ही शंभर पैकी किती गुण द्याल. काकांची हळदीला नाचायची राहिलेली हौस अशाप्रकारे पूर्ण होतेयं. तुमच्यातील सुप्त इच्छा कधी ना कधी अशा बाहेर निघू लागतात. डान्स, कला किंवा आणखी काही असं व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला आंनंद मिळायचा नाही.
बघा व्हिडीओ :