Breaking News
Home / जरा हटके / झेब्राचे पिल्लू सिंहाच्या ताब्यात अडकलं असताना बघा आईने स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

झेब्राचे पिल्लू सिंहाच्या ताब्यात अडकलं असताना बघा आईने स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपल्या पूढील पिढीचं रक्षण करणं ही प्रत्येक प्राण्यांमधली नैसर्गिक भावना असते. त्यास मानवसाकट कोणताही प्राणी अपवाद नाही. अगदी आपण जिला मायाळू म्हणतो अशी गोमाता सुद्धा तिच्या पाडसाला त्रास झाला तर आक्रमक होते. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. त्याविषयी अजून प्रस्तावना करण्याऐवजी थेट त्याविषयी जाणूनच घेऊयात.

हा व्हिडियो आहे आफ्रिकेतला. आफ्रिकेतील विविध प्राणी हे वर्षभरात एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात हे आपण जाणतोच. यात विल्डबीस्ट आणि झेब्रे हे प्रामुख्याने समावेश असलेले प्राणी आहेत. या शाकाहारी प्राण्यांचं स्थलांतर चालू असताना त्यांची शिकार करण्याची नामी संधी अनेक मांसभक्षक प्राण्यांना मिळते. सिंह हे तर त्यात आघाडीवर असतात. अशाच एका शिकारी दरम्यान झालेल्या झटपटीचा हा विडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला विल्डबिस्ट्स आणि झेब्रे ओळीने चालत येताना दिसतात. पण पुढच्याच क्षणी हा समुह वेगळा होतो.

काही झेब्रे कॅमेऱ्याच्या उजवीकडे पळताना दिसतात. कॅमेरामनचं लक्ष तिथे जातं आणि कॅमेरा वळतो. पण तितक्यात त्याच्या लक्षात येतं की या दुफळीचं कारण असणारा शिकारी तर समोर आहे. मग त्याचा कॅमेरा उजवीकडे येत स्थिरावतो. एव्हाना या सगळ्यास कारणीभूत असलेली शिकारी समोर येते. ती एक सिंहीण असते. शिकार करत असताना कमी चपळ आणि अननुभवी भक्ष्यास लक्ष केले जाते. तसेच ही सिंहीण येथेही करते. त्या कळपातील लहान झेब्ऱ्यास ती लक्ष करते आणि त्याच्या नरडीला पकडते. तिची ताकदच एवढी असते की तो लहान झेब्रा सहज तिच्या तावडीत सापडतो. त्याचा आर्त आवाज ऐकून याचे हे शेवटचे क्षण असं वाटून जातं. पण त्याच्या आईने मात्र अजूनही हिंमत सोडलेली नसते. झेब्रे तसेही काहीसे आक्रमक असतातच. त्यांनी मारलेली लाथ जर वर्मावर बसली तर एखादा शिकारी सुद्धा जखमी होऊ शकतो. इथे असंच काहीसं होताना दिसत. सुरुवातीस ही झेब्रा या सिंहीणीला हुलकावणी देत पुढे येते. जबड्यात पकडलेल्या त्या छोट्या झेब्राला न सोडता ही सिंहीण मग आपला मार्ग बदलते. पण तरीही ही झेब्रा मात्र मागे यायला तयार नसते. करो या मरो वाली परिस्थिती असल्याने ती पुढच्याच क्षणी या सिंहीणीस भिडते.

तिच्या ढुशांमूळे सिंहीणीची पकड काहीशी ढिली पडते. तो छोटा झेब्रा हलकासा निसटतो. मग सोबत असलेली झेब्रा त्या सिंहींणीच्या जबड्यावर जोरात लाथ मारते. घाईगडबडीत नेम चुकतो पण काम होऊन जातं. ती सिंहीण लाथेचे वार वाचवण्यासाठी गर्रर्रकन वळते. या क्षणार्धात तो छोटा झेब्रा आणि त्याची माय त्या जागेवरून पळून जाण्यात यशस्वी होतात. हातातील शिकार निसटून गेल्यामुळे आणि आजूबाजूस इतर कोणीही नसल्याने मग ही सिंहीण जागीच बसून राहते आणि हा व्हिडियो संपतो. थरार काय असतो हे हा व्हिडियो पाहून कळून येतं. तसेच आपल्या पिल्लांसाठी एखादे माय बाप काय काय करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

व्हिडियो थरारक असल्याने त्याविषयी आपल्या वाचकांना वाचायला आवडेल असं वाटलं आणि हा लेख लिहिला गेला. तेव्हा आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना यांचं आम्ही नेहमीच स्वागत करत असतो. कारण या दोहोंतून आम्हाला शिकायला मिळतं आणि प्रोत्साहन सुद्धा मिळतं. त्याचमुळे आपण आपला हा स्नेह यापुढेही वाढवूयात. आपला आमच्या टीमवर असलेला लोभ कायम असू द्यावा ही यानिमित्ताने विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *