Breaking News
Home / मराठी तडका / टाईमप्लीज चित्रपटात दिसलेली हि बालकलाकार आता आहे लोकप्रिय अभिनेत्री, बघा कोण आहे ती

टाईमप्लीज चित्रपटात दिसलेली हि बालकलाकार आता आहे लोकप्रिय अभिनेत्री, बघा कोण आहे ती

चित्रपटांत बालकलाकार म्हणून जे काम करतात त्यांचे भविष्यात मोठे होऊन लोकप्रिय कलाकार व्हायचे स्वप्न असते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालपणापासूनच आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली. त्यातले काही पुढे मोठे होऊन लोकप्रियसुद्धा झाले, तर काहींना अपयश सुद्धा आले. आज आपण अश्या मराठी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती परंतु कमी वयातच त्या आता अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. मित्रांनो तुम्हांला उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांचा ‘टाइम प्लिज’ चित्रपट तर आठवत असेलच. ह्या चित्रपटात बालकलाकार म्हणून जी मुलगी दिसली होती ती आता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

तुमची उत्सुकता जास्त ताणून न घेता आम्ही तुम्हांला सांगतो कि ती अभिनेत्री नक्की कोण. तर तुम्हांला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका तर माहितीच असेल जी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उरतेय. ह्या मालिकेत जी मुख्य भूमिका साकारत आहे ती अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू. होय, गिरीजा प्रभू हीच ती अभिनेत्री आहे, जी ‘टाइमप्लिज’ चित्रपटात उमेश कामत ह्याच्या सोबत बालकलाकार म्हणून दिसत आहे. गिरीजाची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे. आणि मालिकेतील गिरिजाच्या कामाचे देखील खूप कौतुक होत आहे. गिरीजा या भूमिकेचं आव्हान खूप उत्तमरीतीने पेलतेय. पण अवघ्या विशीच्या गिरिजाला कसं काय हे जमत असेल, अस प्रश्न पडतो खरा. मग वाचा तर पुढचा लेख.

मुळची गोवन असलेली गिरीजाचं बालपण पुण्यात गेलंय. गिरिजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० साली गोव्यामध्ये झाला. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे दोन्ही पुण्यात झाले. गिरीजा अजून विशीत आहे आणि शिकते आहे. परंतु तिचा अभिनय प्रवास हा फार आधीच सुरु झालाय. तुम्हाला उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांचा ‘टाईम प्लीज’ हा सिनेमा आठवतो का. पण तुम्हाला माहितेय का कि त्यात तिने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा भाग घेतला होता. तसच तिची पूर्ण वेळ भूमिका असलेला ‘कौल मनाचा’ हा तिचा पहिला चित्रपट. पुढे तिने, ‘काय झालं कळना’ हा तरुणांना भावेल असा चित्रपट केला. त्याचं प्रमोशन सुद्धा अगदी जोमात केलं तिने.

२०१८ मध्ये तिचा एक नवीन चित्रपट ‘सेंट मेरी मराठी मिडीयम’ सुद्धा घोषित झाला होता. पण हे तर झालं सिनेमाचं. तिने अनेक मालिकांमध्ये छोटे छोटे रोल्स केले आहेत, तसचं एक शॉर्ट फिल्म सुद्धा. अभिनयासोबत तिला सगळ्यात जवळचं काय असेल ते नृत्य. तुम्हाला माहिती आहेच, कि ती ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रियालिटी शो मध्ये सहभागी होती. तिने आपल्या नृत्याकरता, प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पण हे किती जणांना माहिती आहे कि, २०१७ साली झालेल्या पुणे फेस्टिवलमध्ये सुद्धा तिने अनेक सिनेताराकांसोबत रंगमंचावर नृत्य केलं होतं. पुणे नवरात्री महोत्सव मध्ये सुद्धा तिने आपलं नृत्य कौशल्य आजमावलं होतं. २०१८ साली ऑल डान्सर्स असोशिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य नृत्य जीवन गौरव पुरस्कार २०१८ साठी तिची विशेष उपस्थिती होती.

पण एवढ्यावर थांबेल ती गिरीजा कसली. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्राची श्रावण क्वीन या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तीथे तिने तिसरा क्रमांक पटकावला होता. जरी ती आपल्या करियर मध्ये सतत व्यस्त असली तरी फिटनेस साठी सुद्धा वेळ काढते. ती स्केचेसही उत्तम काढते. वय लहान पण काम किती बघा आणि ती सगळी कामं उत्तमरीतीने सांभाळते आहे. म्हणूनच तिला गौरी हि “सुख म्हणजे नक्की काय असतं मधली भूमिका पेलायला जमते असं म्हणू. अभिनय, नृत्य, स्पर्धांमध्ये भाग, उत्तम स्केचेस, फिटनेस असं सगळं काही व्यवस्थित सांभाळणाऱ्या गीरीजाकडून येत्या काळातही उत्तमोत्तम कलाकृती पाहायला मिळतील यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *